हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद नाही का ?
‘एक तरी चांगला प्रशासकीय अधिकारी दाखवा आणि पारितोषिक मिळवा’, असे सांगायची आज पाळी आली आहे. हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘एक तरी चांगला प्रशासकीय अधिकारी दाखवा आणि पारितोषिक मिळवा’, असे सांगायची आज पाळी आली आहे. हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘काही वेळा काही संतांचे वागणे बघून काहींना वाटते, ‘यांना मनोविकार झाला आहे का ?’ अशा वेळी हे लक्षात घेतले पाहिजे की, संतांचा मनोलय झालेला असल्यामुळे त्यांना कधीच मनोविकार होत नाही. त्यांचे वागणे हे त्या परिस्थितीला आवश्यक किंवा त्यांच्या प्रकृतीनुसार असते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संत हे ईश्वराचे सगुण रूप असल्यामुळे त्यांच्या वागण्याचा कार्यकारणभाव सर्वसाधारण व्यक्तीला कळणे … Read more
‘सध्या समाजात प्रत्येक जण मानसन्मान आणि प्रतिष्ठा यांसाठी विविध पदव्या अन् पैसे मिळवतात. याउलट सनातन संस्थेमध्ये प्रत्येक जण कोणत्याही व्यावहारिक फळाची अपेक्षा न करता तन, मन आणि धन यांचा अधिकाधिक त्याग करतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘बहुतेक संत त्यांना ‘संत’ ही उपाधी प्राप्त झाल्यानंतर शिकवण्याच्या स्थितीत असतात. त्यामुळे त्यांच्याकडून ‘पुढील टप्प्याची साधना शिकणे, साधनेतील विविध पैलू अन् त्यांतील बारकावे विचारून आत्मसात करणे’, हा भाग होत नाही. याउलट सनातनच्या संतांना ‘अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे’, हे माहीत असल्यामुळे ते सतत शिकण्याच्या स्थितीत रहातात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.११.२०२१)
‘एखादी घटना घडली की, विज्ञान ती घडण्यामागील केवळ भौतिक कारणांचा अभ्यास करते. त्यामागे काही कार्यकारणभाव असतो, हे विज्ञानाला अद्याप कळलेले नाही, उदा. एखाद्या बसला अपघात घडून त्यामध्ये २० प्रवासी मेले आणि १ प्रवासी वाचला. या घटनेमध्ये विज्ञानाच्या दृष्टीकोनातून अपघात होण्याची कारणे ‘रस्ता खराब असणे, बसमध्ये तांत्रिक बिघाड होणे, चालकाची चूक असणे’ यांसारखी मर्यादित असतील; पण … Read more
‘डॉक्टर, अधिवक्ते, लेखापरीक्षक, ज्योतिषी, पोलीस, मित्रमंडळी, नातेवाईक इत्यादी विविध क्षेत्रांतील तज्ञ जे करू शकत नाहीत. ते संत करू शकतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘बहुतांश पुरुष त्यांच्या कामामिमित्त रज-तमप्रधान असणार्या समाजामध्ये वावरत असतात. त्यांच्यावर त्याचा परिणाम होऊन तेही रज-तमयुक्त होतात. याउलट बहुतांश स्त्रिया घरीच असल्यामुळे त्यांचा समाजातील रज-तमाशी संपर्क येत नाही. त्यामुळे त्या साधनेत लवकर पुढे जातात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१४.११.२०२१)
‘राजकारणी, बुद्धीप्रामाण्यवादी किंवा वैज्ञानिक यांच्यामुळे विदेशी भारतात येत नाहीत, तर संतांमुळे, तसेच अध्यात्म आणि साधना शिकण्यासाठी येतात. तरीही हिंदूंना संत अन् अध्यात्म यांचे मूल्य कळलेले नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘सध्या संकेतस्थळे, दूरचित्रवाहिन्या यांच्या माध्यमातून अधिक प्रमाणात मनोरंजनपर कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाते. त्यांचा दर्शकांना काहीही लाभ न होता, त्यांचा वेळ वाया जाण्याचेच प्रमाण अधिक असते. कलियुगात मनुष्याचे जीवन अल्प आहे. या अल्प कालावधीतच मनुष्य जीवनाचे मूळ ध्येय ‘ईश्वरप्राप्ती’ साध्य करण्यासाठी वेळेचा अधिकाधिक सदुपयोग करणे आवश्यक आहे. या कारणास्तव हिंदु राष्ट्रात दूरचित्रवाहिन्या वा अन्य कोणत्याही माध्यमांतून … Read more
‘साधना करतांना गुरु त्यांच्या शिष्याला अधिकाधिक स्वतःच्या आध्यात्मिक स्तरापर्यंत आणू शकतात, उदा. संत ७० टक्के, सद्गुरु ८५ टक्के, तर परात्पर गुरु ९० टक्के पातळीपर्यंत घेऊन जाऊ शकतात. ९० टक्के पातळीच्या पुढे ईश्वरच पुढील मार्गदर्शन करतो. त्यामुळे साधना करणार्याला संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु यांची त्या त्या टप्प्याला आवश्यकता असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.११.२०२१)