संतांच्या कार्य करण्याच्या पद्धती

काही संत त्यांच्या गुरूंकडून आदेश आल्यावर त्याप्रमाणे कार्य करतात, तर काही संत कार्यासंदर्भात काही प्रश्‍न असल्यास ते गुरूंना सूक्ष्मातून विचारून लगेच उत्तर मिळवतात आणि त्याप्रमाणे कार्य करतात. त्यामुळे त्यांना कार्य लगेच करता येते. – डॉ. आठवले (१८.५.२०१४)

मनापासून विषयांचा त्याग केल्यासच प्रगती होणे

एकदा संत तुकारामांनी आपल्या पत्नीस बराच वैराग्यपर उपदेश केला आणि विषय कसे वाईट आहेत, हे पटवून दिले अन् विठोबाचे नामस्मरण करण्यास सांगितले. उपदेश ऐकून तिच्या मनात वैराग्य आले. दुसऱ्या दिवशी तिने स्नान करून देवपूजा केली आणि ब्राह्मणांस बोलावून सर्व घर लुटवले. घरात काही एक ठेवले नाही. दुपारच्या वेळी घरात अन्न नाही, असे पाहून ती विचारात … Read more

गुरुपादुकांचे मूल्य प्राणापेक्षाही अधिक असणे

एका भक्ताला गुरूंचे दर्शन झाले नाही. दुसरा भक्त गुरूंना भेटला, तेव्हा गुरूंनी त्याच्या पुत्राच्या विवाहानिमित्त त्याला पादुका दिल्या. त्याने हे पहिल्या भक्ताला सांगितल्यावर तो म्हणाला, ‘मला गुरूंच्या पादुका दे, मी तुला माझी जीवनभराची मिळकत देतो.’ दुसऱ्या भक्ताने त्याला पादुका दिल्या. पहिल्या भक्ताने पादुका हृदयाला लावल्या आणि तो नाचू लागला. गुरूंना हे समजल्यावर त्यांनी पहिल्या भक्ताला … Read more

धर्मशिक्षणाची अत्यावश्यकता !

ख्रिस्ती प्रसारक हिंदूंच्या मनात ख्रिस्ती पंथासंदर्भात श्रद्धा निर्माण करू शकतात, तर जन्महिंदूंच्या मनातही हिंदूंना श्रद्धा निर्माण करता येत नाही; कारण ते धर्मशिक्षण देत नाहीत. – डॉ. आठवले (१५.५.२०१४)

साधनेची अत्यावश्यकता !

आपण स्वतःलाच जिथे साधनेशिवाय जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त करू शकत नाही, तिथे भारतमातेला आणि हिंदु धर्माला आक्रमकांपासून काय मुक्त करणार ? – डॉ. आठवले (१५.५.२०१४)

मतदान करावे लागणारी ही शेवटची निवडणूक ठरो !

विज्ञानाने मानवाचा अभ्यास करणारी अनेक यंत्रे शोधली आहेत. पुढे त्रिगुणांपैकी व्यक्तीतील प्रधान गुण दर्शवणारे यंत्र शोधले की, निवडणुकीला उभे असणार्‍यांपैकी सात्त्विक कोण ?, हे यंत्र दर्शवील. तो उमेदवार निवडणुकीत जिंकला, असे जाहीर करण्यात येईल. त्यामुळे लोकांना खोटी आश्‍वासने देऊन निवडून येता येणार नाही आणि निवडणुकांवर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च राष्ट्रासाठी वापरता येईल. – डॉ. आठवले … Read more

राजकारण्यांच्या सभा व संतांच्या सभांमधील प्रमुख भेद !

राजकारण्यांना सभेला माणसे पैसे देऊन आणावी लागतात, तर संतांच्या सभांना आणि दर्शनाला हजारो, लाखो येतात आणि अर्पणही देतात ! – डॉ. आठवले (१७.५.२०१४)

विज्ञानाच्या निकषावर सर्व पडताळून पहाण्यास सांगणार्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, या प्रश्‍नाचे उत्तर द्या !

बुद्धीप्रामाण्यवादी प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या निकषावर पडताळून पहाण्यास सांगतात. त्यांना स्वप्न पडताळून पहाण्यास सांगितले, तर ते काय सिद्ध करून दाखवतील ? साध्या स्वप्नाचे विज्ञानाच्या दृष्टीने विश्‍लेषण करता न येणारे बुद्धीप्रामाण्यवादी अध्यात्मातील अनुभूतींचे काय विश्‍लेषण करणार ? – डॉ. आठवले (२१.१.२०१४)

दया

१. व्याख्या परे वा बन्धुवर्गे वा मित्रे द्वेष्टरि वा तथा । आपन्ने रक्षितव्यं तु दयैषा परिकीर्तिता ॥ – अत्रिसंहिता अर्थ : आपले भाऊबंध किंवा ओळख नसलेले, मित्र किंवा शत्रू किंवा आपला मत्सर किंवा द्वेष करणाऱ्यांवर आपत्ती आल्यास त्यांचे रक्षण करून त्यांना संकट आणि दुःख यांपासून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या मनोवृत्तीला ‘दया’ म्हणतात. भेद न करणे … Read more

लक्ष्मी अणि सरस्वती एकत्र नांदू शकत नाहीत, असे का म्हटले जाते ?

लक्ष्मी ही संपत्ती आणि ऐश्वर्य यांची देवता आहे, तर सरस्वती ही विद्येची देवता आहे. आत्मज्ञान येण्यासाठी भौतिक सुखाचे वैराग्य येणे आवश्यक आहे. व्यक्तीकडे जेवढी जास्त संपत्ती आणि भौतिक सुखे असतील, तेवढी त्याला आसक्ती जास्त असते. जेवढी आसक्ती जास्त तेवढी आत्मज्ञान मिळण्याची शक्यता अल्प असते. येशू ख्रिस्ताने म्हटले आहे, ‘सुईच्या छिद्रातून उंट जाऊ शकेल; पण धनाढ्य … Read more