पैशाचा ‘त्याग’ अधिक सुलभ !
‘पैसा मिळवण्यापेक्षा त्याचा त्याग करणे अधिक सुलभ आहे, तरी मानव तो करत नाही, हे आश्चर्य आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘पैसा मिळवण्यापेक्षा त्याचा त्याग करणे अधिक सुलभ आहे, तरी मानव तो करत नाही, हे आश्चर्य आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘विज्ञानातील संशोधनाचे ध्येय म्हणजे मानवाला ईश्वरप्राप्ती नव्हे, तर फक्त शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक सुखप्राप्ती करून देणे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘धर्मशिक्षण आणि साधना यांच्या अभावी कृतघ्न झालेल्या हल्लीच्या पिढीला आई-बाबांची मालमत्ता हवी असते; पण वृद्ध झालेल्या आई-बाबांची सेवा करायची नसते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘शरिराची ठेवण, स्वभावातील गुण-दोष, कला, बुद्धी, धन इत्यादी घटकांचे ७५० कोटींपैकी २ व्यक्तींमध्येही साम्य नसते. असे असतांना ‘साम्यवाद’ या शब्दाला काही अर्थ आहे का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘विज्ञानाचा खरा अभ्यास केलेल्यांनाच विज्ञानाच्या मर्यादा कळतात. इतर तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी विज्ञानाला डोक्यावर घेऊन नाचतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘भौतिक विकासाच्या दृष्टीनेही धर्म महत्त्वाचा आहे ! दुर्दैवाने आज ‘भौतिक विकास म्हणजेच सारे काही’, असे समजले जात आहे. ‘मेट्रो’, ‘मॉल’, ‘स्मार्ट सिटी’, म्हणजे विकास’, असे भौतिक विकासाचे चित्र निर्माण केले जात आहे. भौतिक विकासामुळे ‘मेट्रो’ आणि ‘मेट्रो’ची अत्याधुनिक रेल्वेस्थानके मिळतील; मात्र ‘काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्रिपूंवर कशी मात करायची’, याविषयी विकासाच्या … Read more
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो आणि विज्ञानवाद्यांनो, ‘वैज्ञानिकांना शोध लावण्याची बुद्धी कुणी दिली ?’, याचा कधी विचार केला आहे का ? ती बुद्धी ईश्वराने दिली आहे. असे असतांना ‘ईश्वर नाही’, असे कुणी खरा बुद्धीवान म्हणेल का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘वृक्षारोपण राजकारण्यांच्या हस्ते नको, तर संतांच्याच हस्ते करा ! जसे बी, तसे फळ येते; म्हणूनच राजकारण्यांच्या हस्ते वृक्षारोपण केलेल्या वृक्षांना रज-तमात्मक अहंकाराची, तर संतांच्या हस्ते वृक्षारोपण केलेल्या वृक्षांना साधकत्व निर्माण करणारी फळे येतात !’ – परात्पर गुरु डॉ. आठवले
‘मनुष्य वगळता अन्य सर्व प्राणी उपलब्ध अन्न ग्रहण करतात. मनुष्याला मात्र स्वतःसाठी अन्न बनवावे लागत असल्यामुळे मनुष्य अन्य प्राण्यांच्या तुलनेत अधिक कृतीशील झाला. या कृतीशीलतेमुळेच केवळ मनुष्य साधना करू लागला आणि अन्य प्राणी आहे तसेच राहिले.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले (५.४.२०२२)
‘या ब्रह्मांडात अनेक नक्षत्रे आहेत. एका नक्षत्राचा एक कण म्हणजे मनुष्य वास करतो, ती भूमी होय ! एवढ्या मोठ्या नक्षत्राचा एक कण म्हणजे ही भूमी आहे, तर एक नक्षत्र किती मोठे असेल ? अशी अनंतकोटी नक्षत्रे असलेले ब्रह्मांड किती मोठे असेल ! सप्तर्षी जीवनाडीपट्टीतील ज्ञान अशा त्या सर्वव्यापक ब्रह्मांडाच्या नक्षत्रलोकातून आलेले आहे !’ – सप्तर्षी … Read more