भौतिक विकासाच्या दृष्टीने धर्माचे अनन्यसाधारण महत्त्व !

‘भौतिक विकासाच्या दृष्टीनेही धर्म महत्त्वाचा आहे ! दुर्दैवाने आज ‘भौतिक विकास म्हणजेच सारे काही’, असे समजले जात आहे. ‘मेट्रो’, ‘मॉल’, ‘स्मार्ट सिटी’, म्हणजे विकास’, असे भौतिक विकासाचे चित्र निर्माण केले जात आहे. भौतिक विकासामुळे ‘मेट्रो’ आणि ‘मेट्रो’ची अत्याधुनिक रेल्वेस्थानके मिळतील; मात्र ‘काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्रिपूंवर कशी मात करायची’, याविषयी विकासाच्या तत्त्वज्ञानात कुठे दिशादर्शन आहे ? मेट्रोमध्ये नियम मोडून केले जाणारे अयोग्य वर्तन आणि महिलांचे विनयभंग ज्या षड्रिपूंमुळे होतात, त्यांचे निर्मूलन मेट्रोचे व्यवस्थापन कसे करणार ? सीतेचे अपहरण करणारी रावणाची सोन्याची ‘लंका’ही त्या काळात ‘स्मार्ट सिटी’ होती. आम्हाला तशी ‘स्मार्ट सिटी’ हवी आहे का ? धर्म ही अशी गोष्ट आहे की, जी काम, क्रोध, लोभ आदी षड्रिपूंवर विजय मिळवण्यास शिकवते. त्यामुळे केवळ भौतिक विकास साध्य करून नाही, तर लोकांना धर्म शिकवून नीतीमान बनवणेही तितकेच आवश्यक आहे.’

– परात्पर गुरु डॉ. आठवले

Leave a Comment