नामजप करतांना मनात विचार येत असल्यास काय करावे ?

नामजप करतांना मनात विचार येत असल्यास सूक्ष्मातून हवेत किंवा समोरील भिंतीवर नामजप लिहावा आणि तो पुनःपुन्हा वाचावा. त्यानंतर तो श्वासाला जोडावा. असे केल्याने नामजप एकाग्रतेने होतो.’ – पू. भगवंत कुमार मेनराय

नामजप परिणामकारक होण्यासाठी काय करावे ?

नामजप करत असतांना श्वासावर लक्ष केंद्रित करावे आणि त्याला नामजप जोडावा. नामजपाला श्वास जोडण्याचा प्रयत्न करू नये; कारण तसे करतांना लय साधली गेली नाही, तर गुदमरल्यासारखे होईल. – पू. भगवंत कुमार मेनराय