केवळ मनुष्य जन्मातच भगवद़्धामात परत जाण्यासाठीची परमोच्च संधी !

‘आपण परमेश्‍वराचे अंश आहोत; पण काही कारणाने आपण या संसारी जीवनात पडलो आहोत. आता आपल्‍याला अशा रितीने उत्‍क्रांत व्‍हावयाचे आहे की, ज्‍यायोगे आपण भगवद़्‍धामात परत जाऊ शकू. हीच परमोच्‍च संसिद्धी (संधी) होय आणि ती मनुष्‍याला या जीवनात प्राप्‍त करून घेता येते.’ (साभार : आत्‍मसाक्षात्‍काराचे विज्ञान)

आध्यात्मिक विकास हाच समर्पक विकास !

तुम्‍ही स्‍वतःचा विकास करण्‍याकरता प्रयत्न करत आहात; पण तुम्‍ही आध्‍यात्मिकरित्‍या विकसित व्‍हा; कारण आध्‍यात्मिक विकास, हाच समर्पक विकास आहे. तुम्‍ही अमेरिकन आणि युरोपियन यांची नक्‍कल करू नका. इंद्रियतृप्‍तीच्‍या (वासनेच्‍या) पायावर आधारलेली अशी संस्‍कृती टिकत नाही. मानवी जीवनाचा खरा दृष्‍टीकोन म्‍हणजे आध्‍यात्मिक दृष्‍टीकोन आहे आणि तो समजून घेण्‍याचा प्रयत्न करा.’ (साभार : आत्‍मसाक्षात्‍काराचे विज्ञान)

केवळ शारीरिक कामापुरती सीमित केलेली योगसाधना, हा भारतियांचा करंटेपणा !

पश्‍चिमेतील कुणी विद्वान योगसाधनेची प्रशंसा करतो, तेव्हा आम्हाला त्याचे महत्त्व लक्षात येते आणि आम्ही त्याला योगसाधनेच्या नाही, तर योगाच्या रूपात स्वीकारतो. तेसुद्धा त्याच्या मूळ रूपात नाही, तर योगाच्या ८ अंगांपैकी केवळ ३ अंगे म्हणजेच आसन, प्राणायाम आणि ध्यान इथपर्यंतच सीमित रहातो. आज योग हळूहळू शरीर आणि प्राण यांचाच व्यायाम होत चालला आहे. आजचे योगगुरुही यम, … Read more

अडचणींकडे पहायचा दृष्टीकोन !

‘पूर्णतेच्या मार्गाने ज्याला वाटचाल करायची आहे, त्याला अडचणी येणारच. त्याने त्याविषयी कधी तक्रार करू नये; कारण प्रत्येक अडचण ही नवीन प्रगतीची सुवर्णसंधी असते. तसेच तक्रार ही दौर्बल्य आणि निष्ठाशून्यता यांची निशाणी आहे.’ (‘मासिक तत्त्वज्ञान’, १९०७ वैशाख)

केवळ मनुष्य जन्मातच भगवद्धामात परत जाण्यासाठीची परमोच्च संधी !

आपण परमेश्‍वराचे अंश आहोत; पण काही कारणाने आपण या संसारी जीवनात पडलो आहोत. आता आपल्याला अशा रितीने उत्क्रांत व्हावयाचे आहे की, ज्यायोगे आपण भगवद्धामात परत जाऊ शकू. हीच परमोच्च संसिद्धी (संधी) होय आणि ती मनुष्याला या जीवनात प्राप्त करून घेता येते. – स्वामी श्रील भक्तीवेदांत प्रभुपाद (साभार : आत्मसाक्षात्काराचे विज्ञान)