मंदिराच्या विश्वस्तांनी दर्शनार्थींना दर्शन घेऊ देण्यासह साधनाही शिकवली तर त्यांना विश्वस्तपद शोभून दिसेल !

‘मंदिराच्या विश्वस्तांनो, दुकानदार गिर्‍हाईकाकडून पैसे घेऊन त्याला वस्तू देतो. तसे मंदिरवाले दर्शनाआधी किंवा नंतर पैसे घेतात. अशी हल्लीची स्थिती झाली आहे. दर्शनार्थींना दर्शन घेऊ देण्यासह साधनाही शिकवली, तरच दर्शनार्थींना काहीतरी दिल्यासारखे होईल आणि तुम्हाला विश्वस्तपद शोभून दिसेल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संतांकडे सकाम साधना करणारे सहस्रो भक्त असतात; पण ईश्वरप्राप्तीसाठी फारतर १ – २ शिष्यच असतात !

‘बहुतांश संत हे व्यष्टी प्रकृतीचे असतात. ते मानसिक स्तरावर राहून येणार्‍यांची व्यावहारिक दुःखे दूर करण्यावरच भर देतात. ते त्यांच्याकडे येणार्‍यांकडून ईश्वरप्राप्तीसाठी साधना करून घेत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे येणार्‍या भक्तांमध्ये ‘स्वतःच्या व्यावहारिक अडचणी सुटाव्यात’, यासाठी येणार्‍या भक्तांचीच संख्या अधिक असते. त्या संतांकडून साधना शिकून शिष्य पदापर्यंत पोचणारे क्वचितच १ – २ जणच असतात. बर्‍याचदा संतांच्या पश्चात … Read more

देशभक्त आणि धर्माभिमानी हिंदूंनो, व्यापक व्हा !

‘राष्ट्र-धर्माभिमान्यांनो, फक्त स्वतःच्या क्षेत्रातीलच नको, तर व्यापक होण्यासाठी वैद्यकीय, न्यायालयीन, पोलीस, सरकारी कार्यालये इत्यादी सर्वच क्षेत्रांतील अन्याय शोधून त्याविरुद्ध वैध मार्गाने आवाज उठवा !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सनातनच्या सत्संगात आनंद जाणवण्याचे कारण

‘एखाद्या संप्रदायाच्या संतांचे मार्गदर्शन, दर्शनसोहळा असला की, त्यांच्याकडे येणारे भक्त केवळ त्यांच्या आर्थिक, सांसारिक, शारीरिक आणि मानसिक या स्तरांवरील अडचणी मांडतात. आध्यात्मिक दृष्टीकोनातून बघितल्यास मनुष्याचे हे सर्व त्रास त्याच्या प्रारब्धानुसार असतात. यामुळे सनातनमध्ये प्रारब्धावर मात करण्यासाठी किंवा प्रारब्ध तीव्र असल्यास ते सहन करण्यासाठी योग्य अशी साधना शिकवली जाते. सनातनचे साधक निष्काम साधना करत आहेत. सनातनच्या … Read more

कुठे स्त्रीरक्षणासाठी आदर्श असणारे राम, कृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज, तर कुठे हिंदु धर्म आणि भारत दोघांसाठीही लज्जास्पद ठरणारे सध्याचे जन्महिंदू !

‘सीतेला रावणाने पळवले; म्हणून रामाने लंकेवर आक्रमण करून सीतेला रावणाच्या तावडीतून मुक्त केले. नरकासुराने बंदी केलेल्या १६,००० उपवर कन्यांना श्रीकृष्णाने त्याच्याशी युद्ध करून सोडवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांवर अत्याचार करणार्‍या पाटलाचे हात-पाय तोडले. ‘स्त्रीरक्षण कसे करावे ?’, याचे अनेक दाखले हिंदूंसमोर असूनही भारतात प्रतिदिन स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. कुठे राम, कृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज, … Read more

हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद नाही का ?

‘एक तरी चांगला प्रशासकीय अधिकारी दाखवा आणि पारितोषिक मिळवा’, असे सांगायची आज पाळी आली आहे. हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

मनोलय झालेल्या संतांच्या कृतीचा मानसिक स्तरावर अर्थ काढू नये !

‘काही वेळा काही संतांचे वागणे बघून काहींना वाटते, ‘यांना मनोविकार झाला आहे का ?’ अशा वेळी हे लक्षात घेतले पाहिजे की, संतांचा मनोलय झालेला असल्यामुळे त्यांना कधीच मनोविकार होत नाही. त्यांचे वागणे हे त्या परिस्थितीला आवश्यक किंवा त्यांच्या प्रकृतीनुसार असते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संत हे ईश्वराचे सगुण रूप असल्यामुळे त्यांच्या वागण्याचा कार्यकारणभाव सर्वसाधारण व्यक्तीला कळणे … Read more

सनातन संस्थेचे वेगळेपण !

‘सध्या समाजात प्रत्येक जण मानसन्मान आणि प्रतिष्ठा यांसाठी विविध पदव्या अन् पैसे मिळवतात. याउलट सनातन संस्थेमध्ये प्रत्येक जण कोणत्याही व्यावहारिक फळाची अपेक्षा न करता तन, मन आणि धन यांचा अधिकाधिक त्याग करतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

शिकवणारे संत आणि सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणारे सनातनचे संत !

‘बहुतेक संत त्यांना ‘संत’ ही उपाधी प्राप्त झाल्यानंतर शिकवण्याच्या स्थितीत असतात. त्यामुळे त्यांच्याकडून ‘पुढील टप्प्याची साधना शिकणे, साधनेतील विविध पैलू अन् त्यांतील बारकावे विचारून आत्मसात करणे’, हा भाग होत नाही. याउलट सनातनच्या संतांना ‘अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे’, हे माहीत असल्यामुळे ते सतत शिकण्याच्या स्थितीत रहातात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.११.२०२१)