माझे कार्य अधिक प्रमाणात सूक्ष्मातील असल्यामुळे इतर संतांप्रमाणे माझे नाव…

माझे कार्य अधिक प्रमाणात सूक्ष्मातील असल्यामुळे इतर संतांप्रमाणे माझे नाव हिंदूंमध्ये मोठे झाले नाही; पण सूक्ष्माचे अभ्यासक, सूक्ष्म जाणणारे संत आणि महर्षी यांच्यापर्यंत माझे नाव पोचले.

साधकांनो, महर्षींनी प.पू. डॉक्टरांना श्रीश्रीजयंत बाळाजी आठवले, असे संबोधण्यास सांगितले…

साधकांनो, महर्षींनी प.पू. डॉक्टरांना श्रीश्रीजयंत बाळाजी आठवले, असे संबोधण्यास सांगितले असण्याचा अर्थ लक्षात घ्या ! : सप्तर्षी जीवनाडीतील मजकूर सांगणार्‍या महर्षींनी मला श्रीश्रीजयंत बाळाजी आठवले, असे संबोधण्यास सांगितले आहे. साधकांना ही अपूर्व गोष्ट वाटेल. त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, काही संतांना अनंत श्री, असे संबोधतात. त्यांच्या मानाने मी कोठेच नाही, हे लक्षात घ्या !

विविध नाड्या आणि संहिता यांत ऋषींनी मायेतील प्रश्नांची उत्तरे देण्याचे कारण

विविध नाड्या आणि संहिता यांत विविध ऋषींनी सांगितलेली माहिती असते. नाडी आणि संहिता यांचे वाचन करणार्‍यांकडे येणारे बहुतेक सर्वच सकामातील, म्हणजे मायेतील प्रश्‍न विचारतात आणि त्यांना ऋषींकडून उत्तरही मिळते. त्यासंदर्भात मला वाटायचे, ऋषी एवढे ज्ञानी असूनही सकामातील, म्हणजे मायेतील प्रश्‍नांची उत्तरे का देतात ?, असा प्रश्‍न मनात येण्याचे कारण म्हणजे मी कोणाला कधीच मायेतील प्रश्‍नांची … Read more

कुठे आता कार्य उरले नसल्याने पृथ्वीवरील जीवनाचा कंटाळा आल्यासारखे वाटणारे…

कुठे आता कार्य उरले नसल्याने पृथ्वीवरील जीवनाचा कंटाळा आल्यासारखे वाटणारे प.पू. डॉक्टर, तर कुठे युगानुयुगे कार्य करणारा ईश्‍वर, सर्व देवता आणि अनेक ऋषी ! : हिंदु राष्ट्राची, म्हणजे रामराज्याची स्थापना होणार, याची खात्री अनेक संत आणि नाडी भविष्य सांगणारे ऋषी यांनी मला दिली आहे. त्यामुळे आता करण्यासारखे काही कार्य उरले नसल्याने मला पृथ्वीवरील जीवनाचा कंटाळा … Read more

सनातनचे संत प्रसिद्धीच्या झोतात नसण्याचे कारण

सनातनचे संत प्रसिद्धीच्या झोतात नसण्याचे कारण : इतर अनेक संतांप्रमाणे सनातनचे संत दूरचित्रवाहिन्यांवर किंवा समाजात प्रसिद्धी पावलेले दिसत नाहीत. याचे कारण हे की, सनातन संस्थेचे कार्य अधिकतर (७० टक्क्यांहून अधिक) सूक्ष्मातील असल्यामुळे समाजाला ते कळत नाही. सूक्ष्मातील जाणणार्‍या खर्‍या संतांनाच ते कळते. त्यामुळे त्यांचे सनातनच्या कार्याला आशीर्वाद आहेत. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

केवळ ख-या संतांमुळेच आज मानव जिवंत आहे, हे लक्षात घ्या !

केवळ खर्‍या संतांमुळेच आज मानव जिवंत आहे, हे लक्षात घ्या ! : खरे संत सूक्ष्मातील अदृष्य वाईट शक्तींना त्यांच्या संकल्पाने किंवा केवळ अस्तित्वाने हरवून पृथ्वीवरील मनुष्य देहधारी असुरांची मूळ शक्ती नष्ट करतात. त्यामुळेच त्यांना हरवणे सात्त्विक धर्मयोद्ध्यांना शक्य होते. हे कळत नसल्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींना वाटते, एवढा मोठा आपत्काळ असूनही संत काही करत का नाहीत ? … Read more

स्त्री आणि पुरुष यांच्या दिवसभरातील कार्याचा वेळ आणि त्याचा परिणाम

स्त्री आणि पुरुष यांच्या दिवसभरातील कार्याचा वेळ आणि त्याचा परिणाम १. पुरुषांना आठवड्यात शनिवार आणि रविवार अशी दोन दिवस रजा मिळते. स्त्रियांना मात्र सातही दिवस काम करावे लागते. २. पुरुष कार्यालयातून घरी परतल्यावर दूरदर्शनवरील कार्यक्रम पहा, काही वाचन करा, मुलांबरोबर गप्पा मारा इत्यादी करतात. स्त्रियांना मात्र असे करायला कमी वेळ असतो; कारण त्यांना दिवसभर कामे … Read more

मी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे प्रयत्न कर्मफलाची अपेक्षा न करता कर्मयोगाप्रमाणे…

मी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे प्रयत्न कर्मफलाची अपेक्षा न करता कर्मयोगाप्रमाणे करतो. कर्मफलाकडे ज्ञानयोगानुसार साक्षीभावाने पहातो, तर भक्तीयोगाप्रमाणे सर्व ईश्‍वरेच्छेने होते, हे ज्ञात असल्यामुळे कर्मफलाचे विचार करत नाहीत; म्हणून मी नेहमी आनंदात असतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

एका अब्जाधिशाच्या मुलाने त्याची सर्व संपत्ती उधळून टाकावी, तशी हिंदूंच्या…

एका अब्जाधिशाच्या मुलाने त्याची सर्व संपत्ती उधळून टाकावी, तशी हिंदूंच्या मागच्या पिढ्यांनी सर्व धर्मसंपत्ती मातीमोल केली आहे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले