खरे गुरुस्मरण
‘गुरूंचे कार्य पुढे नेणे आणि त्यासाठी कसलाही विचार न करता तळमळीने झोकून देऊन साधना करणे’, हेच गुरूंचे खरे स्मरण आहे. आपण गुरूंच्या कार्याचा विचार केला, तरच देवही आपला विचार करतो. – श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ
‘गुरूंचे कार्य पुढे नेणे आणि त्यासाठी कसलाही विचार न करता तळमळीने झोकून देऊन साधना करणे’, हेच गुरूंचे खरे स्मरण आहे. आपण गुरूंच्या कार्याचा विचार केला, तरच देवही आपला विचार करतो. – श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ
‘भगवंत (परात्पर गुरु डॉ. आठवले) मला सेवा उपलब्ध करून देतो. माझ्याकडून सेवा करवूनही घेतो; परंतु सेवा झाल्यावर कर्तेपणाच्या विचारांमुळे ‘ती सेवा मी केली’, असे साधकाला वाटते. कर्तेपणा नष्ट करण्यासाठी प्रत्येक सेवेची संधी दिल्याविषयी, सेवा करण्यापूर्वी आणि झाल्यानंतर ‘ती देवानेच करवून घेतली आहे’, यासाठी कृतज्ञता व्यक्त केल्यास कर्तेपणा नष्ट होऊन त्या सेवेतून आपली साधना होईल.’ – … Read more
‘हिंदु राष्ट्रात (सनातन धर्म राज्यात) नियतकालिके, दूरचित्रवाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींचा वापर केवळ धर्मशिक्षण आणि साधना यासंदर्भात केला जाईल. त्यामुळे गुन्हेगार नसतील आणि सर्वजण भगवंताच्या अनुसंधानात असल्याने आनंदी असतील.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले
‘मीपणा’ची जाणीव म्हणजे देहस्थिती नसून, स्वस्वरूप आनंदच होय. त्या अपार आनंदाचा अनुभव होत होत ‘मीपणा’ची जाणीव शेष राहिली, म्हणजेच त्याला आत्मसाक्षात्कार झाला, असे म्हणतात. अशा स्थितीने दु:खाची जाणीव न होता, देह भावाचा अभाव होऊन, कुठलीही चिंता न रहाता, केवळ एका आनंदाचाच अनुभव शेष रहाणे म्हणजेच ‘जीवनमुक्ती’ होय, यालाच ‘कैवल्य’ किंवा ‘मोक्ष’ असेही म्हणतात. ही आत्मचिंतनाची … Read more
‘एखाद्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. त्याने नुकतीच साधना करण्यास आरंभ केला, तर त्याला लगेच त्याच्या व्यसनाविषयी सांगणे योग्य नाही. ‘संतांना केव्हा काय करायचे ?’, हे ज्ञात असते; कारण त्यांना काळ कळतो. त्यामुळे वेळ आली की, ते त्या व्यक्तीला तसे सांगतात. तो त्यांच्याकडून झालेला एक उपदेशच असतो. वेळ आली की, आपोआपच त्या व्यक्तीचे दारूचे व्यसन सुटते. … Read more
‘अपेक्षा करणे’ हे अहंचे लक्षण आहे. अपेक्षापूर्ती झाल्यावर तात्कालिक सुख मिळते; परंतु त्यामुळे अहंचे पोषण होते आणि अपेक्षेप्रमाणे झाले नाही की, दुःख होते. म्हणजे दोन्ही प्रसंगांत साधनेच्या दृष्टीने हानीच आहे.’ – (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)
‘श्रीराम स्वतः ईश्वराचा अवतार होता. पांडवांच्या वेळी पूर्णावतार श्रीकृष्ण होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी समर्थ रामदासस्वामी होते. यावरून लक्षात येईल की, ईश्वरी राज्याची स्थापना ईश्वर स्वतः करतो किंवा संतांकडून करवून घेतो. ‘आता हिंदु राष्ट्राची स्थापना ईश्वराने करावी किंवा संतांकडून करवून घ्यावी’, यासाठी आपण त्याचे भक्त बनणे आवश्यक आहे.’ ‘सात्त्विक व्यक्तींच्या व्यष्टी जीवनाचे ध्येय असते ईश्वरप्राप्ती, … Read more
‘अंतःकरणात सतत रामाशी अनुसंधान ठेवणे (रामाचा, म्हणजे देवाचा नामजप किंवा भक्ती करणे), अर्थात् रामाला अनुभवणे’, हे अंतर्-रामायण. ‘रामाप्रमाणे धर्मसंस्थापना, म्हणजे ‘साधना’ म्हणून रामराज्याची (हिंदु राष्ट्राची) स्थापना करणे’, हे बाह्य-रामायण. या दोन्ही रामायणांचा परिपोष जीवनात होणे, म्हणजे रामायण खर्या अर्थाने अनुभवणे होय. प्रतिदिन रामायण अनुभवण्यातील आनंद घ्यायचा प्रयत्न करा !’ – (पू.) श्री. संदीप आळशी (१५.४.२०२१)
‘पुढीलपैकी कोणत्या साधकाची सेवा देवाला आवडेल ? एक साधक सेवा करतांना ‘चूक तर होणार नाही ना ?’, या विचाराने (भीतीने) सतर्क राहून एक प्रकारे ‘चुकांच्या’ अनुसंधानात राहून सेवा करतो, तर दुसरा साधक ‘देवाच्या कृपेने प्राप्त झालेली सेवा देवच करवून घेत आहे, ती करतांना काही चुका झाल्यास, देव मला माझ्या स्वभावदोषांची जाणीव करून देत मला साधनेत … Read more
‘कुठे सहस्रो दावे प्रलंबित असतांना काही कृती न करणारी आतापर्यंतची सरकारे, तर कुठे जनतेतील एकाने केवळ संशय व्यक्त केल्यावर सीतेचा त्याग करणारे प्रभु श्रीराम ! यामुळे प्रभु श्रीराम अजरामर आहेत, तर राजकारण्यांना जनता काही वर्षांतच विसरते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले