मृत्यू संकट नव्हे, तर संकटांतून सोडवणारा आशीर्वाद वाटणे !

‘७० – ७५ वर्षे आयुष्य जगल्यानंतर काही जणांना जीवनात आलेल्या कटु अनुभवांमुळे जगाचा कंटाळा येतो. अशा परिस्थितीत ‘बाहेर कुणाशी संपर्क नको. ‘मी आणि माझे जग’, यात रहावे’, असे त्यांना वाटते. महत्त्वाचे म्हणजे पुढे ‘आता लवकरच मृत्यू येऊन माझी या जगातून सुटका व्हावी’, असे वाटू लागल्यावर काही जणांना मरणाची ओढ लागते आणि मृत्यू हा संकट नव्हे, … Read more

कलियुगात ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ हाच साधनेचा पाया आहे !

‘सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांत माणसे सात्त्विक होती. त्यांच्यामध्ये स्वभावदोष आणि अहं अल्प होते. त्यामुळे ते कोणत्याही योगमार्गाने साधना करू शकत असत. आता कलियुग आहे. आता सर्वसामान्य मनुष्यामध्ये स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे, म्हणजे तो सात्त्विक नसल्याने त्याला साधना करणे अशक्यप्राय होते. कलियुगातील मनुष्याने प्रथम स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन केल्यास तो … Read more

विज्ञानाचे मूल्य ‘शून्य’ !

मानवाला माणुसकी न शिकवणार्‍या, उलट विध्वंसक अस्त्रे, शस्त्रे देणार्‍या विज्ञानाचे मूल्य शून्य आहे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘साधक’ या टप्प्यावर आल्यावर जिवाकडून होणारी साधना

‘जिज्ञासू साधना करू लागल्यावर तो ‘साधक’ या टप्प्याला येतो. या टप्प्याला आल्यावर साधनेतील ‘अनेकातून एकात येणे’, या नियमानुसार तो कर्मकांडातील पूजा, मंदिरात जाणे, उपवास करणे इत्यादी अनेक उपासनांऐवजी केवळ सांगितलेली साधनाच करतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१५.९.२०२१)

मनुष्यजन्माचा उद्देश !

मनुष्यजन्म हा साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून जिवाची मुक्तता करण्यासाठी आहे. त्यामुळे जे काही भोग शेष राहिले असतील, तेही भोगून संपवावेत. देव जिवाला साधना करून मोक्षप्राप्ती करवून घेण्यासाठी पुन्हा पृथ्वीवर मनुष्यजन्म देतो; पण मनुष्य हे विसरतो आणि मायेच्या मागे लागून संपूर्ण जीवन व्यर्थ घालवतो.’ – श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

व्यवहारातील माणसाचा अहं आणि साधकाचा भाव

‘व्यवहारात माणसाला अहं असतो, ‘माझे आणि माझ्या घरच्यांचे जीवन मी चालवत आहे. मी नसलो, तर माझ्या मागे माझ्या बायका-पोरांचे, नातलगांचे काय होईल ?’ काही कारणामुळे त्या व्यक्तीचे निधन होते. त्या वेळी देव दाखवून देतो, ‘तो मनुष्य नसतांनाही त्याचे घर चालले आहे. त्याचे कुटुंबीय जीवन जगत आहेत.’ मायेमध्ये जगतांना हे जगणे कठीण असते; कारण ‘मी सर्व … Read more

अध्यात्माचे श्रेष्ठत्व !

‘विज्ञान पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांनी समजून घेतात; म्हणून त्याला मर्यादा आहे. याउलट अध्यात्म पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील असल्याने ते अमर्याद आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

खऱ्या मनुष्याचे लक्षण

‘परमात्म्याची कृपा श्रेष्ठ असून संसार मिथ्या आहे, हे कुणालाच आपोआप उमजत नाही. नुसत्या गप्पा येतील; पण आचरण मात्र त्यानुरूप होत नाही. जन्माला आलेल्यास मरण चुकत नाही, लक्ष्मी चंचल आहे, इंद्रियवशतेमुळे नाश ओढवतो’, या सगळ्या गोष्टी ठाऊक नाहीत, असा कुणीही नाही; पण मनातले विचार प्रत्यक्षात आचरणात आणणारे किती निघतील ? मनुष्याची योग्यता त्याच्या आचरणाने सिद्ध होत … Read more

मोक्ष

‘अज्ञानरूपी धुके नष्ट होऊन आत्मरूपाचा प्रकाश सर्वत्र परिपूर्ण असणे, यालाही मोक्ष म्हणतात.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : मासिक ‘श्रीधर-संदेश’, सप्टेंबर १९९९)

धर्म शब्दाचा अर्थ

‘अनिष्टांपासून जगाचे रक्षण करणारे, तसेच मानवाला ऐहिक आणि पारलौकिक उन्नतीसह मोक्ष मिळवून देणारे तत्त्व म्हणजे धर्म ! बहुतेक विदेशी भाषांत ‘धर्म’ शब्दाला समानार्थी शब्दही नाही ! असे असल्यामुळे त्यांना धर्माचरण करणे कठीण जाते.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले