प्रत्येक कार्यात अध्यात्माचा पाया असण्याचे महत्त्व !
ज्या कार्यात अध्यात्माचा पाया नाही, त्यामध्ये देव नाही आणि अशा कार्याला यशही लाभत नाही. -श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (१.५.२०२०)
ज्या कार्यात अध्यात्माचा पाया नाही, त्यामध्ये देव नाही आणि अशा कार्याला यशही लाभत नाही. -श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (१.५.२०२०)
पश्चिमेतील कुणी विद्वान योगसाधनेची प्रशंसा करतो, तेव्हा आम्हाला त्याचे महत्त्व लक्षात येते आणि आम्ही त्याला योगसाधनेच्या नाही, तर योगाच्या रूपात स्वीकारतो. तेसुद्धा त्याच्या मूळ रूपात नाही, तर योगाच्या ८ अंगांपैकी केवळ ३ अंगे म्हणजेच आसन, प्राणायाम आणि ध्यान इथपर्यंतच सीमित रहातो. आज योग हळूहळू शरीर आणि प्राण यांचाच व्यायाम होत चालला आहे. आजचे योगगुरुही यम, … Read more
‘पूर्णतेच्या मार्गाने ज्याला वाटचाल करायची आहे, त्याला अडचणी येणारच. त्याने त्याविषयी कधी तक्रार करू नये; कारण प्रत्येक अडचण ही नवीन प्रगतीची सुवर्णसंधी असते. तसेच तक्रार ही दौर्बल्य आणि निष्ठाशून्यता यांची निशाणी आहे.’ (‘मासिक तत्त्वज्ञान’, १९०७ वैशाख)
‘शारीरिक आणि मानसिक बळांपेक्षा आध्यात्मिक बळ श्रेष्ठ असूनही हिंदू साधना विसरल्यामुळे चिमूटभर धर्मांध आणि इंग्रज यांनी काही वर्षांतच संपूर्ण भारतावर राज्य केले ! आता तसे पुन्हा होऊ नये; म्हणून हिंदूंनी साधना करणे अतिशय आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले
‘ईश्वरप्राप्तीसाठी तन-मन-धनाचा त्याग करायचा असतो. त्यामुळे आयुष्य धन मिळवण्यात फुकट घालवण्यापेक्षा सेवा करून धनाबरोबर तन आणि मन यांचाही त्याग केला, तर ईश्वरप्राप्ती लवकर होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
आपण परमेश्वराचे अंश आहोत; पण काही कारणाने आपण या संसारी जीवनात पडलो आहोत. आता आपल्याला अशा रितीने उत्क्रांत व्हावयाचे आहे की, ज्यायोगे आपण भगवद्धामात परत जाऊ शकू. हीच परमोच्च संसिद्धी (संधी) होय आणि ती मनुष्याला या जीवनात प्राप्त करून घेता येते. – स्वामी श्रील भक्तीवेदांत प्रभुपाद (साभार : आत्मसाक्षात्काराचे विज्ञान)
सिद्ध, अवलिया, योगी आणि संत हे सतत निर्विचार स्थितीत असतात. त्यांना स्वतःचे असे काही विचार नसतात. ‘त्यांचे सर्वच ईश्वरेच्छेने चालू आहे’, याचे ज्ञान त्यांना झालेले असते. हे सिद्ध मायेच्या भौतिक जगात नसून दैवी जगात वावरत असतात. ते सतत ईश्वरी अनुसंधानात असतात. त्यांच्या मनाची निर्विचार स्थिती असल्याने त्यांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता अधिक असते. ते बाह्यतः अतिसामान्य … Read more
ज्ञान अमर्याद आहे. ‘अनंताचे ज्ञान आहे’, असे म्हटले जाते. मग या ज्ञानाला सर्वतोपरी जाणणारा ईश्वरही अनंत नाही का ? या अनंताशी आपल्याला एकरूप व्हायचे असेल, तर आपल्याला किती साधना केली पाहिजे !; म्हणूनच आपल्या साधने संदर्भात आपण कधीच समाधानी असू नये. ‘प्रत्येक दिवशी उत्तरोत्तर साधना करण्याचा ध्यास वाढतच जावा’, हीच त्या अनंताच्या चरणी प्रार्थना ! … Read more
‘संत तुकाराम महाराज यांनी ‘नाम किती घ्यावे ?’, याविषयी सांगितले आहे. ते म्हणतात, ‘‘शिंक येणे, जांभई येणे आणि खोकला येणे, ज्यामुळे भगवंताचे नाम घेण्यात व्यत्यय येईल, इतकाही आमचा वेळ वाया न जावा.’ – श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ
‘लिहितांना अक्षराचे रूप महत्त्वाचे असते, तसा त्याचा उच्चार करतांना तो महत्त्वाचा असतो. जगातील सर्व भाषांमध्ये केवळ संस्कृत भाषेत याला महत्त्व दिले आहे. त्यामुळे भारतात सर्वत्र वेदोच्चार सारखेच आणि परिणामकारक आहेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले