सतत भावावस्थेत रहाण्याचे महत्त्व !
नकारात्मक विचार न येण्यासाठी सतत भावावस्थेत रहावे; कारण भावात आनंद आहे, तसेच भावामुळे भक्त बनलो, तरच देव साहाय्य करतो. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
नकारात्मक विचार न येण्यासाठी सतत भावावस्थेत रहावे; कारण भावात आनंद आहे, तसेच भावामुळे भक्त बनलो, तरच देव साहाय्य करतो. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘भगवंताच्या नामाचे महत्त्व सांगणे, ‘ते कसे घ्यायचे ?’, हे शिकवणे’, हेच खरे शिक्षण आहे. मृत्यूनंतर डोक्यातील ‘गणित आणि विज्ञान’ या सर्व जडातील विषयांची राखरांगोळी होते. केवळ शाश्वत असणारे देवाचे नामच त्या जिवाच्या समवेत जाते. शाळेतील गुरूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्तम गुरु हा जीवनातील खरा मार्गदर्शक आहे. ‘गुरूंचे महत्त्व जे शाळा शिकवत नाही, ती शाळा आणि … Read more
केवळ आधुनिक वैद्य आणि अभियंता अशा पदव्या घेऊन उपयोग होत नाही, तर अध्यात्मातील पदवी घ्यावी लागते, म्हणजेच अध्यात्मात साधना करून प्रगती करावी लागते. मगच देवाची पदवी संपादन करता येते. ‘संत, गुरु आणि सद्गुरु’, अशा देवाने दिलेल्या पदव्यांनी जीवनाचे सार्थक होते. गणित, भूगोल इत्यादी अशाश्वत विषयांमुळे नव्हे, तर गुरुकृपेमुळे आणि गुरूंची शिकवण कृतीत आणून साधना केल्याने … Read more
‘समोर जी व्यक्ती आली, तीच आपला ‘गुरु’ आहे’, असे मानून साधना केली पाहिजे. ‘देव कुणाच्या रूपात येऊन आपली कधी परीक्षा घेईल ?’, हे सांगता येत नाही. त्यामुळे उत्तम शिष्य नेहमीच परीक्षेला सामोरे जाण्यासाठी सिद्ध असतो. देव कधी गुरूंच्या रूपाने परीक्षा घेतो, तर कधी सामान्य माणसाच्या रूपातही तो येतो. आपले नित्य जीवन हीच आपली एक परीक्षा … Read more
‘समाजसेवा ही ‘ईश्वरसेवा’ म्हणून निर्मळ आणि निरपेक्ष भावाने केली, तरच त्यातून साधना होते.’ – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (२४.४.२०२०)
‘इतरांशी बोलतांना त्यांचे होऊनच बोलायला हवे. यामुळे आपल्याला आपले अस्तित्व विसरून सेवा करण्याची सवय लागते. एकदा का अस्तित्व विसरण्याचा सराव झाला की, देवाच्या अधिक जवळ जाता येते आणि मग देहात त्याचे अस्तित्व जाणवू लागते. आपल्या अस्तित्वाचा विसर आणि देवाच्या अस्तित्वाची जाणीव म्हणजे साधना.’ – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (२४.४.२०२०)
‘नामसाधना असली, तरी नामाच्या समवेत आपल्यातील स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी दिवसभरात प्रयत्न नाही केले, तर आपल्या हातून झालेल्या चुकांच्या निवारणामध्ये नामजपामुळे मिळालेली साधनेची ऊर्जा वाया जाते. असे होऊ नये; म्हणून नामसाधनेच्या समवेतच स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याच्या प्रक्रियेला पुष्कळ महत्त्व आहे. बर्याचदा नुसत्या नामसाधनेने प्रगती होत नाही. समाजात आपण बघतो की, अनेक नामधारक … Read more
‘गुणवृद्धी होणे, म्हणजे आपल्यातील ईश्वरी तत्त्व वाढणे.’ – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
‘साधना करणारे ‘पुढचा जन्म नको. साधना करून याच जन्मात मोक्षाला जाऊया’, अशी इच्छा बाळगतात, तर राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना ‘धर्मकार्य करण्यासाठी पुनः पुन्हा जन्म मिळावा’, असे वाटते. ही स्वेच्छा म्हटली, तरी ‘पुढचा जन्म नको’ हीसुद्धा स्वेच्छाच ठरते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘विज्ञान आणि अध्यात्म’ यांचा संगम साधून ‘राष्ट्र आणि धर्म’ यांच्या उत्कर्षासाठी झटणारे फार अल्प आहेत. अशांपैकी आपण एक बनणे, म्हणजे खर्या अर्थाने हिंदुत्व जोपासणे होय.’ – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ