गुरुपादुकांचे मूल्य प्राणापेक्षाही अधिक असणे

एका भक्ताला गुरूंचे दर्शन झाले नाही. दुसरा भक्त गुरूंना भेटला, तेव्हा गुरूंनी त्याच्या पुत्राच्या विवाहानिमित्त त्याला पादुका दिल्या. त्याने हे पहिल्या भक्ताला सांगितल्यावर तो म्हणाला, ‘मला गुरूंच्या पादुका दे, मी तुला माझी जीवनभराची मिळकत देतो.’ दुसऱ्या भक्ताने त्याला पादुका दिल्या. पहिल्या भक्ताने पादुका हृदयाला लावल्या आणि तो नाचू लागला. गुरूंना हे समजल्यावर त्यांनी पहिल्या भक्ताला … Read more

मनापासून विषयांचा त्याग केल्यासच प्रगती होणे

एकदा संत तुकारामांनी आपल्या पत्नीस बराच वैराग्यपर उपदेश केला आणि विषय कसे वाईट आहेत, हे पटवून दिले अन् विठोबाचे नामस्मरण करण्यास सांगितले. उपदेश ऐकून तिच्या मनात वैराग्य आले. दुसऱ्या दिवशी तिने स्नान करून देवपूजा केली आणि ब्राह्मणांस बोलावून सर्व घर लुटवले. घरात काही एक ठेवले नाही. दुपारच्या वेळी घरात अन्न नाही, असे पाहून ती विचारात … Read more

संतांच्या कार्य करण्याच्या पद्धती

काही संत त्यांच्या गुरूंकडून आदेश आल्यावर त्याप्रमाणे कार्य करतात, तर काही संत कार्यासंदर्भात काही प्रश्‍न असल्यास ते गुरूंना सूक्ष्मातून विचारून लगेच उत्तर मिळवतात आणि त्याप्रमाणे कार्य करतात. त्यामुळे त्यांना कार्य लगेच करता येते. – डॉ. आठवले (१८.५.२०१४)

विषय समजून घेण्यासाठी बौद्धिक स्तरापेक्षा आध्यात्मिक स्तर अधिक महत्त्वाचा !

‘सूक्ष्मातले कळायला लागल्यावर सुरुवातीच्या काळात एखाद्याला आगीच्या ज्वाळांनी घेरल्याचे दिसले किंवा जाणवले, तर आग पाण्याने विझते, हे बुद्धीला ज्ञात असल्याने आपतत्त्वाशी संबंधित जलदेवतेचा जप करायला सांगायचो. पुढे अध्यात्माचा अभ्यास झाल्यावर समजले की, आपतत्त्वापेक्षा अग्नी उत्पन्न करणारे तेजतत्त्व अधिक प्रभावशाली आहे. त्यामुळे जलदेवतेचा जप परिणामकारक होणार नाही. तेव्हा तेजतत्त्वाच्या पुढचे तत्त्व म्हणजे वायूतत्त्व किंवा आकाशतत्त्व यांच्याशी … Read more

राजकारण्यांच्या सभा व संतांच्या सभांमधील प्रमुख भेद !

राजकारण्यांना सभेला माणसे पैसे देऊन आणावी लागतात, तर संतांच्या सभांना आणि दर्शनाला हजारो, लाखो येतात आणि अर्पणही देतात ! – डॉ. आठवले (१७.५.२०१४)

मतदान करावे लागणारी ही शेवटची निवडणूक ठरो !

विज्ञानाने मानवाचा अभ्यास करणारी अनेक यंत्रे शोधली आहेत. पुढे त्रिगुणांपैकी व्यक्तीतील प्रधान गुण दर्शवणारे यंत्र शोधले की, निवडणुकीला उभे असणार्‍यांपैकी सात्त्विक कोण ?, हे यंत्र दर्शवील. तो उमेदवार निवडणुकीत जिंकला, असे जाहीर करण्यात येईल. त्यामुळे लोकांना खोटी आश्‍वासने देऊन निवडून येता येणार नाही आणि निवडणुकांवर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च राष्ट्रासाठी वापरता येईल. – डॉ. आठवले … Read more

धर्मशिक्षणाची अत्यावश्यकता !

ख्रिस्ती प्रसारक हिंदूंच्या मनात ख्रिस्ती पंथासंदर्भात श्रद्धा निर्माण करू शकतात, तर जन्महिंदूंच्या मनातही हिंदूंना श्रद्धा निर्माण करता येत नाही; कारण ते धर्मशिक्षण देत नाहीत. – डॉ. आठवले (१५.५.२०१४)

साधनेची अत्यावश्यकता !

आपण स्वतःलाच जिथे साधनेशिवाय जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त करू शकत नाही, तिथे भारतमातेला आणि हिंदु धर्माला आक्रमकांपासून काय मुक्त करणार ? – डॉ. आठवले (१५.५.२०१४)

प्रधान गुण आणि भक्तीयोग यांनुसार पूरक साधना

तमप्रधान अशी व्यक्ती आळशी असून ती नामस्मरण करण्यास कंटाळा करते. अशा व्यक्तीला अवतारांच्या गोष्टी, गुरुचरित्र, शिवलीलामृत इत्यादी मोठ्याने वाचण्यास सांगावे. तिला समजेल अशा सोप्या गोष्टी किंवा भाग वाचण्यास सांगावे, तसेच प्रतिदिन एक सहस्र वेळा नामजप किंवा एकदा विष्णुसहस्रनाम लिहिण्यास सांगावे. रजप्रधान अशी व्यक्ती नामावर मन एकाग्र करू शकत नाही. तिने विष्णुसहस्रनाम, गणेशसहस्रनाम किंवा पुरुषसूक्त इत्यादी … Read more

बुद्धी

माणूस बुद्धीमान आहे. त्याची जिज्ञासा, नवीन गोष्टी जाणण्याची इच्छा जोपर्यंत पुरी होत नाही, तोपर्यंत तो समाधानी नसतो. उत्सुकता हा त्याचा स्वभाव आहे. अज्ञान झाल्याने त्याला सुख मिळते. बुद्धीची दुःखे अ. माझी लैंगिक वासना अजून नाहीशी का होत नाही ? आ. मला अजून देवदर्शन का होत नाही ? अध्यात्माची आवश्यकता दुःखाचे मूळ कारण जाणून त्यापासून कायमची … Read more