सनातनच्या साधकांनो आणि हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनो, हिंदुत्ववाद्यांना राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी सक्षम करण्यासाठी पुढीलप्रमाणे नियोजन करा !

ठिकठिकाणी हिंदुत्ववादी भेटतात. त्यांना राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी काहीतरी करावेसे वाटते. त्यांना त्यासाठी सक्षम करण्यासाठी पुढील क्रमाने शिकण्यास सांगा. १. व्यष्टी साधना : व्यष्टी साधना शिकण्यासाठी सनातनच्या आश्रमात रहा. तेथे ३ – ४ महिन्यांत साधनेचा पाया निर्माण होईल. २. समष्टी साधना अ. समष्टी साधना शिकण्यासाठी निरनिराळ्या जिल्ह्यांत प्रसारासाठी जाणार्‍या समितीच्या प्रसारसेवकांबरोबर जा. आ. तुम्ही शिकलात, … Read more

आयुष्यभर तीच तीच साधना करू नका !

आयुष्यभर एकच साधना करत राहून साधनेच्या त्याच वर्गात राहू नका. त्याऐवजी जाणकारांना विचारून साधना करत पुढच्या पुढच्या वर्गांत जा आणि अंतीम ईश्‍वरप्राप्ती करा ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आदर्श लोकशाही आणि भारतातील लोकशाही !

आदर्श लोकशाही, म्हणजे लोकांचे, लोकांनी स्थापिलेले आणि लोकांसाठीचे राज्य ! (Of the people, by the people and for the people.) याउलट भारतातील लोकशाही म्हणजे राजकारण्यांचे, राजकारण्यांनी स्थापिलेले आणि राजकारण्यांसाठीचे राज्य !, असे असल्याने आता लोकशाही नको, तर हिंदु राष्ट्र हवे, या दृष्टीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधनेचा पाया असल्यामुळे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना कार्यात यश मिळणे, तर इतर हिंदुत्ववादी संघटनांना विशेष यश न मिळणे

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य केवळ १० वर्षांत जगभर पसरले; कारण साधनेमुळे त्यांच्या कार्याला ईश्‍वराचा आशीर्वाद आहे. याउलट इतर हिंदुत्ववादी संघटनांचे कार्य फारच थोडे होते; कारण त्या कार्यकर्त्यांकडून साधना करून घेत नाहीत. त्यांच्याकडून जे काही कार्य थोडेफार होते, त्याचा परिणामही अधिक काळ टिकत नाही. त्यामुळे भारत अधोगतीच्या परिसीमेला गेला आहे. – (परात्पर … Read more

धर्माच्या आधारावर ख्रिस्ती आणि मुसलमान जगभर वर्चस्व गाजवत आहेत. हिंदूंनी…

धर्माच्या आधारावर ख्रिस्ती आणि मुसलमान जगभर वर्चस्व गाजवत आहेत. हिंदूंनी धर्म सोडल्याने त्यांची स्थिती जगात काय; पण भारतातही केविलवाणी झाली आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पूर्ण वेळ साधक होता येत नाही; म्हणून खंत करणार्‍यांनो, घरी राहूनही साधना करता येते, हे लक्षात घ्या !

काही जणांना पूर्ण वेळ साधना करण्याची तीव्र इच्छा असते; पण घरी आई-वडिलांना पहाणारे कोणी नसते किंवा आर्थिक स्थिती चांगली नसते. त्यामुळे ते पूर्ण वेळ साधक होऊ शकत नाहीत. अशांनी पूर्ण वेळ साधना करता येत नाही, अशी खंत करण्यापेक्षा आई-वडिलांची सेवा मायेच्या नात्याने न करता त्यांच्याकडे गुरुरूप म्हणून पाहून सेवा केल्यास साधना होते. श्रावणबाळाने आई-वडिलांची सेवा … Read more

राष्ट्रप्रेमी हिंदूंनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात आपण श्रीरामाच्या वानरसेनेतील वानरांप्रमाणे सहभागी आहोत, हा भाव ठेवा !

असा भाव ठेवला, तर रामराज्याची, म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना होण्याबरोबर आपलाही उद्धार होईल, नाहीतर हिंदु राष्ट्राची स्थापना झाली, तरी अहंभाव जागृत असल्यावर आपला उद्धार होणार नाही. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

कुठल्याही पुरस्कारापेक्षा ६० टक्के पातळी गाठणे किंवा संत होणे, हे महत्त्वाचे !

पद्मभूषण, राष्ट्रपती पदक, नोबेल प्राइस यांपेक्षा ६० टक्के पातळी गाठणे किंवा संत होणे, हे अधिक महत्त्वाचे आहे; कारण त्यामुळे व्यक्ती जन्म-मृत्यूच्या चक्रांतून सुटते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधनेच्या बळावर कार्य करणार्‍या सनातनचा प्रसार जगभर होतो, तर मानसिक…

साधनेच्या बळावर कार्य करणार्‍या सनातनचा प्रसार जगभर होतो, तर मानसिक स्तरावर कार्य करणार्‍या संघटनांचा प्रसार त्यांचे गाव, तालुका, जिल्हा, राज्य किंवा भारत येथेच होतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संतांच्या तुलनेत राजकारण्यांचे महत्त्व शून्य

राजकारणी जनतेला पैसे देऊन आणि वाहनाची सोय करून सभेला बोलावतात. याउलट संतांकडे आणि धार्मिक उत्सवात न बोलावताही भक्त लाखोंच्या संख्येने येतात आणि पैसे अर्पण करतात ! यावरून संतांच्या तुलनेत ‘राजकारण्यांचे महत्त्व शून्य आहे’, हे लक्षात येईल. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले