हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाकरता वेळोवेळी मांडलेले ज्वलंत विचार !

तुम्हा हिंदूंची कुंभकर्णाला लाजवेल, अशी झोप असून ती उडाली नाही, तर झोपेतच तुमचा मुडदा पडेल. ब्रिटनमध्ये मार्गारेट थॅचरबाईंनी मुसलमानांचे लाड चालू दिले नाहीत. तसा पंतप्रधान आपल्याला हवा !

आध्यात्मिकदृष्ट्या भारत विश्‍वगुरु पदावर असतांना तो धार्मिकदृष्ट्या रसातळाला जाण्यामागील कारणमीमांसा

सूर्यप्रकाश पृथ्वीवर येतांना त्यामध्ये ढग आल्यास पृथ्वीवरील त्या भागात काळोख पसरतो, त्याप्रमाणे धर्मसूर्य आणि भारत यांमध्ये मायेचे आवरण आले आहे.

सनातन आश्रमातील कोटा लादीवर आपोआप उमटलेल्या ॐ भोवती पांढरट वलये निर्माण होणे

परमेश्‍वराचा वाचक असणारा ॐ हे एक सात्त्विक चिन्ह आहे. यातून वातावरणात पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होते. लादीवर उमटलेल्या ॐ भोवती बनलेली पांढरट वलये ही या ॐमधून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे बनली आहेत.

ठाणे येथील डॉ. (सौ.) नंदिनी बोंडाळे आणि श्री. रमेश बोंडाळे यांची रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

आश्रमातील साधक व्यष्टी साधनेअंतर्गत राबवत असलेली स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रिया यांविषयी सौ. नंदिनी बोंडाळे अत्यंत प्रभावित झाल्या आणि हे प्रयत्न स्वतः करण्याच्या दृष्टीने त्यांनी आश्रमात चालणार्‍या स्वभावदोष अन् अहं निर्मूलन सत्संगात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित केली.

यजमानांच्या रुग्णाईत अवस्थेत आणि शस्त्रकर्माच्या वेळी अपार गुरुकृपा अनुभवल्याने सौ. पल्लवी हंबर्डे यांनी गुरुचरणी वाहिलेले कृतज्ञतापत्रपुष्प !

श्री. अमोल यांना वेदना होत असल्याने ते सकाळी १० वाजेपर्यंत पुष्कळ अस्थिर होते. आरंभी त्यांचा नामजप होत नव्हता; पण याही स्थितीत त्यांना स्वत:ला काय होत आहे ?, हे रुग्णालयामध्ये नेईपर्यंत कळत होते. पाऊण घंट्यानंतर ते नामजप करू लागले

सनातन संस्थेच्या वतीने कोल्हापूर येथे मकरसंक्रांतीनिमित्त प्रवचन

अंबाई नगर येथे १९ जानेवारीला सनातन संस्थेच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मकरसंक्रात आणि धर्माचरण, तसेच कुलदेव आणि दत्त यांच्या नामाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले.

सर्वस्वाचा त्याग करून साधनेतील आनंद अनुभवणाऱ्या साधकांना आश्रय देणारी आणि त्यांना उच्च लोकांतील अनुभूती देणारी पवित्र वास्तू म्हणजे सनातनचे आश्रम !

सनातनचे आश्रम म्हणजे सर्वस्वाचा त्याग करून तन, मन आणि धन अर्पण करणार्‍या जिवांची वास्तू ! येथे रहाणारे साधक स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी आलेले अन् जीवनातील एकेक क्षण याचकभावाने जगणारे असतात.

आर्यांचे भारतावरील आक्रमण : राजकीय आणि धार्मिक स्वार्थासाठी रचलेले एक कुभांड

आर्य-आक्रमण सिद्धांतामुळे केवळ वेदांनाच हीन लेखता आले, असे नसून पुराणांनाही क्षुद्र ठरवता आले. बुद्ध, कृष्ण यांच्याही पूर्वी होऊन गेलेल्या शेकडो पराक्रमी राजांच्या इतिहासावर काल्पनिक भारुडे असल्याचा आरोप करण्याचे कारस्थान साधता आले.

भारतात २०० वर्षांपूर्वी डोळ्यांची शस्त्रक्रिया !

प्राप्त झालेल्या नोंदींनुसार राजा सरफोजी ‘धन्वंतरी महल’ नावाचे डोळ्यांचे चिकित्सालय चालवत होते. राजा सरफोजी यांना नेत्ररोगांचा विशेषज्ञ म्हणून लोक ओळखत असत. एक इंग्रजी वैद्य मैक्बीन हे त्यांचे सहकारी म्हणून काम पहात होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी रात्री आकाश, डोंगर आणि झाडे यांकडे पाहिल्यानंतर त्यांच्या रंगांत थोडासा पालट होणे आणि त्यांचा तेजस्वीपणा वाढणे, या वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक घटनेमागील कारण जाणण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी

रात्रीच्या वेळी आकाश, झाडे आणि डोंगर यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्या रंगात थोडा पालट झाल्याचे आणि त्यांचा तेजस्वीपणा वाढल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या लक्षात आलेे. हे पालट का आणि कसे होतात ?, हे जाणण्यासाठी डोळ्यांना दिसलेली ही वैशिष्ट्यपूर्ण घटना छायाचित्रकात (कॅमेरात) टिपण्याचा या चाचणीचा उद्देश होता.