ज्येष्ठ नागरिकांचा कुटुंबात आणि समाजात होणारा शारीरिक, मानसिक अन् आर्थिक छळ

या विभक्त कुटुंबपद्धतीमुळे ज्येष्ठ नागरिकांचा स्वतःची मुले, सून, समाज यांच्याकडून विविध प्रकारे कशा प्रकारे छळ होत आहे, याची काही उदाहरणे येथे देत आहोत.

वृद्धाश्रमांची व्यथा !

कोरोनामुळे ज्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यांपैकी एक म्हणजे वृद्धांना सांभाळण्याची समस्या. आधीच वृद्धाश्रमात आई-वडिलांना ठेवण्याची मानसिकता समाजात वाढत असतांना त्यात कोरोना महामारीचे निमित्त झाले.

युवकांनो, स्वातंत्र्यापूर्वीच्या क्रांतिकार्यातील युवकांचा आदर्श घ्या !

भारताला स्वतंत्र करण्यासाठी ज्या राष्ट्रप्रेमाने युवक भारित झाले होते, तशाच तळमळीने आणि प्रेरणेने युवक राष्ट्रहितासाठी सर्वस्व झोकून देऊन प्रयत्न केले, तर भारत पुनश्‍च वैभवाच्या शिखरावर जाण्यास वेळ लागणार नाही ! यासाठी स्वातंत्र्यपूर्वकाळातील देशकार्याला वाहून घेतलेल्या युवकांची गुणवैशिष्ट्ये जाणून घेणे आवश्यक आहे !

आध्यात्मिक त्रासामुळे साधकाच्या मनात येणारे आत्महत्येचे विचार साधनेमुळे नाहीसे होऊन त्याचे रक्षण होणे, याचे सौ. योया वाले यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण

साधक साधना करत असल्याने, तसेच त्याच्यात ईश्‍वराप्रती भाव असल्याने ईश्‍वराकडून त्याला चांगली शक्ती मिळते. त्यामुळे ‘आत्महत्येचा विचार हा माझा नसून वाईट शक्तीने माझ्या मनात घातला आहे’, हे त्याच्या लक्षात येते आणि साधक सतर्क होतो.

वाईट शक्तीच्या आक्रमणामुळे व्यक्ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होणे, याचे सौ. योया वाले यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण

ज्या व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या आहेत, ज्या व्यक्तीमध्ये अहं आणि भावनाशीलता आहे, त्या व्यक्तीकडे वाईट शक्ती आकृष्ट होतात. वाईट शक्ती व्यक्तीच्या मनात तिच्या जीवनाविषयी नकारात्मक विचार घालून तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचे काम करते.

इच्छामरण (आत्महत्या) किंवा दयामरण, प्रायोपवेशन आणि संतांनी समाधी घेणे

रोगाने आजारी असलेल्या व्यक्तीने तिच्या इच्छेनुसार आत्महत्या करणे, याला ‘इच्छामरण’ म्हणतात. असाध्य रोगाने आजारी असलेला रुग्ण निर्णय घेण्यास असमर्थ असतांना कुटुंबियांच्या इच्छेनुसार डॉक्टरांनी आणलेल्या मृत्यूस ‘दयामरण’ म्हणतात. अशा प्रकारे मृत पावलेल्यांना मृत्यूत्तर सद्गती लाभत नाही; म्हणून धर्मशास्त्रांनी आत्महत्येचा निषेध केला आहे.

आत्महत्या करण्याचा विचार करणार्‍यांनो, मनुष्यजन्माचे कारण लक्षात घेऊन आत्महत्येचा विचार करू नका !

ईश्‍वराने मनुष्यजन्म दिला आहे, तर ईश्‍वरप्राप्ती व्हायला हवी. तसेच मनुष्याचा जन्म प्रारब्धभोग भोगून संपवणे आणि आध्यात्मिक उन्नती करणे’, या दोन कारणांसाठी होत असल्याने मृत्यूचा विचार करायचा नाही.

आत्महत्येमुळे समस्या सुटत नाहीत !

‘आजच्या काळात जन्मलेली पिढी सर्वच विषयांत अग्रेसर असली, तरी आयुष्याचे मोल जाणून घेण्यात कुठेतरी अल्प पडत असल्याचे चित्र दिसत आहे. क्षुल्लक कारणांनी १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुले थेट मृत्यूला कवटाळत आहेत. आत्महत्या करून आयुष्य संपवून टाकण्याच्या या पिढीचा टोकाचा अविचारी मार्ग चिंतेचा विषय बनला आहे.

योग्य आध्यात्मिक दृष्टीकोन आत्मबळ वाढवतात !

गरीबात गरीब भारतियालाही आध्यात्मिक दृष्टीकोन माहीत असतात; उदा. ‘जीवनात येणारे दुःख हे प्रारब्धामुळे असून ते भोगून संपवण्यासाठी हा जन्म आहे.’ हा अध्यात्मशास्त्रीय दृष्टीकोन आहे. हा दृष्टीकोन सहनशीलता पुष्कळ प्रमाणात वाढवतो, सहन करण्याची क्षमता वाढवतो.