सनातन संस्थेच्या वतीने कोल्हापूर येथे मकरसंक्रांतीनिमित्त प्रवचन

रेंदाळ (जिल्हा कोल्हापूर) – येथील अंबाई नगर येथे १९ जानेवारीला सनातन संस्थेच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सनातनच्या सौ. अंजली कोटगी यांनी मकरसंक्रात आणि धर्माचरण, तसेच कुलदेव आणि दत्त यांच्या नामाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला ५० महिला उपस्थिती होत्या.

जळगाव

येथील जिल्हाधिकारी श्री. किशोरराजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, जिल्हा माहिती कार्यालय, दैनिक जनशक्ती, सकाळ, देशदूत, लोकमत, दिव्य मराठी, तरुण भारत, पुण्यनगरी, साईमत, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, सामना, भास्कर, साप्ताहिक केसरीराज या वृत्तपत्रांचे संपादक, पत्रकार, प्रतिनिधी तसेच आपतक, शौर्य मराठी, इन केबल, ईबीएम न्यूज या वाहिनीचे संचालक यांना भेटून तीळगूळ वाटप करण्यात आले. तांबापुरा, सम्राट वसाहत येथे एक मासापासून चालू असलेल्या धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींसाठी हिंदु जनजागृती समितीचे श्री. गजानन तांबट यांनी मकरसंक्रांतीनिमित्त विशेष वर्ग आयोजित करून सर्वांना तीळगूळ वाटप केले. सर्वांनी संघटितपणे धर्मकार्य करण्याची प्रतिज्ञा घेतली.

वरद वसाहतीतही धर्मप्रेमी श्री. नितीन पाटील यांच्यामुळे चालू करण्यात आलेल्या धर्मशिक्षणवर्गातील सर्वांनी तीळगूळ वाटप केले. या वसाहतीचे वैशिष्ट्य म्हणजे येथील सर्व नागरिक संघटित असून त्यांनी आध्यात्मिक सामर्थ्य लाभावे म्हणून हनुमान मंदिराची उभारणी केली आहे.

मान्यवरांच्या प्रतिक्रिया

१. आज हिंदुत्वाला मिळणारा प्रतिसाद म्हणजे १० वर्षांपासून हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या कार्याची पोचपावती होय. हिंदुत्व डावलून कोणताही राजकीय पक्ष यशस्वी वाटचाल करूच शकत नाही, असे वातावरण जळगाव शहरात निर्माण झाले आहे. – श्री. शेखर पाटील, संपादक, दैनिक जनशक्ती

२. हिंदु जनजागृती समितीचे कार्य जवळून पहाण्याची इच्छा आहे. – श्री. दगडकर अन् श्री. महाबळ, दैनिक तरुण भारत

धुळे

येथे शहर पोलीस अधीक्षक श्री. एम्. रामकुमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गांगुर्ढे, शहरआयुक्त श्री. सुधाकर देशमुख, महापौर सौ. कल्पना महाले, नगररचना विभागाचे श्री. कमलेश सोनवणे, श्री. रावसाहेब, श्री. नवले, श्री. कोतवाल, श्री. बहालकर, पाणी पुरवठा विभागाचे श्री. रावसाहेब ओगले यांची वैयक्तिक भेट घेऊन तीळगूळ देण्यात आले. तसेच हिंदु एकता पक्षचे श्री. मनोज घोडके यांच्या पत्नीने हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

धुळे येथील धर्मजागृती सभेनंतर श्री एकविरा माता मंदिरात धर्मशिक्षण वर्ग चालू करण्यात आला आहे. त्यातील १५ धर्माभिमानी युवकांनी परिसरातील १०८ हिंदूंच्या घराबाहेर श्रीराम जय राम जय जय राम ही पट्टी लावून तीळगूळ देऊन घरातील मोठ्या व्यक्तींना नमस्कार करून धर्मशिक्षण वर्गाला उपस्थित रहाण्याचे आवाहन केले. प.पू. बापू भंडारी यांच्या मंदिराला भेट दिली. तेथील श्री. भंडारी म्हणाले, प.पू. डॉ. आठवले यांचे चरण या मंदिरास लागले आहेत. त्यांनी समिती आणि सनातनच्या कार्याविषयी आनंद व्यक्त केला.

चोपडा (जळगाव)

येथील पंकज शैैक्षणिक आणि सामाजिक संस्था संचलित, पंकज विद्यालयात १८ जानेवारीला, तर सरदार वल्लभभाई पटेल सेवाभावी शैक्षणिक संस्था संचलित साई इंग्लिश मिडियम स्कूल येथे १९ जानेवारीला मकरसंक्रांतीनिमित्त महिला पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात हिंदु जनजागृती समितीच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी सुसंस्कार  काळाची आवश्यकता या विषयावर उपस्थित महिला पालकांचे प्रबोधन केले. संयोजकांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले.

पंकज विद्यालयातील मेळावा पंकज शैैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ. हेमलता सुरेश बोरोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या वेळी सौ. प्रतिभा बोरोले, सौ. रत्नमाला देसाई, सौ. विजयाताई भारंबे, प्राचार्य डॉ. संभाजी देसाई, मुख्याध्यापक श्री. एम्.व्ही.पाटील, सौ. नीता पाटील, सौ. रेखा पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाला ४०० महिला पालकांची उपस्थिती होती, तर साई इंग्लिश मिडियम स्कूल येथील कार्यक्रम सरदार वल्लभभाई पटेल सेवाभावी शैक्षणिक संस्थेच्या सचिव सौ. स्नेहलता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमाला १०० महिला उपस्थित होत्या.

मुंबई

येथे २४ ठिकाणी आनंदी जीवनासाठी साधना, मकरसंक्रांतीमागील अध्यात्मशास्त्र आदी विषयांवर प्रवचने घेऊन अधात्मप्रसार करण्यात आला. यामध्ये आपत्कालीन साहाय्य करता यावे, यासाठी प्रथमोपचारवर्गही घेण्यात आले. जुईनगर, ऐरोली, भांडुप, घाटकोपर, विक्रोळी, सांताक्रूझ, अंधेरी, माहिम आदी ठिकाणी घेण्यात आलेल्या या प्रवचनांचा लाभ शेकडो जिज्ञासूंनी घेतला.

विक्रोळी येथील साई मंदिराच्या ट्रस्टच्या वतीने हळदी-कुंकू समारंभाला आलेल्या सर्व महिलांना सनातनची सात्त्विक उदबत्ती वाण म्हणून देण्यात आली. घाटकोपर येथील तनिष्का सौंदर्यवर्धनालय येथे झालेल्या प्रवचनात जिज्ञासूंनी ४० हून अधिक अध्यात्मविषयीच्या ग्रंथांची खरेदी केली.

सांगली

तुजारपूर (जिल्हा सांगली) येथे संक्रांतीनिमित्त हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात प्रवचन

तुजारपूर (तालुका वाळवा) – येथे मकरसंक्रांतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २१ जानेवारीला हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात हिंदू विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या सौ. भारती जैन यांचे प्रवचन झाले. त्यांनी संक्रांत आणि साधनेचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी वाण म्हणून सनातननिर्मित देवतांच्या सात्त्विक नामपट्ट्या आणि देवतांची छायाचित्रे महिलांना देण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन धर्मशिक्षण वर्गातील महिलांनी केले होते.

Leave a Comment