राजीम कुंभमेळा (छत्तीसगड) येथे सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाचे पू. राम बालकदास महात्यागी यांच्या हस्ते उद्घाटन !

सनातन संस्थेच्या वतीने येथील राजीम कुंभमेळ्यामध्ये धर्म आणि अध्यात्म या विषयांवरील ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले, तसेच धर्मशिक्षण फलकांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

मुंबई, ठाणे, रायगड येथे सहस्रावधी जिज्ञासूंनी दिली सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांत महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शंकराच्या मंदिराच्या परिसरात सनातन संस्थेच्या वतीने १३६ ठिकाणी ग्रंथप्रदर्शने लावण्यात आली होती. त्यांना सहस्रावधी जिज्ञासूंनी भेट देऊन सनातनचे विविधांगी ग्रंथ आणि सनातनची सात्त्विक उत्पादने खरेदी केली.

कुलदेवतेचे नामस्मरण केल्याने कलियुगात कल्याण होईल ! – चेतन राजहंस, सनातन संस्था

ज्या कुळात आपला जन्म झाला आहे, त्या कुलदेवतेचे नामस्मरण करा. ती आपल्या प्रारब्धाशी संबंधित देवता आहे. आपली साधना वाढल्यावर आपल्याला जीवनात सद्गुरु भेटतील. नामस्मरण केल्यास जीवनाचे कल्याण होईल, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले.

मुझफ्फरपूर (बिहार) येथे शिवजयंतीच्या उत्सवात सनातन संस्थेचा सहभाग

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘विश्व सनातन सेने’चे तिरहुत विभागाचे श्री. अनिल कुमार यांनी शिवजयंती उत्सव आयोजित केला होता. या उत्सवामध्ये सनातन संस्थेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले.

देहली येथील ‘जागतिक पुस्तक मेळाव्या’त सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला मान्यवरांची भेट

येथील प्रगती मैदानावर १० ते १८ फेब्रुवारी या कालावधीत ‘जागतिक पुस्तक मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने हिंदी आणि इंग्रजी भाषेतील ग्रंथांचे प्रदर्शन दोन वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आले.

इंदूर (मध्यप्रदेश) येथील ‘तरुण जत्रा’ मेळाव्यात सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्मप्रसार

प्रतिवर्षीप्रमाणे चालू वर्षीही येथील दशहरा मैदानावर ‘तरुण जत्रा’ या मराठी पदार्थ आणि संस्कृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सनातन संस्थेच्या वतीने धर्म, अध्यात्म, बालसंस्कार आदी विविध विषयांवरील ग्रंथ आणि सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

सनातन संस्थेद्वारा हरमल, गोवा येथे आयोजित ‘जाहीर साधना प्रवचन’ संपन्न !

सनातन संस्थेद्वारे हरमल गोवा येथे आनंदी जीवनासाठी अध्यात्म  या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. सौ. शुभ सावंत व सौ. अंजली नायक यांनी जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. ह्यावेळी ४० हून अधिक जिज्ञासू व्याख्यानाला उपस्थित होते.

श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त सनातन संस्थेकडून देशभरात चालवण्यात येत असलेले ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियान’ !

सातारा, वाई, संभाजीनगर, कोरेगाव येथे सनातन संस्थेकडून ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियान’ !

श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त सनातन संस्थेकडून ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियान’ !

सनातन संस्थेकडून देशभरात ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियाना’द्वारे ठिकठिकाणी श्रीरामनाम जप, श्रीरामाकडे रामराज्यासाठी प्रार्थना, तसेच श्रीरामांचा गुणगौरव करण्यात येणार आहे.

गोवा राज्यात सनातन संस्थेचे जाहीर साधना प्रवचन

सनातन संस्थे द्वारा आनंदी जीवनासाठी साधना या विषयावर जाहीर साधना प्रवचनाचे गोव्यात म्हपसा (6.01.2024) आणि वाळपई (7.01.2024) येथे आयोजन !