प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रात्मक स्मृती !

प.पू. भक्तराज महाराज यांनी स्वतः वास्तव्य केलेल्या मध्यप्रदेशमधील मोरटक्का आणि इंदूर येथील आश्रमांतील चैतन्यदायी वास्तूचे छायाचित्रात्मक दर्शन घेऊया.

१०० व्या वर्षात पदार्पण करत असलेले योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

योगतज्ञ दादाजींचे पितृवत छत्र लाभणे, ही ईश्‍वराने सनातनवर केलेली मोठी कृपा असून त्यामुळेच सनातन संस्थेच्या कार्याचा विस्तार होत आहे.

साक्षात ईश्‍वराने सनातनला दिलेले अनमोल आणि दिव्य कृपाछत्र : योगतज्ञ दादाजी वैशंपायन !

योगतज्ञ दादाजींची सनातनशी भेट होणे, हे ईश्‍वराचे सुंदर नियोजन असून दिव्य सिद्ध मंत्र आणि योगसामर्थ्य यांमुळे त्यांनी अनेक साधकांच्या प्राणांचे रक्षण केले आहे. त्यांनी सिद्ध केलेले मंत्र, ते स्वतः करत असलेली अनुष्ठाने आणि इतर अनेक दिव्य उपचार यांमुळे साधकांभोवती दिव्य संरक्षक-कवच निर्माण होऊन त्यांच्या आध्यात्मिक त्रासाचे प्रमाण न्यून होत आहे.

ईश्‍वराशी एकरूप झालेले आणि निर्गुण स्थितीत असलेले योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या काही अनमोल भावमुद्रा !

‘ईश्‍वर हा सर्वगुणसंपन्न आहे, तसेच तो दोषविरहित आहे. साधना करून ईश्‍वराशी एकरूप होत गेल्यावर त्याची अधिकाधिक गुणवैशिष्ट्ये आपल्यात येतात आणि आपला देहही ईश्‍वरासमान तेजस्वी बनतो. गेली अनेक वर्षे कठोर तपःसाधना केलेले योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचा देहही अनेक दैवी गुणवैशिष्ट्यांनी विभूषित आहे. मे २०१९ मध्ये काढलेल्या त्यांच्या खालील छायाचित्रांत त्यांची अध्यात्मातील अत्युच्च अशी निर्गुण स्थिती दिसून … Read more

‘परात्पर गुरु डॉक्टरांचे आरोग्य चांगले रहावे आणि ईश्‍वरी राज्याची स्थापना व्हावी’, यांसाठी चेन्नईतील जीवनाडीपट्टीच्या वाचनातून भृगु महर्षींनी सांगितलेले काही परिहार अन् सनातन संस्थेला दिलेला आशीर्वाद !

‘२.५.२०१९ या दिवशी चेन्नई येथील भृगु जीवनाडीपट्टीचे वाचक श्री. सेल्वम्गुरुजी यांच्या निवासस्थानी वर्ष २०१९ मधील चैत्र मासातील विहारी संवत्सरामधील पहिले नाडीवाचन झाले.

सत्यनारायण कथेचे उगम क्षेत्र असलेल्या ‘नैमिषारण्य’ या तीर्थक्षेत्राचे माहात्म्य !

नैमिषारण्य उत्तरप्रदेश राज्याची राजधानी लक्ष्मणपुरी (लखनऊ) पासून ९० कि.मी. अंतरावर असलेल्या सीतापूर जिल्ह्यात आहे. ते गंगानदीची उपनदी असलेल्या गोमती नदीच्या डाव्या तिरावर आहे.

गुजरातमधील सारंगपूर येथील कष्टभंजन हनुमान मंदिर, वेरावल येथील ‘भालका तीर्थ’ आणि सोमनाथ येथील ज्योतिर्लिंग

गुजरात येथील स्वामीनारायण संप्रदायाचे गुरु स्वामी गोपालानंद सारंगपूर गावात आले असता त्यांना समजले, ‘अनेक वर्षे त्या भागात पाऊस न पडल्याने सगळे ओस पडले आहे.’ त्या वेळी त्यांनी हनुमंताला प्रार्थना केली आणि ईश्वरी प्रेरणेने त्या ठिकाणी हनुमंताची स्थापना केली.

मलेशिया येथील तीन सिद्धांची समाधीस्थाने

‘२६.१.२०१९ या दिवशी पू. (डॉ.)ॐ उलगनाथन्जी यांनी भ्रमणभाषवरून सांगितले, ‘सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ६ ते १३.३.२०१९ या कालावधीत मलेशिया येथे जाऊन तेथील सिद्धांची समाधीस्थाने शोधून काढावीत.’

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना पंढरपूर येथील मंदिरात दर्शनाला गेल्यावर आशीर्वादरूपात मिळालेला विठ्ठलाच्या डोक्यावरील मोरपिसांचा अलंकार !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मंदिरात आल्या. जेव्हा त्यांना लांबूनच विठ्ठलाचे दर्शन झाले, तेव्हा त्यांना विठ्ठलाच्या डोक्यावर मोरपिसांचा अलंकार घातलेला दिसला.

किन्नीगोळी, कर्नाटक येथील संत प.पू. देवबाबा यांची लक्षात आलेली विविध आध्यात्मिक वैशिष्ट्ये

प.पू. देवबाबा यांनी अनेक वने आणि विविध ठिकाणी जाऊन खडतर तपश्चर्या केली आहे. त्यांची ही तपश्चर्या अजूनही चालू आहे. हे त्यांच्या दिनक्रमावरून लक्षात येते.