एक साधक नियमित वापरत असलेल्या उपनेत्राच्या (चष्म्याच्या) काचेवर सप्तरंगी वर्तुळे उमटणे

साधनेमुळे व्यक्तीची आध्यात्मिक पातळी वाढत जाते, तसतसे तिच्यात अनेक वैशिष्ट्यपूर्ण सकारात्मक पालट होत जातात आणि त्याचा सुपरिणाम सभोवतालच्या घटकांवरही होऊ लागतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील वायुतत्त्वामध्ये वाढ झाल्याने त्यांच्या खोलीतील स्नानगृहातील दगड वायुतत्त्वरूपी चैतन्याच्या स्पर्शामुळे गुळगुळीत होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील वायुतत्त्वाचे प्रमाण वाढले आहे. या वायुतत्त्वरूपी चैतन्याच्या स्पर्शामुळे त्यांच्या खोलीतील लाद्या, स्नानगृहातील लाद्या आदी घटक गुळगुळीत झाले आहेत.

कु. अपाला आैंधकर आणि कु. प्रिशा सभरवाल या दैवी बालिकांनी नृत्याच्या वेळी केलेल्या रंगभूषेचा (मेकअपचा) त्यांच्यावर झालेला परिणाम

पूर्वीच्या काळी रंगभूषेत सात्त्विक अलंकार, सात्त्विक पोषाख, सात्त्विक केशरचना, सुगंधी पुष्पे अशा घटकांचा उपयोग केला जात असे. ‘आताची रंगभूषा केल्यामुळे नृत्य करणार्‍यावर त्याचा काय परिणाम होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी एक चाचणी घेण्यात आली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील प्रकाशात वाढ होणे, तसेच खोलीतील दंडदीपाचा तेजस्वीपणाही वाढणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अस्तित्वामुळे त्यांच्याकडून प्रक्षेपित होणा-या चैतन्याचा केवळ त्यांच्या खोलीतील वातावरणावरच परिणाम झाला, असे नसून त्या खोलीतील प्रत्येक वस्तूवरच झाला आहे. त्यामुळे त्यांच्या खोलीतील दंडदीपावरही तो झाला असून ती चैतन्यमय झाली आहे.

गुरुकृपायोगानुसार साधनेअंतर्गत स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवल्यामुळे साधकांना झालेला आध्यात्मिक स्तरावरील लाभ

जीवनात कोणत्याही कठीण प्रसंगी मानसिक संतुलन बिघडू न देता त्या प्रसंगाला धैर्याने तोंड देता यावे, तसेच नेहमी आदर्श कृती व्हावी, यासाठी व्यक्तीचे मनोबल उत्तम अन् व्यक्तीमत्त्व आदर्श असणे आवश्यक असते. स्वभावदोेष व्यक्तीचे मन दुर्बल करण्यास कारणीभूत ठरतात

काळा आणि पांढरा या रंगांचे पोषाख परिधान केल्यावर त्यांचा तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी ‘ईश्‍वरनिर्मित सृष्टी अनेकविध रंगांनी नटली आहे. भूमी मातकट रंगाने, तर वृक्षवल्ली हिरव्या रंगाने नटलेल्या आहेत. ‘आपल्या जीवनात रंग नसते, तर….’, अशी एक क्षण कल्पना करून पहा. असे झाले असते, तर जीवन निरस झाले असते. पांढरा हा सप्तरंगांना सामावून घेणारा रंग आहे. सध्या समाजात … Read more

पखवाजवादनाचा (मृदंगवादनाचा) वाद्य, वादक, वनस्पती, पक्षी, तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक यांवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

‘पखवाज वाजवतांना प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वाद्य, वादक, वनस्पती, पक्षी, तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक, यांच्यावर काय परिणाम होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली.

सद्गुरु सत्यवान कदम यांनी लावलेल्या ध्यानाचा त्यांच्या स्वतःवर आणि तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर झालेला परिणाम

‘उच्च पातळीच्या संतांनी तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांसमवेत नामजपादी उपाय करण्यासाठी लावलेल्या ध्यानाचा त्यांच्या स्वतःवर आणि त्या साधकांवर काय परिणाम होतो ?’, हे जाणण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयानेे एक चाचणी घेतली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अभ्यासिकेच्या आगाशीतून रस्त्यावरील दिवा पुष्कळ तेजस्वी आणि भोवती मोठे वलय असलेला दिसणे, या वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक घटनेमागील कारण जाणण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना रात्रीच्या वेळी आश्रमाच्या परिसराला लागूनच असलेल्या रस्त्यावरील एका दिव्याभोवती पुष्कळ मोठे वलय असल्याचे आणि त्याचा तेजस्वीपणा वाढल्याचे लक्षात आलेे. ‘हे पालट का आणि कसे होतात ?’, हे जाणण्यासाठी डोळ्यांना दिसलेली ही वैशिष्ट्यपूर्ण घटना छायाचित्रकात (कॅमेर्‍यात) टिपण्याचा या चाचणीचा उद्देश होता.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेली संस्कारित दत्तमूर्ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक उपायांसाठी वापरल्यानंतर त्या दत्तमूर्तीवर झालेला परिणाम

‘दत्तमूर्तीचा उपयोग परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक उपायांसाठी (मूर्तीला स्पर्श करून मंत्रपठण करणे) करण्यापूर्वी आणि केल्यानंतर तिच्या आध्यात्मिक वैशिष्ट्यांचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करणे’, हा या चाचणीचा उद्देश होता.