‘Paranoid personality disorder’ या मानसिक विकारावर उपाय म्हणून सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप केल्यावर साधकाला स्वतःत जाणवलेले पालट !
यापूर्वी मला दिवसातून ४ – ५ वेळा खायला लागायचे आणि सतत भूक लागलेली असायची, तसेच त्रास वाढल्यावर मी अधिक खायचो. जानेवारी २०२३ पासून मला खाण्यावर नियंत्रण ठेवता येते. आता माझे दिवसातून केवळ २ किंवा अधिकाधिक ३ वेळा खाणे होते. यामुळे मागील ४ मासांत माझे वजन ८ किलो न्यून झाले आहे.
