सर्वस्वाचा त्याग करून साधनेतील आनंद अनुभवणाऱ्या साधकांना आश्रय देणारी आणि त्यांना उच्च लोकांतील अनुभूती देणारी पवित्र वास्तू म्हणजे सनातनचे आश्रम !

कु. सुषमा पेडणेकर

१. समाजातील काही अज्ञानी लोकांचे आश्रमाविषयीचे अपसमज !

समाजातील काही अज्ञानी लोक आश्रमाला तुच्छ लेखतात. त्यांना वाटते, आश्रम म्हणजे अनाथाश्रम किंंवा ज्या व्यक्तींची काळजी घेण्यासाठी कुणी नाही, त्यांना आणून सोडतात ती जागा किंवा जे गरीब आहेत आणि ज्यांच्याकडे स्वतःचे पालन-पोषण करण्यासाठी पैसे नाहीत, त्यांना रहाण्यासाठी दिलेली जागा !

त्यामुळे त्यांच्या मनात पुढील प्रश्‍न निर्माण होतात, एवढा मोठा अनाथाश्रम कोण चालवतो ? तिथे रहाणार्‍या व्यक्ती कशा आहेत ?

२. आश्रमजीवनातील आनंद अनुभवणार्‍या साधकांसाठी सुखोेपभोग,
ऐश्‍वर्य इत्यादींची किंमत शून्य असणे आणि समाजातील लोकांनी साधकांना वेडे ठरवणे

समाजातील लोक सनातनच्या आश्रमातील साधकांना वेडे समजतात. याचे कारण म्हणजे आश्रमातील लहानापासून वयस्कर साधकांपर्यंत कुणालाही व्यावहारिक जीवन आवडत नाही. उलट ते व्यवहारातील सर्व ऐहिक सुखांचा, ऐश्‍वर्याचा, तन, मन आणि धन यांचा त्याग करतात आणि आश्रमजीवन जगतात. साधना करणार्‍या व्यक्तीसाठी सुखोेपभोग, ऐश्‍वर्य इत्यादींची किंमत शून्य असते. त्या त्यागाचा तिला कधीही पश्‍चात्ताप होत नाही. ती चिरंतन आनंद अनुभवत असते.

३. ईश्‍वराच्या चरणी याचकभावाने राहिल्यामुळे
जगात सर्वांत श्रीमंत आणि भाग्यवान असलेले सनातनचे साधक !

सनातनचे आश्रम म्हणजे सर्वस्वाचा त्याग करून तन, मन आणि धन अर्पण करणार्‍या जिवांची वास्तू ! येथे रहाणारे साधक स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी आलेले अन् जीवनातील एकेक क्षण याचकभावाने जगणारे असतात. ईश्‍वराच्या चरणी याचकभावाने राहिल्यामुळे जगात तेच सर्वांत श्रीमंत आणि भाग्यवान आहेत.

आश्रमजीवन जगणारी व्यक्ती व्यावहारिक जीवनात कितीही मोठी असली, तरी ती आश्रमात असतांना तिच्या मनात व्यावहारिक जीवनाविषयी कसलेही विचार नसतात. तिने संपूर्णपणे आपले सर्वस्व देवाच्या चरणी समर्पित केलेले असल्यामुळे तिच्या मनात केवळ देवाचे आणि देवाचेच विचार असतात.

४. सनातनच्या आश्रमांचे वर्णन करायला आकाशाएवढा
कागदही अपुरा पडेल; कारण येथे प्रत्यक्ष ईश्‍वराला अनुभवता येते !

सनातन आश्रमांचे वर्णन करण्यासाठी शब्दही अपुरे आहेत. आकाशाएवढा कागद घेतला, तरी त्यांचे वर्णन करण्यासाठी अपुराच आहे. सनातनचे आश्रम म्हणजे व्यक्तीमधील दुर्गुण घालवून वाईट व्यक्तीला चांगले करण्याचे स्थान; दुःखाकडून आनंदाकडे घेऊन जाणारे क्षेत्र; भावाच्या नदीमध्ये डुंबवणारी भावनदी; शक्ती, चैतन्य, आनंद आणि शांती अनुभवण्याचे स्थान, तीव्र प्रारब्धावर मात करून आनंदाने जगण्याचे स्थान !

५. सनातनच्या आश्रमात स्थूल-सूक्ष्म अन् सजीव-निर्जीव हे सर्व साधकच असणे
आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांची जिवंतपणी अन् मृत्यूनंतरही काळजी घेणे

सनातनच्या आश्रमातील प्रत्येक स्थूल आणि सूक्ष्म; सजीव आणि निर्जीव गोष्टी या साधकच आहेत. त्यांच्याकडून सतत शिकायला हवे. आश्रम म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विशाल रूप आहे. या विशाल रूपात सामावलेल्या साधकांची परात्पर गुरु डॉक्टर जिवंतपणी काळजी आणि दायित्व घेतात. एवढेच नाही, तर मृत्यूनंतरही त्यांच्या साधनेचे दायित्व घेऊन त्यांचे वाईट शक्तींपासून रक्षण करतात. येथे आपण बुद्धीच्या पलीकडे जाऊन ते अनुभवू शकतोे. हे स्थान सर्वांसाठीच सातत्याने उघडे असते. येथे व्यक्तींमध्ये लहान-मोठा असा भेदभाव केला जात नाही.

६. भगवंताच्या विविध अवस्था अनुभवता येणे

सकाळी उठल्यावर माझ्या मनात आज देवाविषयी काय भाव ठेवूया ?, असा विचार आला. त्यानंतर आपण आश्रमात रहातो, तर आपण भगवंताच्या स्थूल, सूक्ष्म, सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम या सर्व अवस्था अनुभवू शकतो, असा विचार येऊन मी त्या अवस्था अनुभवण्याचा प्रयत्न केला. परात्पर गुरु डॉक्टरांनी मला आश्रमात रहाण्याची आणि देवाला अनुभवण्याची संधी दिल्यामुळे मी त्यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे.

हे परात्पर गुरु डॉक्टर, गुरुमाऊली, आश्रमातील भगवंताच्या या वेगवेगळ्या अवस्था मला प्रत्येक क्षणी अनुभवता येऊ दे, अशी तुमच्या कोमल चरणी कळकळीची प्रार्थना !

– कु. सुषमा पेडणेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.१०.२०१७)

Leave a Comment