बिहारच्या आमदारांची गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

आश्रम पाहिल्यानंतर मान्यवरांनी ‘आम्ही सर्व जण एकाच कॉलनीमध्ये (संकुलात) रहातो. तिथे आमच्या घरांपैकी एका घराला तुम्ही तुमचा आश्रम करा. यासाठी आम्ही शक्य तेवढे साहाय्य करू, असे सांगितले.

महाराणा प्रताप किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुन्हा जन्म होणार असेल, तर तो सनातन संस्थेच्या माध्यमातून होईल !

जर महाराणा प्रताप किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपल्या पवित्र भूमीत देवाच्या कृपेने पुन्हा जन्म होणार असेल, तर तो सनातन संस्थेच्या माध्यमातून होईल.

सनातनचे साधक मनोभावे सेवा करत असल्याने आश्रमात दैवी शक्ती जाणवते ! – कुलदीपक शेंडे, माजी उपनगराध्यक्ष, खोपोली

खोपोली येथील नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आणि उद्योजक श्री. कुलदीपक रामदास शेंडे यांनी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमाला १९ जून या दिवशी सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासह खोपोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक श्री. दिलीप जाधव, खोपोली येथील उद्योजक श्री. रोहित शेंडे, श्री. सुशांत तेलवणे आणि श्री. जनार्दन जाधव हेही उपस्थित होते.

गोव्यातील खासदार, मंत्री आणि आमदार यांची रामनाथी (फोंडा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

खासदार सदानंद शेट तानावडे, पुरातत्व विभागाचे मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार प्रेमेंद्र शेट, आमदार दाजी साळकर आणि आमदार संकल्प आमोणकर यांची उपस्थिती ! खासदार, मंत्री आणि आमदार यांनी सनातन संस्थेच्या आश्रमातून चालणारे कार्य आणि सूक्ष्म प्रदर्शन यांविषयीची माहिती जिज्ञासेने जाणून घेतली.

महाराष्ट्र राज्याचे फलोत्पादन आणि रोजगार हमी योजनामंत्री श्री. भरतशेठ गोगावले यांची सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) ला भेट !

शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या मंदिराप्रमाणे सनातनच्या आश्रमात प्रसन्नता जाणवली ! – भरतशेठ गोगावले, मंत्री, महाराष्ट्र राज्य

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘आश्रम पाहून आनंद झाला. समाधान वाटले. येथे आल्यावर चिदानंदाची अनुभूती आली. आपले सेवाकार्य अत्यंत प्रशंसनीय आहे.’

जगातील पहिल्या ‘हिंदु ओटीटी प्लॅटफॉर्म -‘प्राच्यम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण चतुर्वेदी यांची वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातन संस्थेच्या आश्रमास भेट !

श्री. चतुर्वेदी हे त्यांच्या कुटुंबियांसह येथील सनातन संस्थेच्या आश्रमास भेट देण्यास आले होते. सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी चतुर्वेदी कुटुंबियांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या राष्ट्र-धर्म कार्याविषयी विविधांगी माहिती दिली.

सनातन संस्थेचे कार्य हे हिंदु धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य आहे ! – श्री. दादा वेदक, अखिल भारतीय सत्संग सहप्रमुख, विश्‍व हिंदु परिषद

सनातन संस्थेचे कार्य हे हिंदु धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य आहे. हिंदु, हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्र यांना पुन:प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे, तसेच पुनश्‍च प्राणप्रीय भारतमातेला जगाच्या कल्याणासाठी जगाच्या गुरुस्थानावर पुनर्स्थापित करण्याचे हे कार्य आहे, असे मत विश्‍व हिंदु परिषदेचे अखिल भारतीय सत्संग सहप्रमुख श्री. महेंद्र उपाख्य दादा वेदक यांनी व्यक्त केले.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील सामवेदी कार्तिक जोशी यांच्याकडून ‘सामगान’

सनातन संस्था ही एकमात्र अशी संस्था आहे, जिच्याविषयी माझ्या मनात श्रद्धा, प्रेम, आनंद आणि अभिमान आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देण्याचे कार्य वैदिक, पुरोहित आणि ब्राह्मण यांच्यासह सनातन संस्थाही करत आहे, असे कौतुकोद्गार सामवेदी कार्तिक जोशी यांनी काढले.

लेफ्टनंट जनरल एस्.के. उपाध्याय (निवृत्त) यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला भेट

लेफ्टनंट जनरल एस्.के. उपाध्याय (निवृत्त) यांनी २१ एप्रिल या दिवशी सकाळी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली.