परात्पर गुरु डॉ. आठवले यांची खोली आणि परिसरातील वृक्ष यांच्यावर झालेली वाईट शक्तींची आक्रमणे

वर्ष १९८९ पासून आजपर्यंत परात्पर गुरु डॉक्टरांच्या जीवनात अनेक महामृत्यूयोग आले. वर्ष २००९ मधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग खडतर होता. त्याचा परिणाम त्यांच्या निवास कक्षाच्या परिसरातील वृक्षांवर दिसून आला.

केवळ साधकच नव्हे, तर प्राणी, पशू आणि पक्षी यांच्यावरही प्रीतीचा वर्षाव करून त्यांना आपलेसे करणारी प.पू. गुरुमाऊली !

एके दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील हस्तप्रक्षालन पात्राच्या (बेसिनच्या) ठिकाणी एक फुलपाखरू येऊन बसले होते. ते फुलपाखरू ३ दिवस तसेच बसून होते.

जगभरातील वैज्ञानिकांना आध्यात्मिक संशोधनात सहभागी होण्याची संधी देऊन त्यांना ईश्‍वरी कार्यात सामावून घेण्याचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उदात्त दृष्टीकोन !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक संशोधनाचा परिचय करून देण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे प्रतिनिधी अध्यात्मात रुची असणार्‍या वैज्ञानिकांची भेट घेत असतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काढलेली टक्केवारी आणि उपकरणांद्वारे केलेले परीक्षण यांत साम्य असणे, ही त्यांच्या द्रष्टेपणाची प्रचीती !

वर्ष २००० पूर्वी साधक-चित्रकारांनी संगणकाद्वारे श्री गणपतीचे चित्र काढण्यास आरंभ केला आणि त्यांनी वर्ष २०१२ पर्यंत श्री गणपतीची एकूण ६ चित्रे प्रकाशित केली. प्रथम प्रकाशित केलेल्या चित्रात गणपतितत्त्व ४ टक्के आले असल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातील ज्ञानाद्वारे सांगितले.

सनातनची गुरुपरंपरा !

‘भृगु महर्षींनी जीवनाडीपट्टी वाचनात सांगितले, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्यातील गुरुशक्ती संक्रमित करून त्यांना (सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना) ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ घोषित करावे.’

सर्वांवर अपार प्रीती करणारे आणि स्वत:च्या कृतीतून साधकांना घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

प.पू. डॉक्टरांनी एखादी गोष्ट आपल्याला सांगितल्यावर आपल्याला समजली नाही आणि आपण ती त्यांना पुन्हा विचारली, तरी ते न रागावता आपल्याला ती गोष्ट समजेपर्यंत सांगतात.

सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले संत असतांनाही त्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचे शिवधनुष्य उचलले आहे ! एक मराठी व्यक्तीच असे करू शकते !

जेव्हा देशाची स्थिती अत्यंत नाजूक झालेली आहे, तेव्हा मराठी व्यक्तींनी देशाचा कार्यभार सांभाळला आहे. मराठी व्यक्तीच असे कार्य करू शकते, असे प्रतिपादन भाजपचे मध्यप्रदेशातील माळवा प्रांताचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. विवेक जोशी यांनी येथे केले. 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा कृतज्ञताभाव दर्शवणार्‍या अद्वितीय आणि आदर्शवत् कृती !

प.पू. डॉक्टर ‘प्रत्येक वस्तू देवानेच दिलेली आहे’, या कृतज्ञतेने अतिशय प्रेमाने ती हाताळतात. प्रत्येक वस्तूचा अगदी शेवटपर्यंत वापर करतात. त्यांच्या कृतज्ञताभावामुळे वस्तूंमध्ये जिवंतपणा येतो.

बंगालमधील डॉ. शिवनारायण सेन यांनी ६५ टक्के, तर डॉ. कौशकचंद्र मल्लिक आणि तमिळनाडू येथील अर्जुन संपथ यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

बंगालसारख्या प्रतिकूल परिस्थितीत धर्मशास्त्राची ज्योत तेवत ठेवण्याचे कार्य करणारे शास्त्रधर्म प्रचारसभेचे सचिव डॉ. शिवनारायण सेन यांनी ६५ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, असे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी हिंदू अधिवेशनात घोषित केले.

प.पू. डॉ. आठवले यांची खोली आणि त्यांच्याशी संबंधित वस्तू यांत झालेले बुद्धीअगम्य पालट !

परात्पर गुरु डॉ. आठवले हे समष्टी गुरु आणि जगद्गुरु असल्यामुळे त्यांचे अवतारी कार्य संपूर्ण ब्रह्मांडात चालू असते.