अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचा समारोपीय दिवस

भाग्यनगर (हैद्राबाद) येथे वर्ष २००२ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांत अनेक निरपराधी बळी पडले. या प्रकरणात अटक केलेल्या आतंकवाद्यांना ‘एम्आयएम्’च्या ओवैसींनी साहाय्य केले.

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनचा सहावा दिवस

तमिळनाडूमध्ये नास्तिकतावादी द्रमुक सरकारमुळे जम्मू-काश्मीर राज्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. तेथे हिंदु आणि भारत यांच्या विरोधातील शक्ती शिरजोर झाल्या आहेत….

निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर आणि अधिवक्ता सुरेश कुलकर्णी संतपदी विराजमान

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी न्यायालयीन संघर्षाचे योद्धे आणि कर्मयोग अन् भक्तीयोग यांचा अपूर्व संगम असलेले निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर हे सनातनच्या ९७ व्या व्यष्टी संतपदी, तर अधिवक्ता सुरेश कुलकर्णी हे सनातनच्या ९८ व्या समष्टी संतपदी विराजमान झाले आहेत, अशी आनंददायी घोषणा सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केली.

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन अंतर्गत एक दिवसीय ‘सोशल मीडिया कॉन्क्लेव्ह’

काळानुसार आपल्याकडे जी साधने आहेत, त्यांचा उपयोग करून हिंदु राष्ट्राची संकल्पना लोकांपुढे मांडली पाहिजे. सध्याच्या काळात न्यायालये, विद्यापीठ यांपासून प्रत्येक ठिकाणी डाव्या विचारसरणीच्या लोकांचा पगडा आहे. याला विरोध करून हिंदु राष्ट्राच्या विचारधारेचा प्रचार करण्यासाठी ट्विटर,फेसबुक आणि ‘व्हॉटस् अ‍ॅप’, अशा सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर केला पाहिजे.

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचा पाचवा दिवस

वर्ष १८४० पर्यंत भारत चक्रवर्ती साम्राज्यच होते. स्वातंत्र्यानंतर भारताला लागलेले नेहरू घराण्याचे ग्रहण सुटत चालले आहे. पुढील १५-१६ वर्षांत पाक नष्ट होईल आणि भारत संपूर्ण जगाचे नेतृत्व करेल.

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचा चतुर्थ दिवस

‘काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन आणि मंदिरे ही सरकारीकरणापासून मुक्त करण्या’साठी पत्रकार परिषद, ‘मंदिररक्षण’च्या संदर्भात उद्बोधन सत्रात अयोध्येतील इस्लामीकरणाच्या विरोधात हिंदूंनी जागृत होणे अत्यावश्यक हा विषय, परिसंवाद : ‘मंदिराचे सरकारीकरण योग्य आहे का ?’ यांचे आयोजन करण्यात आले होते.

धर्मशास्त्रांचा अभ्यास आणि विलक्षण नम्रता असलेले डॉ. शिवनारायण सेन संतपदी विराजमान

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात १ जून या दिवशी कोलकाता (बंगाल) येथील हिंदु धर्माचे गाढे अभ्यासक डॉ. शिवनारायण सेन हे संतपदी विराजमान झाल्याचे, तर तेजपूर (आसाम) येथील श्रीमती राणू बोरा आणि हावडा (बंगाल) येथील श्री. अनिर्बान नियोगी यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले.

बांगलादेशातील हिंदूंसाठी प्राणपणाने लढणारे ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे संस्थापक अधिवक्ता रवींद्र घोष संतपदी विराजमान !

स्वत:वर अनेक प्राणघातक आक्रमणे होऊनही त्याची पर्वा न करता इस्लामी देश असलेल्या बांगलादेशातील हिंदूंसाठी प्राणपणाने लढणारे, त्यांचे आधारस्तंभ असलेले आणि बांगलादेशचे स्वातंत्र्यसैनिक ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे संस्थापक अधिवक्ता रवींद्र घोष (वय ६७ वर्षे) त्यांच्या निष्काम कार्यामुळे संतपदावर विराजमान झाले आहेत…

राममंदिर उभारण्यासाठी सर्वस्व समर्पित करण्याची सिद्धता असलेले कर्मयोगी अधिवक्ता हरि शंकर जैन संतपदी विराजमान !

धर्मरक्षणाची तीव्र तळमळ, निष्काम भावाने सेवारत रहाण्याची वृत्ती, उत्साहाचा अक्षय स्त्रोत आणि ध्यानी-मनी-स्वप्नी केवळ रामराज्याचा, म्हणजे हिंदु राष्ट्राचा ध्यास आदी विविध गुणांचा समुच्चय म्हणजे देहली येथील ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’ या संघटनेचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे अधिवक्ता हरि शंकर जैन !

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचा तृतीय दिवस

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रसारमाध्यमांमधून लोकचळवळ उभी करणे आवश्यक ! – अरविंद पानसरे, महाराष्ट्र प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती, न्यायप्रणाली, पोलीस आणि प्रशासन यांची हिंदूंवरील अत्याचारांच्या संदर्भात मूक भूमिका का ? – वैदेही ताम्हण, संपादिका, आफ्टरनून व्हॉईस