परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा देह, त्यांच्या वापरातील वस्तू आणि साधकाच्या पूजेतील त्यांची प्रतिमा यांवर गुलाबी छटा येणे

‘प.पू. डॉक्टरांची त्वचा, नखे, केस जसे पिवळे, सोनेरी होत आहेत, तसेच त्यांच्या डोळ्यांच्या आतील भाग हाता-पायांचे तळवे, जीभ आणि ओठही गुलाबी होत आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहातील निर्गुण तत्त्वामुळे त्यांच्या उशीच्या अभ्य्रावर ‘ॐ’ उमटणे म्हणजे ‘ॐ’काराच्या माध्यमातून सगुण साकार झालेले नादब्रह्म !

८.७.२०१९ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या नियमित वापरातील उशीच्या अभ्य्रावर दोन ठिकाणी ‘ॐ’ उमटल्याचे दिसले.

संतांप्रती भाव असलेले आणि संतत्वाचे मोल खर्‍या अर्थाने जाणलेले परात्पर गुरु डॉ. आठवले !

शिष्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंचा संग्रह करून त्यावर आध्यात्मिक संशोधन करणारे परात्पर गुरु डॉक्टर एकमेव आहेत.

भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक आणि ज्येष्ठ संशोधक अन् ज्ञानमार्गानुसार साधना करणारे ठाणे येथील डॉ. शिवकुमार ओझा (वय ८५ वर्षे) संतपदी विराजमान !

भारतीय संस्कृतीच्या उत्थानासाठी समर्पित भावाने अलौकिक कार्य करणारे ठाणे येथील डॉ. शिवकुमार ओझा (वय ८५ वर्षे) ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ८ जुलै या दिवशी संतपदी विराजमान झाले.

परात्पर गुरु डॉ.जयंत आठवले यांच्या डोक्यावरील केसांच्या आकारात पालट होण्यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा !

संतांच्या चरणांतून सर्वाधिक चैतन्याचे प्रक्षेपण होत असते.त्याप्रमाणे अवतारी कार्य करत असलेल्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या डोक्यावरील केसांच्या मुळातून समष्टीसाठी आवश्यक चैतन्य प्रक्षेपित होत असते.

निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर आणि अधिवक्ता सुरेश कुलकर्णी संतपदी विराजमान

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी न्यायालयीन संघर्षाचे योद्धे आणि कर्मयोग अन् भक्तीयोग यांचा अपूर्व संगम असलेले निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर हे सनातनच्या ९७ व्या व्यष्टी संतपदी, तर अधिवक्ता सुरेश कुलकर्णी हे सनातनच्या ९८ व्या समष्टी संतपदी विराजमान झाले आहेत, अशी आनंददायी घोषणा सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केली.

धर्मशास्त्रांचा अभ्यास आणि विलक्षण नम्रता असलेले डॉ. शिवनारायण सेन संतपदी विराजमान

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात १ जून या दिवशी कोलकाता (बंगाल) येथील हिंदु धर्माचे गाढे अभ्यासक डॉ. शिवनारायण सेन हे संतपदी विराजमान झाल्याचे, तर तेजपूर (आसाम) येथील श्रीमती राणू बोरा आणि हावडा (बंगाल) येथील श्री. अनिर्बान नियोगी यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले.

बांगलादेशातील हिंदूंसाठी प्राणपणाने लढणारे ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे संस्थापक अधिवक्ता रवींद्र घोष संतपदी विराजमान !

स्वत:वर अनेक प्राणघातक आक्रमणे होऊनही त्याची पर्वा न करता इस्लामी देश असलेल्या बांगलादेशातील हिंदूंसाठी प्राणपणाने लढणारे, त्यांचे आधारस्तंभ असलेले आणि बांगलादेशचे स्वातंत्र्यसैनिक ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे संस्थापक अधिवक्ता रवींद्र घोष (वय ६७ वर्षे) त्यांच्या निष्काम कार्यामुळे संतपदावर विराजमान झाले आहेत…

राममंदिर उभारण्यासाठी सर्वस्व समर्पित करण्याची सिद्धता असलेले कर्मयोगी अधिवक्ता हरि शंकर जैन संतपदी विराजमान !

धर्मरक्षणाची तीव्र तळमळ, निष्काम भावाने सेवारत रहाण्याची वृत्ती, उत्साहाचा अक्षय स्त्रोत आणि ध्यानी-मनी-स्वप्नी केवळ रामराज्याचा, म्हणजे हिंदु राष्ट्राचा ध्यास आदी विविध गुणांचा समुच्चय म्हणजे देहली येथील ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’ या संघटनेचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे अधिवक्ता हरि शंकर जैन !

बेंगळुरु (कर्नाटक) येथील अधिवक्ता विजयशेखर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

शांत आणि नम्र स्वभाव असलेले, प्रामाणिक वृत्तीचे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची तळमळ असलेले बेंगळुरु (कर्नाटक) येथील अधिवक्ता विजयशेखर हे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त झाले.