परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा कृतज्ञताभाव दर्शवणार्‍या अद्वितीय आणि आदर्शवत् कृती !

गुरूंविषयी वाटणारी शब्दातीत आणि भावमय कृतज्ञता !

प.पू. भक्तराज महाराज करत असलेले मार्गदर्शन लिहून घेतांना परात्पर गुरु डॉ. आठवले

१. दिवसाचा प्रारंभ प्रार्थना आणि कृतज्ञता यांनी करणे

प.पू. डॉक्टरांचा दिवसाचा आरंभ प.पू. भक्तराज महाराजांच्या (प.पू. बाबांच्या) चरणी कृतज्ञता आणि प्रार्थना करून होतो.

२. पूर्वी प.पू. भक्तराज महाराज यांनी सांगितल्याविना त्यांच्यासमोर न बसणे, तसेच दृष्टी चरणांकडे ठेवणे

प.पू. डॉक्टर प.पू. बाबांकडे सेवेला गेल्यावर प.पू. बाबा सांगेपर्यंत कधीच बसले नाहीत. ते बाबांसमोर बसले, तरी गुडघेदुखीचा त्रास असूनही ते भूमीवर बसायचे आणि त्यांची दृष्टी चरणांकडे असायची. केवळ प्रश्‍न विचारतांना ते प.पू. बाबांकडे पहात.

अ. प.पू. भक्तराज महाराजांचा शब्दन्शब्द प.पू. डॉक्टरांनी संग्रही ठेवला आहे. प.पू. बाबांचे बोलणे आणि भजने यांचे ध्वनीमुद्रण, ध्वनीचित्रीकरण, तसेच छायाचित्रे समष्टीसाठी जतन करून ठेवली आहेत.

आ. ‘आश्रम प.पू. भक्तराज महाराजांचा आहे’, असा प.पू. डॉक्टरांचा सनातनच्या आश्रमांविषयी भाव असतो. दैनंदिन जीवनातही आपण ‘प.पू. बाबांचे शिष्य आहोत’, असा विचार असतो. त्यानुसार प.पू. डॉक्टरांचे वागणे आणि बोलणे असते.

३. प.पू. बाबांच्या वाहनाप्रती कृतज्ञता

प.पू. बाबांनी वापरलेली गाडी आश्रमात आल्यावर प्रत्यक्ष प.पू. बाबा आल्याचा आनंद झाला होता. ‘तिला पाहून आपण प.पू. बाबांनाच भेटत आहोत’, या विचाराने प.पू. डॉक्टरांची भावजागृती झाली.

 

सुंदर निसर्ग घडवणार्‍या देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे

१. पाण्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे

एकदा प्राणशक्ती न्यून झाल्याने प.पू. डॉक्टरांच्या घशाला कोरड पडत होती. पाणी प्यावे लागत असल्याने ते म्हणाले, ‘‘बरे झाले ना, देवाने पाणी दिले आहे ! पाणी नसते, तर आपले कसे झाले असते ?’’

२. झाडांना धरून ठेवणार्‍या भूमीतील मुळाप्रमाणे देवानेही आपल्याला धरून ठेवले असल्याचे सांगणे

एकदा ते म्हणाले, ‘‘आपल्याला झाड दिसते; पण झाडांना धरून ठेवणारे मूळ दिसत नाही. आपल्यालाही देवाने असेच धरून ठेवले आहे.’’

३. प.पू. डॉक्टरांच्या कृतज्ञताभावाला निसर्ग देत असलेला प्रतिसाद

गुरुमाऊलीची निसर्गाप्रतीची ही कृतज्ञता जणू सगळा निसर्गच अनुभवत आहे आणि त्यात ‘त्यालाही कृतज्ञता वाटत आहे’, असे जाणवते. त्यांची खोलीच्या परिसरातील झाडे त्यांच्या चरणी नतमस्तक झाल्याप्रमाणे खोलीच्या दिशेने वाकल्यासारखी दिसतात, तर रंगीत पक्षी, सुंदर फुलपाखरे हळूवारपणे खोलीच्या परिसरात रमत असतात. कधी कोकीळ त्याच्या सुंदर आणि मधुर आवाजात आम्हा साधकांना साद घालून हे सर्व सांगण्याचा प्रयत्न करत असतो.

 

साधकांविषयीही कृतज्ञता व्यक्त करणारे महान परात्पर गुरु !

परात्पर गुरु डॉ. आठवले

 

१. पूर्णवेळ झालेल्या साधकांप्रती कृतज्ञता वाटणे

जे साधक कोणताही आश्रम नसतांना व्यावहारिक विचार न करता पूर्णवेळ साधक झाले, त्या साधकांविषयी गुरुमाऊलींना कृतज्ञता वाटते. ती त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होते.

२. कृतज्ञतेपोटी ‘साधकांनो ! तुम्ही जिंकलात, मी हरलो !’ ही कविता लिहिणे

‘साधक किती त्रासांमधून साधना करत आहेत ? कितीही त्रास झाला, तरी ते साधना करत आहेत’, या विचाराने गुरुमाऊलीला कृतज्ञता वाटत होती. एकदा त्यांच्या बोलण्यातून ती व्यक्त झाली. त्यासाठी त्यांनी ‘साधकांनो ! तुम्ही जिंकलात, मी हरलो !’ ही कविता लिहिली.

३. सनातनच्या साधकांवरील अरिष्ट दूर झाले; म्हणून कृतज्ञतेने अश्रू येणे

सनातनच्या ६ साधकांना विनाकारण एका प्रकरणात गोवून कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यांची न्यायालयातून निर्दोष सुटका झाल्याने त्यांची स्वागतफेरी आश्रमात येत होती. तेव्हा ‘देवाने आपल्यासाठी इतके केले’, या कृतज्ञतेपोटी प.पू. डॉक्टरांच्या डोळ्यांतून कृतज्ञतेने अश्रू आले.

 

संतांविषयी प.पू. डॉक्टरांना वाटणारी अपार कृतज्ञता !

अनुष्ठान करतांना प.पू. दादाजी वैशंपायनयांच्या समवेत परात्पर गुरु डॉ. आठवले

१. ‘अनेक संत माझ्यासाठी अनुष्ठाने करतात; म्हणून मी आजवर जिवंत आहे’, अशी कृतज्ञता परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मुखातून सतत व्यक्त होत असते.

२. ज्या साधकांना काही त्रास होत असतात, त्या साधकांना प.पू. डॉक्टर संतांनी अनुष्ठाने करून दिलेला प्रसाद प्रथम देतात आणि देतांना ‘संतांनी अनुष्ठान करून पाठवलेला प्रसाद आहे’, असे सांगतात. त्या संतांप्रती प.पू. डॉक्टर कृतज्ञ असतात. त्याच कृतज्ञतेने ते साधकांना प्रसाद देतात.

३. सनातन धर्माच्या पुनरुत्थानासाठी आणि त्याची अवघ्या विश्‍वात प्रस्थापना करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आरंभलेल्या कार्यात ईश्‍वरी कृपेने अनेक संतांनी बहुमोल वाटा उचलला आणि त्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. सप्तपाताळांतील आसुरी शक्ती देत असलेल्या सर्व प्रकारच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध संतांनी आतापर्यंत साहाय्य केले आहे. साहाय्य करणार्‍या सर्वच संतांप्रती प.पू. डॉक्टरांना कृतज्ञता वाटते.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतः त्यांना विविध संतांनी केलेले साहाय्य, तसेच विविध संतांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते कृतज्ञताभावाने संग्रहित करून ठेवले होते. त्यामुळे त्यासंदर्भातील ग्रंथही प्रकाशित करणे सहज शक्य झाले.

 

‘प्रत्येकच वस्तू देवामुळे मिळत आहे’, या कृतज्ञेतेने वापरणे

१. ‘प.पू. डॉक्टर दरवाजा उघडतांना आणि बंद करतांना त्याला अतिशय हळूवार स्पर्श करतात. हीच गोष्ट खोलीतील विजेची कळ चालू-बंद करतांनाही लक्षात येते.

२. औषधाच्या गोळ्यांची पाकीटे उघडतांना ती पाकिटे खराब होणार नाहीत आणि औषधांचा मुदत संपलेला दिनांक जाणार नाही, अशा प्रकारे कापतात.

३. प.पू. डॉक्टरांच्या भावामुळे त्यांच्या वस्तूंमध्ये जिवंतपणा येणे आणि जुन्या होऊनही वस्तू अधिकच सुंदर दिसू लागणे

प.पू. डॉक्टर ‘प्रत्येक वस्तू देवानेच दिलेली आहे’, या कृतज्ञतेने अतिशय प्रेमाने ती हाताळतात. प्रत्येक वस्तूचा अगदी शेवटपर्यंत वापर करतात. त्यांच्या कृतज्ञताभावामुळे वस्तूंमध्ये जिवंतपणा येतो. सामान्यपणे पुष्कळ वर्षे वापरलेली एखादी वस्तू वाईट दिसते; परंतु गुरुमाऊलीच्या वापरातील वस्तू आणखीनच सुंदर दिसू लागतात. त्याचे एक उदाहरण म्हणजे प.पू. डॉक्टरांनी एक विजार १५ वर्षे वापरली, तरीही ‘ती जुनी झाली आहे’, असे वाटत नाही. त्यांनी वापरलेल्या पांढर्‍या बंड्या इतक्या मऊ झाल्या आहेत की, त्यांचा स्पर्श हवाहवासा वाटतो. त्या हातातून खाली ठेवाव्याशा वाटत नाहीत.

–  एक साधिका, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.