परात्पर गुरु डॉ. आठवले यांची खोली आणि परिसरातील वृक्ष यांच्यावर झालेली वाईट शक्तींची आक्रमणे

‘जग तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे’, असे अनेक संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. ज्याप्रमाणे रामायण आणि महाभारत काळातील युद्धे स्थुलातून झाली, त्याप्रमाणे हे तिसरे महायुद्ध स्थुलातील नसून ते अधिकतर सूक्ष्म स्तरावर होणार आहे. अखिल मानवजातीचे रक्षण व्हावे, यासाठी अनेक संत निरनिराळ्या मार्गांनी प्रयत्नरत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले हे केवळ तिसर्‍या महायुद्धातून रक्षण होण्यासाठीच नाही, तर त्याहीपुढे जाऊन कलियुगांतर्गत ‘ईश्‍वरी राज्य’ स्थापनेसाठी कार्यरत आहेत. त्यामुळेच सत्त्वगुणी ईश्‍वरी राज्याला विरोध करणार्‍या तमोगुणी वाईट शक्तींशी त्यांचा निकराचा लढा चालू आहे. फलस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांची खोली ही युद्धभूमी झाली आहे. या चांगल्या-वाईटातील संघर्षाचे पडसाद त्यांचा देह, खोली आणि परिसर यांवर वेळोवेळी दिसून येतात. या महायुद्धाच्या परिणामस्वरूप गत काही वर्षांपासून सातत्याने थकवा असणे, प्राणशक्ती ३० टक्क्यांपेक्षाही अल्प असणे, असे अनेक त्रास परात्पर गुरु डॉ. आठवले यांना होत आहेत. ‘अनेकदा त्यांच्या निवासी कक्षातही प्रचंड दाब निर्माण होणे’, त्यामुळे ‘श्‍वासही घेण्यास त्रास होणे’, ‘भिंतीवर ओरखडे, तसेच वाईट शक्तींचे तोंडवळे उमटणे’, आदी प्रकारे अनिष्ट शक्तींचे प्रकटीकरण होत असते. यांतून या युद्धाची तीव्रता दिसून येते.

वर्ष १९८९ पासून आजपर्यंत परात्पर गुरु डॉक्टरांच्या जीवनात अनेक महामृत्यूयोग आले. वर्ष २००९ मधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग खडतर होता. त्याचा परिणाम त्यांच्या निवास कक्षाच्या परिसरातील वृक्षांवर दिसून आला. या सर्व घटनांकडेही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संशोधक वृत्तीने पाहून वेळोेवेळी त्याच्या नोंदी ठेवल्या आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांनी या घटनांच्या तपशीलवार नोंदी ठेवल्याने सूक्ष्मातील युद्धाची भीषणता समाजासमोर मांडणे शक्य आहे. तसेच यामुळेच पुढील अनेक पिढ्यांना अनिष्ट शक्तींचे आक्रमण कसे असते, त्यामागे कोणती कारणे असतात, त्यांचे निराकरण असे करावे, याविषयीच्या अभ्यासासाठी एक निराळे दालन उघडले आहे. आज परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वास्तू, खोली आणि परिसरातील वृक्ष यांवर झालेल्या अनिष्ट शक्तींच्या आक्रमणाविषयी येथे देत आहोत.

एरव्ही पारिजातकाच्या झाडाला वर्षातील ३ मास बहर असतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अस्तित्वामुळे रामनाथी आश्रमातील पारिजातकाच्या झाडाला वर्षभर फुले येत असत. (२९.७.२०१६)
कोणतेही कारण नसतांना ऐन पावसाळ्यात अचानक झालेली ही पानगळती बुद्धीअगम्य आहे. दोन मासांतच झाडावर एकही पान शिल्लक राहिले नाही. याविषयी आध्यात्मिक आणि वैज्ञानिक स्तरावर संशोधन करण्यात आले. (२०.९.२०१६)

सामान्यतः आपण पहातो की, पावसाळ्यात झाडे अधिक हिरवीगार होतात; मात्र या पारिजातकामध्ये उलट प्रक्रिया दिसून आली. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाचे संकट स्वतःवर घेतल्यामुळे ऑक्टोबर २०१६ मध्ये रामनाथी आश्रमाच्या परिसरात असलेले पारिजातकाचे झाड पूर्णपणे सुकले’, असे महर्षींनी तमिळनाडू येथील सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन यांच्या माध्यमातून सांगितले. यावरून पारिजातक सुकण्यामागील कारण आध्यात्मिक होते, हे लक्षात येते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील श्री व्याडेश्‍वर देवाच्या प्रतिमेवर फुगवटा आला आहे. (गोलात फुगवटा मोठा करून दाखवला आहे.) (वर्ष २०१८)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील श्री व्याडेश्‍वर देवाच्या प्रतिमेवर फुगवटा येण्यामागील कारणही ‘वाईट शक्तींचे आक्रमण’ हेच आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवलेयांच्या खोलीतील लादीवर आपोआप उमटलेले हाताच्या पंजांचे ठसे (वर्ष २००७)

 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील भिंतीवर उमटलेल्या त्रासदायक आकृत्या. (गोलात वाईट शक्तीचा तोंडवळा दाखवला आहे.) (वर्ष २०१३)

 

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी पूजेसाठी दिलेल्या नागमूर्तीचा रंग पालटून तो काळा झाला आहे. हा रंग काळा होण्यामागेही ‘वाईट शक्तींचे आक्रमण’ हेच कारण आहे. (‘छायाचित्र क्र. अ’ मध्ये वरच्या भागात वस्त्र होते. त्यामुळे तेथील रंग पालटलेला नाही.)

परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीमध्ये योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी देवघरात ठेवण्यासाठी शेषनागाची तांब्याची मूर्ती दिली होती. या मूर्तीच्या मागील बाजूस, तसेच पुढील बाजूस जळल्यावर होते त्याप्रमाणे काळसर रंग आल्याचे दिसते. परात्पर गुरु डॉक्टरांवर आलेले महामृत्यूचे संकट शेषनागाच्या तांब्याच्या मूर्तीने स्वतःमध्ये खेचून घेतल्याचे जाणवते.

परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीतील काचांमध्ये झालेले त्रासदायक पालट

परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीतील सज्ज्याकडील खिडकीच्या काचेवर बाहेरून आलेले ओरखडे. वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे सर्व खिडक्यांच्या काचांवर ओरखडे आले आहेत.

 

वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीतील खिडकीच्या काचेवर आलेले पांढरे डाग

 

वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीतील कपाटावरील आरशाच्या काचेवरील डाग गोलात दाखवण्यात आला आहे.

तज्ञ, अभ्यासू आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांना विनंती !

‘संतांची खोली, तसेच परिसर यांतील चांगल्या आणि त्रासदायक पालटांविषयी संशोधन करून त्यांचा कार्यकारणभाव शोधून काढण्यासाठी साधक प्रयत्न करत आहेत.

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील लादीवर हाताचा पंजा आपोआप उमटण्यामागे काय कारण आहे ?

२. खोलीतील भिंतीवर अनिष्ट शक्तींचे तोंडवळे दिसणे, विशिष्ट वेळी भिंतीवर फुगवटे येणे, पापुद्रे निघणे यांमागे काय कारण आहे ?

३. स्थुलातील कोणतेही कारण नसतांना काचेवर मोठ्या प्रमाणात ओरखडे येण्यामागे काय कारण आहे ?’

४. प्लास्टिकच्या मगचा रंग पालटू शकतो का ?

५. छापील चित्राच्या रंगात आपोआप पालट होतो का ?

६. आरसा किंवा दाराची काच यांत कालांतराने पालट कशाने होतात ?

७. एरव्ही वर्षभर फुलणारा पारिजातक वृक्ष ऐन पावसाळ्यात का सुकला ?

या संदर्भात तज्ञ, अभ्यासू, या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांचे साहाय्य आम्हाला लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.’

– व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संपर्क : श्री. रूपेश रेडकर

ई-मेल : [email protected]

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment