परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या भ्रूमध्यावर दैवी चिन्हे उमटण्यामागील अध्यात्मशास्त्र !

सनातनच्या गुरुपरंपरेच्या भ्रूमध्यावर दिसलेल्या या शुभचिन्हांचे आध्यात्मिक विश्लेषण आज आपण जाणून घेणार आहोत.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मनमोहक हास्याविषयी साधकांचे हृद्य मनोगत !

साधकांना साधनेसाठी प्रोत्साहित करणारे मधुर स्मितहास्य !
जन्मोजन्मींचा थकवा, ताणतणाव नष्ट करणारे गोड हास्य !

७९ व्या वर्षीही त्वचेवर विशेष सुरकुत्या नसणे, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दैवी वैशिष्ट्य !

गेल्या २ वर्षांत परात्पर गुरु डॉक्टरांनी आमच्याकडून त्यांच्या विविध छायाचित्रांचा अभ्यास करवून घेतला. या अभ्यासाच्या माध्यमातून भगवंताने उलगडलेली परात्पर गुरु डॉक्टरांच्या अवतारत्वाच्या संदर्भातील दैवी लीला आम्हाला अनुभवता आली.

साधकांना स्वतःत अडकू न देता तत्त्वनिष्ठ करणारे विश्वव्यापी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि शिष्य म्हणून साधकांनी करावयाचे कर्तव्य !

‘परात्पर गुरुदेवांनी प्रथमपासूनच साधकांना शिकवले आहे, ‘‘संतांच्या देहात अडकू नका; कारण संत हे देहधारी असल्याने त्यांना मृत्यू हा असतोच. संतांचे तत्त्वच महत्त्वाचे आहे.’ तत्त्व हे अविनाशी असल्याने ते आपल्याला चिरकाल मार्गदर्शन करू शकते; परंतु संतांच्या देहाचे तसे नसते. संत जिवित असेपर्यंतच आपल्या वाणीद्वारे साधकांना मार्गदर्शन करत असतात.

एकाच कुटुंबातील पाच जणांनी आध्यात्मिक ग्रंथलिखाण करणे – एक अद्वितीय घटना !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कुटुंबातील ते स्वतः धरून पाच जणांनी अध्यात्माच्या विविध विषयांवर लिखाण केले आहे. त्यातील काही लिखाण ग्रंथस्वरूपात प्रकाशित झाले आहे, तर काही लिखाण प्रकाशित होणे बाकी आहे.

साधकांचे आपत्काळात रक्षण होण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर कार्यरत असलेले कृपावत्सल परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉक्टरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात केलेले हे कार्य हा केवळ इतिहास नसून साधकांना कलीच्या प्रभावापासून वाचवण्यासाठी दिलेला लढा आहे. त्यांतील काही प्रमुख सूत्रेच शब्दांत व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे.

साधकांना साधनाप्रवासात कुठेही अनुभूती वा सिद्धी यांमध्ये अडकू न देता लीलया सगुणातून निर्गुणाकडे नेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

मला अचानक स्थुलातून जाणवले की, ‘माझ्या मूलाधारचक्रापासून विशुद्धचक्रापर्यंत ऊर्जाशक्तीचा एक प्रवाह पाठीच्या मणक्यामधून सरळ वरच्या रेषेत गेला आणि तो प्रवाह मानेतच अडकला आहे.’ यापूर्वी मी असे कधी अनुभवले नव्हते. मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले, ‘‘तुम्हाला आलेली ही अनुभूती ‘कुंडलिनीशक्तीच्या जागृती’ची आहे. हठयोगी, ध्यानयोगी, शक्तीपातयोगी यांच्यासाठी ही उच्च स्तरावरील अनुभूती आहे; पण आपल्याला अशा कोणत्याही शक्तीच्या स्तरावरील अनुभूतींमध्ये अडकायचे नाही.

आपत्काळाच्या भीषणतेविषयी वेळोवेळी सूचित करणारे आणि त्यासंदर्भात उपाययोजना काढणारे द्रष्टे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपत्काळाची चाहूल ओळखून केवळ साधकांना सूचित केले नाही, तर साधकांना पुढील काळात सुविधाजनक व्हावे, यासाठी प्रत्यक्ष उपाययोजनाही आरंभल्या. त्यांनी शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरांवर साधकांची प्रतिकूलतेला सामोरे जाण्याची सिद्धता करवून घेतली आहे !

‘साधकांना सर्व संकटांचा खंबीरपणे सामना करता यावा’, यासाठी साधनेची शिकवण देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

सनातनचे सहस्रो साधक सध्याच्या सामाजिक प्रतिकूलतेचा सामना खंबीरपणे करत आहेत, तसेच स्वतः स्थिर राहून इतरांनाही आधार देत आहेत. याचे खरे गमक परात्पर गुरु डॉक्टरांनी केलेल्या साधनेच्या संस्कारांमध्ये आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या आध्यात्मिक संस्था निर्माण करणार असलेले ‘साधक-वृद्धाश्रम’ यांचे महत्त्व ओळखा !

परात्पर गुरु डॉक्टरांनी सनातनच्या साधकांना सहसाधकांकडे आणि त्यांच्या कुटुंबियांकडेही ‘आपले कुटुंबीय’, या भावाने पहाण्यास शिकवले आहे.