विश्‍व हिंदु परिषदेचे कोकण प्रांत मंत्री श्री. मोहन सालेकर यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

विश्‍व हिंदु परिषदेचे कोकण प्रांत मंत्री श्री. मोहन सालेकर आणि गोवा विभाग मंत्री श्री. मोहन आमशेकर यांनी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

पू. शिवनगिरीकर महाराज यांची सत्पत्नीक सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास सदिच्छा भेट !

छत्रपती संभाजीनगर येथील कर्णपुरा ग्रंथप्रदर्शनास पू. शिवनगिरीकर महाराज यांनी भेट दिली. त्या वेळेस ते म्हणाले की,…

सनातन संस्थेचे साधक यांनी घेतल्या ‘संत समावेश’ कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या भेटी !

कणेरी मठ (कोल्हापूर) येथे संत-महंत, धर्माचार्य यांच्या उपस्थितीत होत असलेला ‘संत समावेश’ कार्यक्रम !

अहिल्यानगर येथे सनातन संस्थेच्या वतीने बिंदूदाबन उपचार शिबिर पार पडले !

मणक्याचे आजार, गुडघ्याचे आजार, पोटाचे विकार असे विविध आजार असणार्‍या ४० रुग्णांवर डॉ. दीपक जोशी यांनी उपचार केले. उपचारानंतर रुग्णांनी ‘बरे वाटले’, असे सांगितले.

सनातन संस्था आयोजित बिंदूदाबन शिबिराचा नाशिक जिल्ह्यातील शिबिरार्थींनी घेतला लाभ !

आगामी भीषण आपत्काळात रुग्णांना होणार्‍या वेदना न्यून होण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने बिंदूदाबन-उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते.

पुणे येथील विश्वशांतीनिकेतन विद्यालयाच्या कुरुळी शाखेमध्ये पालकांसाठी व्याख्यानाचे आयोजन !

विश्वशांतीनिकेतन विद्यालयाच्या कुरुळी शाखेमध्ये पालकांसाठी प्रथम सत्र परीक्षेच्या ‘ओपन डे’च्या निमित्ताने पालकांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. जयश्री काळे यांनी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्माचे महत्त्व’ याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

अर्बन (शहरी) नक्षलवादापासून सावध राहून धर्माचे रक्षण करावे ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदु धर्म नष्ट करण्यासाठी ‘अर्बन नक्षलवाद्यांचे’ मोठे षड्यंत्र चालू आहे. हे अर्बन नक्षलवादी शिक्षण, प्रशासन, साहित्य, प्रसारमाध्यमे यांच्या माध्यमातून हिंदु धर्म नष्ट करू पहात आहेत.

धरुहेडा (हरियाणा) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘नैतिक मूल्यांचे संवर्धन’ या विषयावर मार्गदर्शन

सनातन संस्थेच्या सौ. तृप्ती जोशी यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.

सनातन संस्थेच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवात विविध माध्यमांतून उत्तरप्रदेश आणि बिहार येथे करण्यात आला धर्मप्रसार !

नुकत्याच पार पडलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या कालावधीत उत्तरप्रदेशातील कानपूर, अयोध्या, भदोही, तसेच बिहार राज्यातील समस्तीपूर आणि गया येथे सनातन संस्थेने प्रवचनांचे आयोजन केले. या प्रवचनांमधून देवी पूजनाशी संबंधित शास्त्रीय माहिती देण्यात आली.

हिंदु धर्मावर होणारे विविध आघात रोखण्यासाठी जनजागृती महत्त्वाची ! – सदगुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

हिंदूंच्या समस्यांविषयी सातत्याने हिंदु समाजामध्ये जागृती घडवून आणून त्याचा हिंदूंनी संघटितपणे प्रतिकार केला पाहिजे, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.