परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काढलेली टक्केवारी आणि उपकरणांद्वारे केलेले परीक्षण यांत साम्य असणे, ही त्यांच्या द्रष्टेपणाची प्रचीती !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अध्यात्मक्षेत्रात येण्यापूर्वी वैद्यकीय क्षेत्रात पुष्कळ संशोधन कार्य केले असल्याने त्यांचे अध्यात्मशास्त्राच्या संदर्भातील लिखाणही तुलनात्मक सारण्या, टक्केवारी, आलेख इत्यादी शास्त्रीय परिभाषेत असते, उदा. एखाद्या साधकाची आध्यात्मिक पातळी किती टक्के आहे, एखाद्या देवतेच्या चित्रात मूळ देवतातत्त्व किती टक्के आकृष्ट होत आहे, इत्यादी. याविषयी त्यांना सूक्ष्मातून विश्‍वमन, विश्‍वबुद्धी यांच्या माध्यमातून माहिती मिळत असते. या टक्केवारीच्या सत्यतेविषयी काही बुद्धीवादी साशंकता व्यक्त करतात; परंतु प्रत्यक्षात एखादी व्यक्ती किंवा वस्तू यांविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून सांगितलेली टक्केवारी आणि त्यासंदर्भात कालांतराने आधुनिक वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून केलेल्या प्रयोगांतील निष्कर्ष यांमध्ये पुष्कळ साम्य दिसून आले. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

संकलक : सौ. मधुरा कर्वे आणि श्री. रूपेश रेडकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

१. सनातन-निर्मित श्री गणेशाच्या सात्त्विक चित्रांविषयी
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली टक्केवारी आणि
त्या चित्रांची ‘पिप’ प्रणालीने केलेली चाचणी याचे निष्कर्ष एकसारखे असणे

१ अ. देवतेच्या सात्त्विक चित्रांच्या निर्मितीमागची पार्श्‍वभूमी

देवतेचे चित्र तिच्या मूळ रूपाशी जेवढे अधिक जुळणारे असते, तेवढे त्यात देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात असते. कलियुगात एखाद्या देवतेच्या चित्रात किंवा मूर्तीत अधिकाधिक ३० टक्क्यांपर्यंत त्या देवतेचे तत्त्व येऊ शकते. सध्या पेठेत (बाजारात) देवतांच्या उपलब्ध असणार्‍या सर्वोत्तम चित्रांमध्येही त्या-त्या देवतेचे तत्त्व ग्रहण करणे आणि ते प्रक्षेपित करणे, याची कमाल क्षमता २ – ३ टक्के एवढीच आढळते. देवतांच्या उपासकांना त्या-त्या देवतेची अधिकाधिक स्पंदने ग्रहण आणि प्रक्षेपित करू शकणारी चित्रे उपलब्ध करून देण्याच्या हेतूने अन् आपली ईश्‍वरप्राप्तीसाठीची साधना म्हणून सनातनच्या साधक-चित्रकारांनी देवतांच्या सात्त्विक चित्रांच्या निर्मितीला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आरंभ केला. उदाहरणादाखल आपण यांतील श्री गणपतीच्या सात्त्विक चित्राच्या निर्मितीमधील विविध टप्प्यांमधील चित्रे पाहूया.

 

१ आ. श्री गणपतीच्या सात्त्विक चित्राच्या निर्मितीमधील टप्पे

वर्ष २००० पूर्वी साधक-चित्रकारांनी संगणकाद्वारे श्री गणपतीचे चित्र काढण्यास आरंभ केला आणि त्यांनी वर्ष २०१२ पर्यंत श्री गणपतीची एकूण ६ चित्रे प्रकाशित केली. प्रथम प्रकाशित केलेल्या चित्रात गणपतितत्त्व ४ टक्के आले असल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातील ज्ञानाद्वारे सांगितले. (‘एखाद्या देवतेच्या चित्रात त्या देवतेचे तत्त्व किती आहे ?’, हे विज्ञानाद्वारे मोजण्याचे तंत्रज्ञान अजूनतरी अस्तित्वात नाही.) त्यानंतर पुढे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि साधक-चित्रकारांना ध्यानावस्थेत मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे वर्ष २०१२ पर्यंत गणपतीच्या चित्रात जसजशा सुधारणा केल्या, तसतसे त्या त्या चित्रातील गणपतितत्त्वाचे प्रमाण वाढत गेले. श्री गणपतीच्या चित्रांच्या निर्मितीचे वर्ष आणि त्या चित्रांतील गणपतितत्त्व हे पहाण्यासाठी वरील चित्रे पहा.

१ इ. सनातन-निर्मित श्री गणपतीच्या चित्रांतील सूक्ष्म-स्पंदनांचा ‘पिप
(पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेल्या अभ्यासात
चित्रांतील वाढत्या गणपतितत्त्वानुरूप त्यांतील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण वाढलेले आढळणे

‘पिप’ छायाचित्रांत दिसणार्‍या रंगांपैकी नारंगी आणि भगवा, हे रंग आध्यात्मिकदृष्ट्या नकारात्मक स्पंदनांचे दर्शक असतात, तर निळा, हिरवा, पिवळा, निळसर पांढरा आणि पोपटी हे उत्तरोत्तर अधिकाधिक आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक स्पंदनांचे दर्शक असतात. वर उल्लेखलेल्या सनातन-निर्मित श्री गणपतीच्या ६ चित्रांची अध्यात्मशास्त्रदृष्ट्या समजलेली वैशिष्ट्ये अभ्यासण्याच्या उद्देशाने त्या चित्रांची ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीत मिळालेली श्री गणपतीच्या चित्रांची ‘पिप’ छायाचित्रे आणि त्यांचे विवरण बाजूच्या छायाचित्रांखाली पहा.

१ इ १. सनातन-निर्मित श्री गणपतीच्या चित्रांची ‘पिप’ छायाचित्रे आणि त्यांतील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण

१ इ २. ‘पिप’ छायाचित्रांचे निष्कर्ष

अ. गणपतीच्या प्रत्येक चित्रात झालेली गणपतितत्त्वाची वृद्धी त्या त्या ‘पिप’ छायाचित्रात अचूक दिसते.

आ. १५ टक्के सात्त्विकता असलेले श्री गणपतीचे चित्र आणि २७ टक्के सात्त्विकता असलेले श्री गणपतीचे चित्र यांतील सात्त्विकतेतील मोठा भेदही स्पष्टतेने दिसतो.

इ. २७ टक्के आणि २८.५ टक्के गणपतितत्त्व असलेल्या चित्रांतील उच्च सात्त्विकताही त्यांच्या ‘पिप’ चित्रांतील शुद्धता किंवा पवित्रता दर्शवणार्‍या निळसर पांढर्‍या रंगातून, तसेच सूक्ष्म स्तरावरील आध्यात्मिक उपायक्षमता दर्शवणार्‍या पोपटी रंगातून स्पष्ट दिसते.

१ ई. ‘पिप’ तंत्रज्ञानाला एका मर्यादेपर्यंत सनातन-निर्मित
श्री गणपतीच्या चित्रांमधील सात्त्विकता ओळखता येणे, तर
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘पिप’चाचणी करण्याआधीच ‘गणपतीच्या प्रत्येक
चित्रात नेमकी किती सात्त्विकता, म्हणजे गणपतितत्त्व आहे ?’, हे प्रत्यक्ष सांगितलेले असणे

वरील चाचणीतून सनातन-निर्मित श्री गणपतीच्या चित्रांमधील उत्तरोत्तर वाढत गेलेली सात्त्विकता (गणपतितत्त्व) वैज्ञानिकदृष्ट्याही स्पष्ट झाली. ध्यानातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हेच सत्य कोणतेही वैज्ञानिक उपकरण न वापरताही आधीच सांगितले होते. एवढेच नव्हे, तर त्यांनी त्याही पुढे जाऊन ‘प्रत्येक चित्रात नेमकी किती सात्त्विकता (गणपतितत्त्व) आहे ?’, हेही प्रत्यक्ष सांगितले होते. संतांनी ध्यानातून आधीच जाणलेल्या या सत्याला वैज्ञानिक उपकरणाने केलेल्या चाचणीतील निष्कर्षाने दुजोरा मिळाला, एवढेच !

पुढील चित्रांवरून श्री गणपतीच्या चित्रातील गणेशतत्त्व ज्या क्रमाने वाढले, त्याचप्रमाणे पिपच्या साहाय्याने घेतलेल्या छायाचित्रांतील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाणही वाढल्याचे लक्षात येते.

 

२. सनातन-निर्मित श्री लक्ष्मीच्या सात्त्विक चित्राएवढीच
सात्त्विकता सनातन-निर्मित श्री लक्ष्मीतत्त्व आकृष्ट करणार्‍या
रांगोळीतही असल्याचे ‘पिप’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेल्या चाचणीत स्पष्ट होणे

२ अ. देवतातत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता
असणार्‍या सात्त्विक रांगोळ्यांची निर्मिती करण्याची पार्श्‍वभूमी

सण, धार्मिक विधी किंवा एखादा मंगल प्रसंगी काढली जाणारी रांगोळी जेवढी सात्त्विक, तेवढे तिच्यातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण अधिक असते. सात्त्विक रांगोळीतील सकारात्मक स्पंदनांचा लाभ रांगोळी काढणारे आणि ती पहाणारे या दोघांनाही होतो. प्रत्येक सणानुसार किंवा त्या-त्या प्रसंगानुसार त्या-त्या देवतेचे तत्त्व रांगोळीत अधिक प्रमाणात आकृष्ट होऊन त्याचा लाभ सर्वांना व्हावा, या उद्देशाने सनातनच्या साधकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध देवतांची तत्त्वे आकृष्ट करणार्‍या अनेक सात्त्विक रांगोळ्या सिद्ध केल्या आहेत. या रांगोळ्यांमुळे देवतेचे तत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित झाल्यामुळे तेथील वातावरण त्या देवतातत्त्वाने भारित होऊन त्याचा लाभ सर्वांना होतो. सनातन-निर्मित रांगोळ्यांच्या या वैशिष्ट्याचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्याच्या उद्देशाने ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चाचण्या घेण्यात आल्या. येथे उदाहरणादाखल दिलेल्या एका चाचणीमध्ये श्री लक्ष्मीचे सनातन-निर्मित सात्त्विक चित्र आणि श्री लक्ष्मीचे तत्त्व आकृष्ट करणारी सनातन-निर्मित रांगोळी यांच्या संदर्भातील निरीक्षणे आणि त्यांचे विवरण दिले आहे.

२ आ. श्री लक्ष्मीचे सनातन-निर्मित सात्त्विक चित्र आणि
लक्ष्मीतत्त्व आकृष्ट करणारी सनातन-निर्मित रांगोळी यांची ‘पिप’ छायाचित्रे

२ इ. ‘पिप’ छायाचित्रांचे विवरण आणि निष्कर्ष

श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व आकृष्ट करणार्‍या सनातन-निर्मित रांगोळीतही श्री लक्ष्मीदेवीच्या सनातन-निर्मित सात्त्विक चित्राच्या जवळपास तेवढीच सकारात्मक स्पंदने आढळतात, हे या चाचणीतून स्पष्ट होते. याचा अर्थ श्री लक्ष्मीदेवीचे पूर्ण रूप असणार्‍या सनातन-निर्मित चित्रामध्ये जेवढी सात्त्विकता आहे, तेवढीच सात्त्विकता प्रत्यक्ष रूप नसतांनाही, केवळ लक्ष्मीदेवीच्या तत्त्वाची स्पंदने आकर्षित करणारा आकृतीबंध असणार्‍या सनातन-निर्मित रांगोळीतही आहे. या दोन्ही कलाकृती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सनातनच्या साधक-कलाकारांनी बनवल्या आहेत. त्यामुळे या चाचणीतूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सूक्ष्मातील ज्ञानाची सत्यता स्पष्ट होते.

 

३. तथाकथित बुद्धीवादी पसरवत असलेल्या
विकल्पांचा फोलपणा वैज्ञानिक चाचण्यांच्या निष्कर्षांतून स्पष्ट होणे

सनातन सांगत असलेले देवतांच्या सनातन-निर्मित सात्त्विक चित्रांतील देवतातत्त्व, सनातन-निर्मित रांगोळ्यांतील देवतातत्त्व, साधकांची आध्यात्मिक पातळी, इत्यादी आकडेवारींच्या सत्यतेविषयी तथाकथित बुद्धीवादी साशंकता व्यक्त करून समाजाची दिशाभूल करतात. यायोगे ते समाजाची अपरिमित हानी करत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातील ज्ञानाद्वारे दिलेल्या संबंधित आकडेवारींच्या सत्यतेला वैज्ञानिक चाचण्यांच्या निष्कर्षांतून कसा दुजोरा मिळतो, हे वरील उदाहरणांतून स्पष्ट होते. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेल्या अशा प्रकारच्या शेकडो चाचण्यांमध्ये प्रत्येक वेळी असेच दिसून आले आहे.

Leave a Comment