विविध प्रसंगांतून प.पू. बाबांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कारणमीमांसेच्या पलीकडे घेऊन जाणे

विविध प्रसंगांतून प.पू. बाबांनी (प.पू. भक्तराज महाराज यांनी) परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कारणमीमांसेच्या पलीकडे घेऊन जाणे, त्याची काही उदाहरणे येथे दिली आहेत.

‘न भूतो न भविष्यति’ असा प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवाचा अपूर्व सोहळा आयोजित करून त्यांना प्रसन्न करणारे शिष्योत्तम परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले !

९ फेब्रुवारी १९९५ या दिवशी परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचा अमृत महोत्सवाचा सोहळा इंदूर येथे आयोजित केला होता.

सुखसागर सेवाकेंद्राच्या बांधकामाची सेवा करतांना श्री. भूषण मिठबांवकर यांनी अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सर्वज्ञता आणि प्रीती !

वर्ष १९९९ ते २००० या काळात देवाच्या कृपेने मला फोंडा, गोवा येथील सुखसागर सेवाकेंद्रात रहाण्याची आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना जवळून अनुभवण्याची संधी मिळाली.

सेवेतील बारकावे शिकवून भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करायला शिकवणारे प.पू. डॉक्टर !

एखादे बांधकाम करायचे म्हटले की, त्यासाठी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो; पण ते बांधकाम परिपूर्ण आणि भावपूर्ण केल्यासच कौशल्यपूर्ण होऊन त्यात जिवंतपणा येऊन शकतो, हे आम्हाला शिकवले, ते केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच !

अस्वच्छता आणि अव्यस्थितपणा असेल तेथे अनिष्ट शक्तींचा प्रादुर्भाव होणे आणि प.पू. डॉक्टरांनी आश्रमातील वाईट स्पंदने दूर करण्यासाठी स्वतः स्वच्छता करणे

फोंडा आश्रमात असलेली अस्वच्छता, अव्यस्थितपणा यांमुळे तेथे अनिष्ट शक्तींचा पुष्कळ त्रास असणे आणि प.पू. डॉक्टरांनी आश्रमात सर्वत्र फिरून अस्वच्छता आणि अव्यस्थितपणा दूर करवून घेतल्याने वास्तूतील त्रास उणावणे

साधकांना कधी विनोदातून, तर कधी गंभीरपणे अध्यात्म शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) भक्तांना विनोदातून काही ना काही अध्यात्म शिकवत असत. त्याप्रकारे प.पू. डॉक्टरही साधकांना विनोदातून शिकवतात. संत आणि गुरु यांचे वाक्य हे ब्रह्मवाक्य असते आणि ते समष्टीला काहीतरी शिकवते.

समाजाच्या उत्थानासाठी साधना या विषयांवरील प्रवचनांच्या ध्वनीफितींच्या निर्मितीच्या माध्यमातून यज्ञ करणारे !

वर्ष १९९० ते १९९६ या कालावधीत संस्थेच्या अध्यात्मप्रसाराचे कार्य म्हणून काही जिल्हे, तालुके आणि शहरे या ठिकाणी प.पू. डॉक्टर अभ्यासवर्ग घेत असत. पुढे वर्ष १९९७ ते १९९९ या कालावधीत प.पू. डॉक्टरांनी महाराष्ट्र, गोवा अन् कर्नाटक या राज्यांमध्ये १०० हून अधिक जाहीर प्रवचने घेतली. सर्व ठिकाणच्या प्रवचनांचे चित्रीकरण करून त्यांचे एकत्रित संकलन करण्यासाठी अडचण येऊ नये, यासाठी सर्व प्रवचनांच्या वेळी एकच झब्बा आणि पॅन्ट वापरली….

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आदर्श जीवन पद्धती !

प.पू. डॉ. आठवले प्रसिद्धीपराङ्मुख असल्याने मागील वर्षापर्यंत त्यांनी कुठल्याही अंगाने त्यांचे श्रेष्ठत्व जगजाहीर करण्यास साधकांना अनुमती दिली नाही. साधकांना प.पू. डॉक्टर यांच्यासंदर्भात शेकडो अनुभूती येऊनही प.पू. डॉक्टर त्याचे सर्व कर्तेपण श्रीकृष्णाला देऊन त्यापासून अलिप्त रहात.