सनातनची गुरुपरंपरा !

‘भृगु महर्षींनी जीवनाडीपट्टी वाचनात सांगितले, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्यातील गुरुशक्ती संक्रमित करून त्यांना (सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना) ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ घोषित करावे.’

सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले संत असतांनाही त्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचे शिवधनुष्य उचलले आहे ! एक मराठी व्यक्तीच असे करू शकते !

जेव्हा देशाची स्थिती अत्यंत नाजूक झालेली आहे, तेव्हा मराठी व्यक्तींनी देशाचा कार्यभार सांभाळला आहे. मराठी व्यक्तीच असे कार्य करू शकते, असे प्रतिपादन भाजपचे मध्यप्रदेशातील माळवा प्रांताचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. विवेक जोशी यांनी येथे केले. 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा कृतज्ञताभाव दर्शवणार्‍या अद्वितीय आणि आदर्शवत् कृती !

प.पू. डॉक्टर ‘प्रत्येक वस्तू देवानेच दिलेली आहे’, या कृतज्ञतेने अतिशय प्रेमाने ती हाताळतात. प्रत्येक वस्तूचा अगदी शेवटपर्यंत वापर करतात. त्यांच्या कृतज्ञताभावामुळे वस्तूंमध्ये जिवंतपणा येतो.

बंगालमधील डॉ. शिवनारायण सेन यांनी ६५ टक्के, तर डॉ. कौशकचंद्र मल्लिक आणि तमिळनाडू येथील अर्जुन संपथ यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

बंगालसारख्या प्रतिकूल परिस्थितीत धर्मशास्त्राची ज्योत तेवत ठेवण्याचे कार्य करणारे शास्त्रधर्म प्रचारसभेचे सचिव डॉ. शिवनारायण सेन यांनी ६५ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, असे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी हिंदू अधिवेशनात घोषित केले.

असा झाला जन्मोत्सव सोहळा !

भूलोकीचा वैकुंठ असलेला सनातनचा रामनाथी आश्रम त्या दिवशी अंगाखांद्यावर अनेक आभूषणे लेऊन पुलकित झाला होता ! आश्रमात निनादणारे सामवेदाचे स्वर, साधकांची लगबग, सारे वातावरण असे की, जणू विष्णुलोक भूवरी आला !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने रामनाथी आश्रमात करण्यात आलेले विविध यज्ञ

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ४ मे ते ८ मे २०१८ या कालावधीत रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात विविध यज्ञ करण्यात आले. त्या यज्ञांचे महत्त्व आणि त्यांचे वैशिष्ट्य येथे देत आहोत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राजमातंगी यज्ञ भावपूर्ण वातावरणात संपन्न

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ४ मेपासून विविध यज्ञ रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पार पडले. ८ मे या दिवशी राजमातंगी यज्ञ भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘नवग्रह शांती’ या यज्ञविधीसाठी यज्ञस्थळी जातांना कपाळावर कुंकवाचा टिळा (नाम) लावून गेल्याने त्यांना झालेला आध्यात्मिक स्तरावरील लाभ

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी यज्ञस्थळी जातांना कपाळावर टिळा लावल्यावर त्यातून त्यांना सगुण चैतन्य मिळाल्याने त्यांची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ आणि एकूण प्रभावळ वाढली.

रामनाथी येथील सनातनचा आश्रम बनला ‘भूलोकीचे वैकुंठधाम’ !

अखिल ब्रह्मांडाच्या पालनकर्त्या श्रीविष्णूच्या क्षीरसागरातील वैकुंठधामात जसे वातावरण असेल, तसे विष्णुमय वातावरण श्रीविष्णूचे अंशावतार असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले वास्तव्य करत असलेल्या आश्रमात निर्माण झाले होते.

७६ व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे श्रीविष्णुरूपात साधकांना दर्शन

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी महर्षींच्या सांगण्यावरून जन्मोत्सवाच्या निमित्ताने धारण केलेले श्रीविष्णूचे रूप पाहून भाग्यवान असलेल्या सनातनच्या साधकांनी त्यांना भावरूपी कृतज्ञतापुष्प मनोमन अर्पण केले आणि स्वतःच्या मन:पटलावर भावसोहळ्याचे सुवर्णक्षण कोरून ठेवले.