पंचतत्त्वाच्या सर्वप्रथम होणार्‍या कार्यकारी प्रकटीकरणाचा आरंभबिंदू म्हणजे प.पू. डॉक्टरांचा देह, तसेच त्यांची खोली !

प.पू. डॉक्टरांचा देह, तसेच त्यांची खोली यांच्या माध्यमातूनच सर्वप्रथम पंचतत्त्वाच्या प्रत्यक्ष कार्यकारी प्रकटीकरणाला आरंभ झाला आहे, असे लक्षात आले आहे. त्यांची प्रत्यक्ष उदाहरणे येथे देत आहे.

प.पू. डॉक्टरांच्या ग्रंथातील ज्ञानामुळे साधना करणारे जीव निर्माण होणे !

अमावास्येच्या रात्रीनंतर हळूहळू पहाट होते. त्या वेळेस सूर्याची पुसटशी लालीमा असते. ती लालीमा म्हणजे सूर्योदयाचा संकेत असतो. तसेच अंधःकाराच्या समाप्तीचा संकेत असतो. त्या लालीमेच्या उदयानेच सृष्टीत परिवर्तन होण्यास आरंभ होतो.

प.पू. डॉक्टरांचे शिष्यरूप

उच्च विद्याविभूषित असलेल्या प.पू. डॉक्टरांनी त्यांच्या गुरूंची, परात्परगुरु प.पू. भक्तराज महाराज यांची तन-मन-धन अर्पून परिपूर्ण सेवा केली.