परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील प्रकाशात वाढ होणे, तसेच खोलीतील दंडदीपाचा तेजस्वीपणाही वाढणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अस्तित्वामुळे त्यांच्याकडून प्रक्षेपित होणा-या चैतन्याचा केवळ त्यांच्या खोलीतील वातावरणावरच परिणाम झाला, असे नसून त्या खोलीतील प्रत्येक वस्तूवरच झाला आहे. त्यामुळे त्यांच्या खोलीतील दंडदीपावरही तो झाला असून ती चैतन्यमय झाली आहे.

गुरुकृपायोगानुसार साधनेअंतर्गत स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवल्यामुळे साधकांना झालेला आध्यात्मिक स्तरावरील लाभ

जीवनात कोणत्याही कठीण प्रसंगी मानसिक संतुलन बिघडू न देता त्या प्रसंगाला धैर्याने तोंड देता यावे, तसेच नेहमी आदर्श कृती व्हावी, यासाठी व्यक्तीचे मनोबल उत्तम अन् व्यक्तीमत्त्व आदर्श असणे आवश्यक असते. स्वभावदोेष व्यक्तीचे मन दुर्बल करण्यास कारणीभूत ठरतात

वेदमूर्ती कोतवडेकर गुरुजी, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातन संस्था

वयाच्या नव्वदीतही वेदमूर्ती कोतवडेकर गुरुजींना वेदांचा प्रचार आणि प्रसार करण्याची तळमळ होती. ते सतत अध्ययन करत असत. वेदांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर प्रवास केला होता. अनेक मान-सन्मान मिळवूनही त्यांना वृथा अभिमान नव्हता. मित आहार आणि स्वावलंबन हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

सनातन आश्रमातील कोटा लादीवर आपोआप उमटलेल्या ॐ भोवती पांढरट वलये निर्माण होणे

परमेश्‍वराचा वाचक असणारा ॐ हे एक सात्त्विक चिन्ह आहे. यातून वातावरणात पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होते. लादीवर उमटलेल्या ॐ भोवती बनलेली पांढरट वलये ही या ॐमधून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे बनली आहेत.

सर्वस्वाचा त्याग करून साधनेतील आनंद अनुभवणाऱ्या साधकांना आश्रय देणारी आणि त्यांना उच्च लोकांतील अनुभूती देणारी पवित्र वास्तू म्हणजे सनातनचे आश्रम !

सनातनचे आश्रम म्हणजे सर्वस्वाचा त्याग करून तन, मन आणि धन अर्पण करणार्‍या जिवांची वास्तू ! येथे रहाणारे साधक स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी आलेले अन् जीवनातील एकेक क्षण याचकभावाने जगणारे असतात.

काळा आणि पांढरा या रंगांचे पोषाख परिधान केल्यावर त्यांचा तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी ‘ईश्‍वरनिर्मित सृष्टी अनेकविध रंगांनी नटली आहे. भूमी मातकट रंगाने, तर वृक्षवल्ली हिरव्या रंगाने नटलेल्या आहेत. ‘आपल्या जीवनात रंग नसते, तर….’, अशी एक क्षण कल्पना करून पहा. असे झाले असते, तर जीवन निरस झाले असते. पांढरा हा सप्तरंगांना सामावून घेणारा रंग आहे. सध्या समाजात … Read more

पखवाजवादनाचा (मृदंगवादनाचा) वाद्य, वादक, वनस्पती, पक्षी, तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक यांवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

‘पखवाज वाजवतांना प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वाद्य, वादक, वनस्पती, पक्षी, तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक, यांच्यावर काय परिणाम होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली.

सनातनचे प्रसारसेवक श्री. नीलेश सिंगबाळ (वय ५१ वर्षे) सनातनच्या ७२ व्या समष्टी संतपदावर विराजमान !

पूर्व उत्तरप्रदेश, झारखंड, बंगाल आणि ओडिशा या राज्यांचे सनातनचे प्रसारसेवक तथा सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे पती श्री. नीलेश सिंगबाळ (वय ५१ वर्षे) हे १८ डिसेंबरला सनातनच्या ७२ व्या समष्टी संतपदावर विराजमान झाले.

रामनाथी आश्रमात वाईट शक्तींनी काही प्राण्यांच्या माध्यमातून स्थुलातून वावरून आश्रमातील चैतन्य नष्ट करण्यासाठी त्रासदायक शक्तीचे प्रक्षेपण करण्याविषयी लक्षात आलेल्या घटना

काही दिवसांपासून आश्रमात आणि आश्रमाच्या परिसरामध्ये प्रथमच त्रासदायक शक्ती विविध असात्त्विक प्राण्यांच्या माध्यमातून स्थुलातून वावरत आहेत आणि त्या आश्रमातील चैतन्य न्यून करण्याचा प्रयत्न करत आहेत.