सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले संत असतांनाही त्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचे शिवधनुष्य उचलले आहे ! एक मराठी व्यक्तीच असे करू शकते !

भाजपचे माळवा (मध्यप्रदेश) प्रांताचे अध्यक्ष विवेक जोशी

उज्जैन (मध्यप्रदेश) – एक आध्यात्मिक संस्था असतांनाही आणि तिचे संस्थापक (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले संत असतांनाही त्यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे मोठे शिवधनुष्य उचलले आहे. तात्पर्य जेव्हा देशाची स्थिती अत्यंत नाजूक झालेली आहे, तेव्हा मराठी व्यक्तींनी देशाचा कार्यभार सांभाळला आहे. मराठी व्यक्तीच असे कार्य करू शकते, असे प्रतिपादन भाजपचे मध्यप्रदेशातील माळवा प्रांताचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. विवेक जोशी यांनी येथे केले. त्यांनी मराठी व्यक्तींविषयी बोलतांना लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आदी क्रांतीपुरुषांविषयी सांगितले. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर येथील महाराष्ट्र समाजाकडून त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमस्थळी सनातनकडून ग्रंथप्रदर्शन कक्ष लावण्यात आला होता. तसेच संस्थेकडूनही श्री. जोशी यांचा सत्कार करण्यात आला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात