क्रियमाण १०० टक्के वापरावे !

आपण काही वेळा ‘अमुक एक केले नाही, तरी देवाच्या कृपेने काही अडचण आली नाही’, असे अनुभव सांगतो किंवा ऐकतो. त्या वेळी आपले क्रियमाण योग्य न वापरल्यामुळे देवाला तेथे अधिक शक्ती व्यय करावी लागलेली असते. असे होऊ नये म्हणून आपले १०० टक्के क्रियमाण वापरावे. – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

कठोर प्रयत्न केले, तरच साधनेत प्रगती होते !

कुंभाराला एखादे मातीचे भांडे बनवण्यासाठी प्रथम माती चाळावी लागते. माती एकसारखी कालवावी लागते. लहानसे भांडे बनवण्यासाठी एवढी प्रक्रिया करावी लागते. असे आहे तर देवाशी एकरूप होण्यासाठी साधनेचे कठोर प्रयत्न करावे लागणारच ना ! – श्रीसत्‌शक्‍ति सौ. बिंदा सिंगबाळ

प्रयत्नांना तळमळीची जोड दिल्यास आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होणार आहे !

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितले आहे, तळमळीला ८० टक्के महत्त्व आहे. भावजागृतीचे प्रयत्न, स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन प्रक्रिया, तसेच सेवा करतांना तिला तळमळीची जोड दिली, तर आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होईल. – श्रीसत्‌शक्‍ति सौ. बिंदा सिंगबाळ

सर्व गोष्टींचा कर्ता-करविता असलेल्या देवाचे अस्तित्व नाकारणारे बुद्धीप्रामाण्यवादी !

‘कर्त्याने बनवलेली गोष्ट कर्त्यापेक्षा कधीच श्रेष्ठ असू शकत नाही, उदा. सुताराने बनवलेली आसंदी (खुर्ची) सुतारापेक्षा कधीच श्रेष्ठ असू शकत नाही. असे असतांना देवाने बनवलेले काही मानव मात्र सर्व गोष्टींचा कर्ता-करविता असलेल्या देवालाच क्षुल्लक समजतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अहंकारी बुद्धीप्रामाण्यवादी !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ‘मला सर्व कळते’, असा अहंकार असतो. त्यामुळे काही जाणून घ्यायची जिज्ञासा नसल्याने बुद्धीपलीकडील अध्यात्मशास्त्र त्यांना मुळीच ज्ञात नसते आणि तरीही ते अध्यात्मातील अधिकारी संतांवर टीका करतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

तृतीय महायुद्धाच्या काळात स्वत:ला वाचवण्यासाठी साधना करा !

‘कोणताही राजकीय पक्ष तृतीय महायुद्धाच्या काळात हिंदूंचे रक्षण करू शकणार नाही; कारण त्यांच्याकडे आध्यात्मिक बळ नाही. त्या काळात स्वतःला वाचवण्यासाठी आतापासून साधना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञानाच्या तुलनेत अध्यात्माचे अद्वितीयत्व !

‘विज्ञानासारखे बुद्धीगम्य शिक्षण ‘जीवन सुखाने कसे जगायचे’, हे शिकवण्याचा प्रयत्न करते, तर अध्यात्म ‘जीवन आनंदाने कसे जगायचे आणि जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून कसे सुटायचे’, हे शिकवते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘घरच्याला किंमत नसते’, ही म्हण सार्थ करणारे भारतातील हिंदू !

‘जगभरचे जिज्ञासू चिरंतन आनंदप्राप्तीसाठी अध्यात्म शिकायला जगातील इतर कोणत्याही देशात न जाता भारतात येतात, तर भारतीय केवळ सुखप्राप्तीसाठी अमेरिका, इंग्लंड इत्यादी देशांत जातात !’ – सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) आठवले

हिंदु राष्ट्र आणि अहंभाव निर्मूलन !

‘हिंदु राष्ट्रात अहंभाव जोपासणार्‍या व्यक्तीस्वातंत्र्यावर बंधन असेल आणि समाजस्वास्थ्य अन् राष्ट्ररक्षण जोपासणार्‍या आणि त्याद्वारे अहं नष्ट करून ईश्वरप्राप्ती करून देणार्‍या समष्टी साधनेला प्राधान्य असेल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु धर्माचे माहात्म्य !

‘कुठे आई-वडिलांनाही वृद्धाश्रमात अडगळीप्रमाणे टाकून देणारी पाश्‍चात्त्य वळणाची हल्लीची पिढी, तर कुठे ‘हे विश्‍वचि माझे घर’, असे शिकवणार्‍या हिंदु धर्मातील आतापर्यंतच्या पिढ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले