भावातील सातत्य आपली आध्यात्मिक पातळी वाढवते
देवाप्रती भाव असेल, तर तो प्रत्येक परिस्थितीत आपल्याला स्थिर ठेवतो. भावातील सातत्य आपली आध्यात्मिक पातळी वाढवते आणि आपल्याला साधनेत पुढे नेते. – श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ
देवाप्रती भाव असेल, तर तो प्रत्येक परिस्थितीत आपल्याला स्थिर ठेवतो. भावातील सातत्य आपली आध्यात्मिक पातळी वाढवते आणि आपल्याला साधनेत पुढे नेते. – श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ
‘मन चांगले आणि शुद्ध असल्यावर सर्व करता येते. मन निर्मळ झाल्यावर आपोआपच आपली फलनिष्पत्ती वाढते. मनाच्या निर्मळतेमुळे कोणतेही कर्म करतांना आनंद मिळतो आणि मनुष्य ताणमुक्त होऊन लवकर ईश्वरापर्यंत पोचतो. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
‘गीता केवळ शिकू नका, तर तिच्यातील शिकवण कृतीत आणून हिंदु राष्ट्राची स्थापना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका इत्यादी देशांतीलच नव्हे, तर भारतातील काश्मीरसह सर्वत्रच्या हिंदूंना आता कुणाचा आधार नाही. तो देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘आता एकेका अशिलाची बाजू मांडणारे नव्हे, तर राष्ट्र आणि धर्म यांची बाजू मांडणारे राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी अधिवक्ता हवेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘आता एकेका रुग्णासाठीचे नव्हे, तर मरणोन्मुख स्थितीतील राष्ट्र आणि धर्म यांसाठी सहस्रो डॉक्टर (आधुनिक वैद्य) हवेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘तन, मन, धन आणि अहं यांचा त्याग झाला अन् ईश्वराप्रती भाव अन् भक्ती वाढली की, ईश्वराची कृपा होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘ईश्वरप्राप्ती हे अर्धवेळ काम (Part time job) नसून ती पूर्णकालीन साधना आहे. यासाठी आपली प्रत्येक कृती आपण भक्तीभावाने केली पाहिजे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘भारतातील स्वातंत्र्यापासूनची ७५ वर्षे भारतावर राज्य केलेल्या आतापर्यंतच्या सरकारांनी नव्हे, तर संतांनीच भारताची जगात किंमत राखली आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘हल्ली पाश्चात्त्य देशांत बहुधा भांडायला हक्काचे कुणी असावे; म्हणून लग्न करतात ! पुढे भांडणाचा कंटाळा आला की, घटस्फोट घेतात. नंतर पुन्हा लग्न करतात आणि पुन्हा घटस्फोट घेतात. असे चक्र चालू रहाते ! आपल्याकडे ही स्थिती होऊ नये; म्हणून साधना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले