त्याग आणि संयम यांचे महत्त्व

‘वाईट गोष्टींचा प्रभाव वाढल्यावर सज्जन एकत्र येतात. सत्त्वगुणी लोकांची एकजूट होण्यासाठी वाईट लोक हे कारण आहे. एकत्रीकरणासाठी वाईट गोष्टी समोर येणे आवश्यक आहे. त्या आल्यावर दोघांचे युद्ध आणि संघर्ष चालू असतो. ‘हे भगवंताचे नियोजन आहे’, हे समजणे कठीण आहे. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एखाद्या गोष्टीतील सात्त्विकता गेल्यावर तिच्यात रज-तमात्मक बाजू निर्माण होते. एखाद्या … Read more

रज-तमात्मक गोष्टींना विरोध करून सात्त्विकतेला प्राधान्य द्या !

व्यापारी लोक लाभासाठी चिनी आणि रज-तमात्मक साहित्याची विक्री करतात. या मनोवृत्ती पालटल्या पाहिजेत. जे रज-तमात्मक गोष्टींना प्राधान्य देतात, त्यांना विरोध करून सात्त्विकतेला प्राधान्य देणे, हे आपले कार्य आहे.

साधकांनो, ‘चैतन्याद्वारेच कार्य होते’, हे लक्षात घ्या आणि हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी सिद्ध व्हा !

‘स्वतः दृढ निश्‍चय करून उठल्यासच कार्य होते. दुसर्‍याकडून अपेक्षा करून ते होत नाही. स्वतःवरील आवरण काढले, तरच चैतन्य दिसेल आणि चैतन्यात इतके सामर्थ्य असते की, तेच कार्य करतांना दिसून येते. अशा रितीने जेव्हा मोठ्या संख्येने साधक सिद्ध होऊन कार्यरत होतात, तेव्हा दावाग्नी पेटून रज-तमात्मक अशा वातावरणातील अनिष्ट शक्तींचे निर्मूलन सहज-सुलभ रितीने होते. अशा प्रकारे हिंदु … Read more

नामस्मरण म्हणजे काय ?

अ. ‘मी जिवंत आहे. माझा प्रत्येक क्षण भगवंताच्या अनुसंधानात आहे’, हा विचार सतत असणे, हे खरे जीवन आहे. याला ‘नामस्मरण’ म्हणतात. आ. भगवंताच्या स्मरणात घडलेले प्रत्येक कर्म, म्हणजे नामस्मरण !’

परात्पर गुरु पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

‘भगवंताची सेवा करून ती त्याला अर्पण करणे आणि त्यातून आनंद घेणे’, हे खरे जीवन ! ‘ईशावास्योपनिषदामध्ये म्हटले आहे, ‘भगवंत सर्वत्र इतका ठासून भरला आहे की, त्यात एकही अणूमात्र अवकाश नाही. त्यामुळे ‘तो नाही’, हा प्रश्‍नच येत नाही.’ त्यामुळे ‘कृपा’ हा प्रश्‍नच उद्भवत नाही. यासाठी तो म्हणतो, ‘तुला दिलेले शरीर, चित्त, मन, बुद्धी, अहं, पाच कर्मेंद्रिये, … Read more

स्वेच्छा लवकर नष्ट करण्याच्या संदर्भात आश्रमात रहाण्याचे महत्त्व

‘दिवसभर साधकाच्या हातून ज्या कृती होतात, त्या स्वेच्छेने होत असतात. स्वेच्छा नष्ट करण्यासाठी आश्रमात रहाणे हा सर्वांत सोपा मार्ग आहे. आश्रमात राहिल्यावर प्रत्येक गोष्ट कोणीतरी सांगितल्याप्रमाणे करावी लागते. त्यामुळे स्वेच्छा लवकर नष्ट होण्यास साहाय्य होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२४.२.२०१७)

अहंभाव असलेले लेखापरीक्षक आणि अहंभावशून्य भगवंत

‘लेखापरीक्षक काही व्यक्तींचे लेखा परीक्षण करतात आणि त्याचा त्यांना अहंभाव असतो. याउलट भगवंत अनंत कोटी ब्रह्मांडांतील प्रत्येक जिवाचा क्षणाक्षणाचा हिशोब (अकाऊंट) ठेवतो, तरी तो अहंशून्य आहे !’ आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.१२.२०१६)

हिंदु धर्मातील अध्यात्म सूक्ष्म आध्यात्मिक स्तरावरचे आहे, तर इतर धर्मांतील…

हिंदु धर्मातील अध्यात्म सूक्ष्म आध्यात्मिक स्तरावरचे आहे, तर इतर धर्मांतील अध्यात्म मानसिक स्तरावरचे आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.३.२०१७)

आधुनिक शिक्षण

माणुसकी शिकवणारी साधना सोडून इतर सर्व विषय शिकवणार्‍या आधुनिक शिक्षण प्रणालीमुळे राष्ट्राची परमावधीची अधोगती झाली आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१०.२.२०१७)

ऋषींच्या सांगण्याप्रमाणे देह उभा चिरून देत असतांना त्याग सत्कारणी लागल्याने राजाच्या डोळ्यांत आनंदाश्रू येणे

‘एक राजा त्यागासाठी प्रसिद्ध होता. एकदा त्याची परीक्षा घेण्यासाठी एक ऋषी त्याच्याकडे गेले. ऋषी म्हणाले, ‘‘राजा, तुझे शरीर उभे चिरून त्यातील उभा भाग मला दे; परंतु तू खरा त्यागी असशील, तर तुझ्या डोळ्यांत दुःखाश्रू येता कामा नयेत.’’ राजाचे शरीर उभे चिरण्यास आरंभ झाला. तेव्हा राजाच्या दोन्ही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ऋषी म्हणाले, ‘‘राजा, तुझा त्याग … Read more