बुद्धीप्रामाण्यवादी म्हणजे काय ?
‘एखाद्या विषयाचा अभ्यास नसतांना त्यावर बडबडणारे म्हणजे बुद्धीप्रामाण्यवादी !’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले
‘एखाद्या विषयाचा अभ्यास नसतांना त्यावर बडबडणारे म्हणजे बुद्धीप्रामाण्यवादी !’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले
‘कथा आणि कादंबर्या यांमधून मांडण्यात येणार्या संकल्पना काल्पनिक असतात. त्यात मांडलेल्या विचाराला विज्ञानाचा आधार नसतो. सध्याचा भ्रमणभाषचा शोध हा १८ – १९ व्या शतकातील लोकांसाठी कल्पनातीत होता. काल्पनिक आणि कल्पनातीत या दोन शब्दांमध्ये असा भेद आहे. तशाच प्रकारे सनातनच्या काही साधकांना मिळणारे विविध विषयांवरील ज्ञान हे ‘कल्पनातीत’ आहे. या ज्ञानात दिलेली एखाद्या घटनेमागील आध्यात्मिक कारणमीमांसा … Read more
शरीर, मन, बुद्धी इत्यादी कोणत्याही गोष्टींच्या संदर्भात जगातील ७५० कोटींपैकी कोणत्याही दोन व्यक्तींत साम्य नाही ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘एक तरी चांगला प्रशासकीय अधिकारी दाखवा आणि पारितोषिक मिळवा’, असे सांगायची आज पाळी आली आहे. हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘सध्या समाजात प्रत्येक जण मानसन्मान आणि प्रतिष्ठा यांसाठी विविध पदव्या अन् पैसे मिळवतात. याउलट सनातन संस्थेमध्ये प्रत्येक जण कोणत्याही व्यावहारिक फळाची अपेक्षा न करता तन, मन आणि धन यांचा अधिकाधिक त्याग करतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘एखादी घटना घडली की, विज्ञान ती घडण्यामागील केवळ भौतिक कारणांचा अभ्यास करते. त्यामागे काही कार्यकारणभाव असतो, हे विज्ञानाला अद्याप कळलेले नाही, उदा. एखाद्या बसला अपघात घडून त्यामध्ये २० प्रवासी मेले आणि १ प्रवासी वाचला. या घटनेमध्ये विज्ञानाच्या दृष्टीकोनातून अपघात होण्याची कारणे ‘रस्ता खराब असणे, बसमध्ये तांत्रिक बिघाड होणे, चालकाची चूक असणे’ यांसारखी मर्यादित असतील; पण … Read more
‘डॉक्टर, अधिवक्ते, लेखापरीक्षक, ज्योतिषी, पोलीस, मित्रमंडळी, नातेवाईक इत्यादी विविध क्षेत्रांतील तज्ञ जे करू शकत नाहीत. ते संत करू शकतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘राजकारण्यांकडून स्थुलातून अनुभव येतात, उदा. पूरग्रस्तांना साहाय्य करणे, साधनसुविधा उपलब्ध करून देणे, तर संतांकडून सूक्ष्म स्तरावरील उपायांमुळे अनुभव येतात, उदा. अनेकांच्या कौटुंबिक अडचणींसह शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि आध्यात्मिक अडचणी दूर होतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘संपूर्ण जगात आज कुठेही गेलो, तर या भूतलावरील विविध विषय इंग्रजी भाषेतून शिकता येतात. त्यामुळे सर्वत्र इंग्रजी भाषेला महत्त्व आले आहे. सर्व जण ती भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात. असे असले, तरी मनुष्यजन्माचे मूळ ध्येय, म्हणजे ‘ईश्वरप्राप्ती कशी करायची ?’, हे इंग्रजी भाषेतून शिकता येत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘वेदना झाल्या की, प्रत्येकालाच त्रास होतो आणि ‘त्या कधी थांबतील’, असे वाटते. प्रत्यक्षात वेदनेमुळे फार लाभही होतो. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत. १. एखाद्याच्या पायाचा अस्थिभंग झाला असेल आणि ते विसरून तो चालायला लागला, तर त्याला पुष्कळ वेदना होतात. प्रत्यक्षात वेदना त्याला अस्थिभंगाची जाणीव करून देतात. त्यामुळे तो चालायचा थांबतो. २. एखाद्याला जठरव्रण (अल्सर) … Read more