साधकांनो, ‘चैतन्याद्वारेच कार्य होते’, हे लक्षात घ्या आणि हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी सिद्ध व्हा !

‘स्वतः दृढ निश्‍चय करून उठल्यासच कार्य होते. दुसर्‍याकडून अपेक्षा करून ते होत नाही. स्वतःवरील आवरण काढले, तरच चैतन्य दिसेल आणि चैतन्यात इतके सामर्थ्य असते की, तेच कार्य करतांना दिसून येते. अशा रितीने जेव्हा मोठ्या संख्येने साधक सिद्ध होऊन कार्यरत होतात, तेव्हा दावाग्नी पेटून रज-तमात्मक अशा वातावरणातील अनिष्ट शक्तींचे निर्मूलन सहज-सुलभ रितीने होते. अशा प्रकारे हिंदु … Read more

नामस्मरण म्हणजे काय ?

अ. ‘मी जिवंत आहे. माझा प्रत्येक क्षण भगवंताच्या अनुसंधानात आहे’, हा विचार सतत असणे, हे खरे जीवन आहे. याला ‘नामस्मरण’ म्हणतात. आ. भगवंताच्या स्मरणात घडलेले प्रत्येक कर्म, म्हणजे नामस्मरण !’

परात्पर गुरु पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

‘भगवंताची सेवा करून ती त्याला अर्पण करणे आणि त्यातून आनंद घेणे’, हे खरे जीवन ! ‘ईशावास्योपनिषदामध्ये म्हटले आहे, ‘भगवंत सर्वत्र इतका ठासून भरला आहे की, त्यात एकही अणूमात्र अवकाश नाही. त्यामुळे ‘तो नाही’, हा प्रश्‍नच येत नाही.’ त्यामुळे ‘कृपा’ हा प्रश्‍नच उद्भवत नाही. यासाठी तो म्हणतो, ‘तुला दिलेले शरीर, चित्त, मन, बुद्धी, अहं, पाच कर्मेंद्रिये, … Read more

सर्वशक्तीमान आणि सर्वसमर्थ असल्याने ईश्‍वरच खरा दयाळू, अहिंसावादी आणि कृपाळू असणे

ईश्‍वरच खरा दयाळू आणि क्षमाशील आहे. माणसाने पुष्कळ पापे आणि कुकर्मे केली, तरी ईश्‍वर त्याला पुनःपुन्हा जन्म देऊन मोक्षप्राप्तीची संधी देतो. तो सर्वशक्तीमान आणि सर्वसमर्थ असल्याने दयावान, अहिंसावादी आणि कृपाळू आहे.

संस्काराने राष्ट्र तेजस्वी होणे

पिढ्यान्पिढ्या जेव्हा चांगले संस्कार होत असतात, तेव्हा ती आत्मशक्ती जागृत रहाते आणि चांगले नियोजन करून जीवन सुखदायी आणि समृद्ध करते. मध्येच जर संस्कार बंद पडले, तर ते पुन्हा प्रस्थापित करण्यास वेळ लागतो. तेथपर्यंत राक्षसीवृत्ती बोकाळून विघटनकारी कृत्ये सुरू होतात. त्याचे परिणाम समाजाला आणि राष्ट्राला भोगावे लागतात. आज भारताचे असेच झाले आहे. सुसंस्कार नाहीसे झाले आहेत … Read more

सगुणाची पूजा करतांना आपल्यातील भगवंत प्रसन्न व्हायला हवा !

सगुणाची पूजा, म्हणजे आपल्यातील निर्गुण ईश्‍वराला सगुणात आणून त्याची पूजा करत आहोत, असा भाव ठेवला, तर ती पूजा आत्मीयतेने होऊन आपल्यातील भगवंत प्रसन्न होतो.

मायेतील ब्रह्माविषयी कृतज्ञ असणे आवश्यक !

आपण मायेतील ब्रह्माला जवळ करत नाही, तर मायेशी संवाद साधतो. आपण मायेच्या मूळ रूपाला जाणत नाही, उदा. आश्रमातील जांभळे खातांना ती ज्याच्यामुळे मिळाली त्याची जाणीव आणि त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा विचार आपल्या मनात येत नाही. ज्या झाडाने जांभळे दिली त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली, तर झाड आणि जांभळे काढून देणारा हे दोघेही प्रसन्न होतील.

कार्य सत्य नसून कार्याचा कर्ता करविता ईश्‍वरच खरा सत्य होय !

कार्याचे व्यक्त स्वरूप आपल्यात दृष्यमान होत असते. त्यालाच आपण सत्य समजण्याची चूक करतो. प्रत्यक्षात कार्याचा कर्ता करविता (मन आणि ईश्‍वर) अव्यक्त असून तोच खरा सत्य असतो. अशा प्रकारे असत्याला सत्य मानल्याने सूक्ष्मातील ईश्‍वराशी आपले अनुसंधान रहात नाही. वास्तविक अव्यक्तच श्रेष्ठ असते.

आपल्याला जेव्हा इतरांच्या दोषांचा राग येतो, तेव्हा त्यांच्याकडे केवळ बाह्यांगाने न पहाता अंतरात्म्याकडे लक्ष देणे आवश्यक असणे

आपल्याला जेव्हा इतरांच्या दोषांचा राग येतो, तेव्हा आपण आपल्यावरील आवरणाकडे लक्ष देत असतो; पण त्याच्यातील कार्य करणार्‍या भगवंताकडे आपले लक्ष नसते. आपण त्यांच्या दोषांशी एकरूप न होता त्यांच्या स्थितीत जाऊन त्यांना दोष घालवायला कसे साहाय्य करता येईल ?, याचा विचार करायला हवा. आपण त्यांच्याकडे केवळ बाह्यांगाने न पहाता त्यांच्यातील अंतरात्म्याकडे लक्ष द्यायला हवे.

गुरुकृपायोगाद्वारे साधना करून स्वतःमध्ये पालट घडवून आणा आणि गुरुकृपेने येणार्‍या कोणत्याही कठीण परिस्थितीला सामर्थ्याने सामोरे जाण्यासाठी सिद्ध व्हा !

दैनिक सनातन प्रभातच्या वाचकांसाठी प.पू. पांडे महाराज यांचा संदेश ! दैनिक सनातन प्रभातच्या आदरणीय वाचकांना, सप्रेम नमस्कार. मानवाच्या हातून भूतकाळात घडलेल्या वाईट कर्मांचा परिणाम, म्हणजे आजची भयानक वर्तमान स्थिती आहे, जी आपण प्रतिदिन दैनिक सनातन प्रभातमधून वाचत आहोत. भारतीय संस्कृती आणि संत-महात्मे यांनी मानवाला भौतिक अन् पारमार्थिक दृष्टीने समर्थ होण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याप्रमाणे … Read more