बहुतेक गुरु अन् संत यांच्यातही थोडातरी अहंकार असतो; पण भगवंतामध्ये…
बहुतेक गुरु अन् संत यांच्यातही थोडातरी अहंकार असतो; पण भगवंतामध्ये अहंकार नसतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
बहुतेक गुरु अन् संत यांच्यातही थोडातरी अहंकार असतो; पण भगवंतामध्ये अहंकार नसतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
गुरु वाट दाखवतात. आपण त्या वाटेने चाललो, म्हणजे साधना केली, तरच पुढे जातो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
साधकांना एखादे संत किंवा त्यांचे गुरु यांच्या संदर्भात अनुभूती येतात. त्या अनुभूतींची ते संत किंवा गुरु यांना बहुधा जाणीव नसते. अशा अनुभूती देवच ते संत किंवा गुरु यांच्यावर साधकांची श्रद्धा निर्माण व्हावी, यासाठी त्यांचे रूप घेऊन देतो. क्वचित प्रसंगी संत किंवा गुरु स्वसामर्थ्याने अशा अनुभूती देतात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
साधनेचा प्रवास २ – ३ पावले पुढे आणि एखाद पाऊल मागे, असा असतो. एखाद पाऊल मागे पडल्यावर त्याची काळजी करू नये. बसने प्रवास करतांना ती मधे मधे थांब्यावर थांबते. तेव्हा आपण काळजी करत नाही. ती पुढे जाणार आहे, याची आपल्याला खात्री असते. त्याचप्रमाणे साधनेत एखादे पाऊल मागे पडल्यावर साधना करणार्याने त्याची काळजी करू नये. तो … Read more
१. वाईट वाटून घेऊ नका ! : एखाद्या वैद्यांनी एखाद्या रुग्णाला त्याच्या आजाराचे निदान सांगितले, तर त्याला आनंद होतो; कारण आता योग्य उपचार होऊन आपण बरे होऊ, अशी त्याला खात्री वाटते. त्याचप्रमाणे एखाद्याला कोणी त्याच्या चुका सांगितल्या, तर त्याला वाईट वाटण्याऐवजी बरे वाटले पाहिजे; कारण आता तो त्या चुकांवर मात करून साधनेत पुढे जाऊ शकतो. … Read more
काही संप्रदायवाले आपल्या संप्रदायाचे महत्त्व इतरांवर बिंबावे; म्हणून त्यांच्या नियतकालिकांत काही जणांना आलेल्या शारीरिक आणि मानसिक स्तरांवरील सकामातील चांगल्या अनुभूती छापतात; पण हजारोंना अनुभूती आल्या नसल्याचे छापत नाहीत. त्यामुळे यांच्याकडे गेलो, तर आपल्या सर्व अडचणी दूर होतील, असे बर्याच जणांना वाटते आणि ते त्या संप्रदायात जातात. त्यांतील बहुतेकांना अनुभूती न आल्याने त्यांचा केवळ त्या संप्रदायावरीलच … Read more
जसे अन्न तसे मन, असे असल्यामुळे मांसाहार नको, तर शाकाहार करा ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
व्यावहारिक जीवनात आपल्याहून अधिक वयाच्या व्यक्तीला आपण नमस्कार करतो. याउलट अध्यात्मात वयाला महत्त्व नसते, तर आध्यात्मिक स्तराला महत्त्व असते ! लहान वयाच्या संतांनाही मोठ्या व्यक्ती आदराने नमस्कार करतात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
याज्ञिकांनो, यज्ञात हविर्द्रव्यांसह, म्हणजे आहुती द्यायच्या वस्तूंसह स्वतःतील अहंभाव आणि स्वभावदोष यांचीही आहुती द्या ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
मुसलमान आणि ख्रिस्ती त्यांचे हित पहाणार्यांनाच मते देतात, तर हिंदू बुद्धीप्रामाण्यवाद, समाजवाद, साम्यवाद इत्यादी निरनिराळ्या विचारसरणींप्रमाणे मते देतात. त्यामुळे त्यांची मते फुटतात. त्यामुळे त्यांना भारतात किंमत उरली नाही ! हिंदूंना धर्म शिकवला, तरच त्यांची मते इतर धर्मियांप्रमाणे एकगठ्ठा होतील. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले