अहंभाव असलेले लेखापरीक्षक आणि अहंभावशून्य भगवंत

‘लेखापरीक्षक काही व्यक्तींचे लेखा परीक्षण करतात आणि त्याचा त्यांना अहंभाव असतो. याउलट भगवंत अनंत कोटी ब्रह्मांडांतील प्रत्येक जिवाचा क्षणाक्षणाचा हिशोब (अकाऊंट) ठेवतो, तरी तो अहंशून्य आहे !’ आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.१२.२०१६)

अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वैराचार हे एक वेळ प्राण्यांचे वैशिष्ट्य असू शकते,…

अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वैराचार हे एक वेळ प्राण्यांचे वैशिष्ट्य असू शकते, माणसाचे नव्हे. धर्मबंधनात रहाणे, धर्मशास्त्रांचे अनुकरण, असे करणार्‍यांनाच माणूस म्हणता येते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (४.११.२०१६)

हिंदु धर्मातील अध्यात्म सूक्ष्म आध्यात्मिक स्तरावरचे आहे, तर इतर धर्मांतील…

हिंदु धर्मातील अध्यात्म सूक्ष्म आध्यात्मिक स्तरावरचे आहे, तर इतर धर्मांतील अध्यात्म मानसिक स्तरावरचे आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.३.२०१७)

कधी नव्हे एवढा हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला असतांना आणि…

कधी नव्हे एवढा हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला असतांना आणि त्यासाठी हिंदूंच्या एकजुटीची अतिशय आवश्यकता असतांना, जातीनुसार आरक्षण देणारे राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही राज्यकर्ते अन् राजकारणी हिंदूंमध्ये फूट पाडत आहेत. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२३.१२.२०१६)

आधुनिक शिक्षण

माणुसकी शिकवणारी साधना सोडून इतर सर्व विषय शिकवणार्‍या आधुनिक शिक्षण प्रणालीमुळे राष्ट्राची परमावधीची अधोगती झाली आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१०.२.२०१७)

अनुभवातून शहाणे न होणार्‍या भारतातील हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे, यात काय आश्‍चर्य !

स्वातंत्र्यापासून आतापर्यंत अनेक निवडणुका झाल्या. एका निवडणुकीत एखाद्या पक्षाला हिंदूंनी मत दिल्यामुळे तो निवडून आला, तरी देशाची स्थिती सुधारली नाही. हे लक्षात आल्यावर पुढच्या निवडणुकीत दुसर्‍या पक्षाला हिंदू मोठ्या आशेने निवडून आणतात. पुन्हा त्यांना आधीचाच अनुभव येतो. त्यामुळे ते पुढच्या निवडणुकीत पुन्हा पहिल्या पक्षाला मोठ्या आशेने निवडून आणतात. स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या ७० वर्षांत असे अनेकदा होऊनही … Read more

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या माध्यमातून संघटित झालेल्या हिंदुत्वनिष्ठांमध्ये भाव आणि कुटुंबभावना वाढीस लागणे

‘हिंदु राष्ट्र-स्थापनेचे ध्येय ठेवून गेली ५ वर्षे ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ आयोजित केले जात आहे. प्रतिवर्षी भारतातील अनेक राज्यांसह श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, या देशांमधील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी होत आहेत. याचा झालेला लाभ म्हणजे या अधिवेशनांमुळे सर्व हिंदुत्वनिष्ठांमधील संघटितपणा टप्प्याटप्प्याने वाढत जाऊन आता एकमेकांविषयी कुटुंबभावना निर्माण झाली आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अहोरात्र … Read more

हल्ली वृद्ध आई-वडिलांची काळजी त्यांची मुले घेत नाहीत. त्यांना वृद्धाश्रमात…

हल्ली वृद्ध आई-वडिलांची काळजी त्यांची मुले घेत नाहीत. त्यांना वृद्धाश्रमात पाठवतात. त्याचप्रमाणे शेतकरी वृद्ध झालेल्या गायी-बैलांना खाटिकखान्यात पाठवतात ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२५.१.२०१७)

साधना करण्यासंदर्भातील स्वेच्छा ही स्वेच्छा नसून ईश्‍वरेच्छाच असणे !

साधनेत सांगतात, स्वेच्छा नको. प्रथम सर्व परेच्छेने करण्यास शिका. नंतर ईश्‍वरेच्छा काय आहे ते कळेल आणि त्यानुसार सर्व करा. असे जरी असले, तरी साधना करण्यासाठी नोकरीच काय, तर घरदारही सोडण्याचा विचार करण्याची स्वेच्छा झाली, तरी ती योग्यच आहे. ही स्वेच्छा नसून ईश्‍वरेच्छाच असते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१.११.२०१६)

साधनेत आपली स्वेच्छा नष्ट करून सर्व ईश्‍वरेच्छेने करायचे, असे करता…

साधनेत आपली स्वेच्छा नष्ट करून सर्व ईश्‍वरेच्छेने करायचे, असे करता यायला लागले की, ईश्‍वरप्राप्ती होते. याउलट व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वेच्छेने वागणारे झपाट्याने अधोगतीला जातात. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३१.१०.२०१६)