खरे गुरु शिष्याकडून साधनेची प्रत्यक्ष कृती करून घेतात !

‘हे करा, ते करू नका’, असे बोलणारे अनेक जण असतात; पण ते तशी कृती किती जणांकडून करवून घेतात ? याउलट खरे गुरु शिष्याकडून ‘तन, मन आणि धन यांचा त्याग करायला शिकवणारी कृती’ करून घेतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

ईश्वराशी एकरूपता !

‘ईश्वरात स्वभावदोष आणि अहं नसतो. त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यातही ते नसणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

मृत्यू संकट नव्हे, तर संकटांतून सोडवणारा आशीर्वाद वाटणे !

‘७० – ७५ वर्षे आयुष्य जगल्यानंतर काही जणांना जीवनात आलेल्या कटु अनुभवांमुळे जगाचा कंटाळा येतो. अशा परिस्थितीत ‘बाहेर कुणाशी संपर्क नको. ‘मी आणि माझे जग’, यात रहावे’, असे त्यांना वाटते. महत्त्वाचे म्हणजे पुढे ‘आता लवकरच मृत्यू येऊन माझी या जगातून सुटका व्हावी’, असे वाटू लागल्यावर काही जणांना मरणाची ओढ लागते आणि मृत्यू हा संकट नव्हे, … Read more

कलियुगात ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ हाच साधनेचा पाया आहे !

‘सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांत माणसे सात्त्विक होती. त्यांच्यामध्ये स्वभावदोष आणि अहं अल्प होते. त्यामुळे ते कोणत्याही योगमार्गाने साधना करू शकत असत. आता कलियुग आहे. आता सर्वसामान्य मनुष्यामध्ये स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे, म्हणजे तो सात्त्विक नसल्याने त्याला साधना करणे अशक्यप्राय होते. कलियुगातील मनुष्याने प्रथम स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन केल्यास तो … Read more

विज्ञानाचे मूल्य ‘शून्य’ !

मानवाला माणुसकी न शिकवणार्‍या, उलट विध्वंसक अस्त्रे, शस्त्रे देणार्‍या विज्ञानाचे मूल्य शून्य आहे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘साधक’ या टप्प्यावर आल्यावर जिवाकडून होणारी साधना

‘जिज्ञासू साधना करू लागल्यावर तो ‘साधक’ या टप्प्याला येतो. या टप्प्याला आल्यावर साधनेतील ‘अनेकातून एकात येणे’, या नियमानुसार तो कर्मकांडातील पूजा, मंदिरात जाणे, उपवास करणे इत्यादी अनेक उपासनांऐवजी केवळ सांगितलेली साधनाच करतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१५.९.२०२१)

अध्यात्माचे श्रेष्ठत्व !

‘विज्ञान पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांनी समजून घेतात; म्हणून त्याला मर्यादा आहे. याउलट अध्यात्म पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील असल्याने ते अमर्याद आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

धर्म शब्दाचा अर्थ

‘अनिष्टांपासून जगाचे रक्षण करणारे, तसेच मानवाला ऐहिक आणि पारलौकिक उन्नतीसह मोक्ष मिळवून देणारे तत्त्व म्हणजे धर्म ! बहुतेक विदेशी भाषांत ‘धर्म’ शब्दाला समानार्थी शब्दही नाही ! असे असल्यामुळे त्यांना धर्माचरण करणे कठीण जाते.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

संशोधनाच्या संदर्भात कुठे बालवाडीतील असल्याप्रमाणे पाश्चात्त्य संशोधक, तर कुठे सर्वज्ञ ऋषि !

‘कुठे एखाद्या विषयाचे काही वर्षे संशोधन करून संख्याशास्त्रावरून (Statistics वरून) निष्कर्ष काढणारे पाश्‍चात्त्य संशोधक, तर कुठे कुठल्याही प्रकारचे संशोधन न करता मिळणार्‍या ईश्‍वरी ज्ञानामुळे कुठल्याही विषयांवरील निष्कर्ष तात्काळ सांगणारे ऋषि !’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

अध्यात्मात तेजतत्त्वापेक्षा सूक्ष्म असलेल्या आकाशतत्त्वाची अनुभूती कानांनी येत असल्याने डोळ्यांपेक्षा कान हे श्रेष्ठ ज्ञानेंद्रिय असणे

‘आपल्या दैनंदिन व्यावहारिक जीवनामध्ये आपल्या सर्व अवयवांमध्ये आपला सर्वात महत्त्वाचा अवयव डोळे असतात’, असे आपल्याला जाणवते. त्यामुळे ‘डोळे हा मनाचा आरसा असतात’, असेही म्हणतात; परंतु सृष्टीतील पंचभौतिक पदार्थांचे ज्ञान करून घेण्यासाठी ईश्‍वराने आपल्याला पंचज्ञानेंद्रिये दिली आहेत. पंचज्ञानेंद्रियांमध्ये डोळ्यांनी तेजतत्त्वाची अनुभूती येते, तर कानांनी आकाशतत्त्वाची अनुभूती येते. आकाशतत्त्व हे तेजतत्त्वापेक्षा अधिक सूक्ष्म असल्यामुळे कानांच्या माध्यमातून अधिक … Read more