संतांचे केवळ चरित्र वाचण्यापेक्षा त्यांची शिकवण आत्मसात करावी !

‘अनेक जण संतांचे चरित्र वाचतात, तर काही जण त्याची पारायणेही करतात. यात लक्षात घेतले पाहिजे की, संतांचे चरित्र वाचले, तर त्यातून ‘केवळ त्यांनी साधना कशी केली’, हे समजते. त्यांच्या चरित्रामध्ये त्यांनी चमत्कार केल्याचा उल्लेख असेल, तर त्यातून आपल्या मनात केवळ त्यांच्याविषयी विश्वास निर्माण होतो. त्यांची शिकवण अभ्यासली, तरच आपली साधनाही त्यांच्यासारखी होऊ शकते आणि आपल्या … Read more

‘हिंदु राष्ट्रा’साठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा !

‘नष्ट करणे सोपे असते; पण घडवणे कठीण असते. असे असले, तरी आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करून साधक आणि हिंदु राष्ट्र यांना घडवायचे आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भ्रष्ट राजकारण्यांना निवडून देणारी जनताच भारताच्या -हासास कारणीभूत !

‘गेल्या ७४ वर्षांमध्ये भारताची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रांमध्ये अतोनात अधोगती झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय जनतेने वेळोवेळी निवडून दिलेले भ्रष्ट राजकारणी ! एका अर्थाने भ्रष्ट राजकारण्यांना निवडून देणारी भारतीय जनताच भारताच्या र्‍हासास कारणीभूत आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

ज्यांच्या माध्यमातून चमत्कार घडतात, त्यांच्यावर होणारे आध्यात्मिक परिणाम !

१. कमी आध्यात्मिक पातळीचे : ‘मी हा चमत्कार घडवला’, असे वाटून त्यांचा अहंकार वाढतो. त्यामुळे त्यांची आध्यात्मिक पातळी अल्प होत जाते. २. अधिक आध्यात्मिक पातळीचे : ‘ईश्वराने हा चमत्कार घडवला’, याची जाण असल्याने त्यांचा ईश्वराप्रतीचा भाव वाढत जातो. त्यामुळे त्यांची आध्यात्मिक पातळी वाढत जाते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२६.१०.२०२१)

माणूस श्रेष्ठ कि प्राणी आणि वनस्पती ?

‘माणूस सोडून कोणताही प्राणी अथवा वनस्पती सुटी घेत नाही. देवही एक सेकंदाची सुटी घेत नाही. माणूस मात्र शनिवार आणि रविवार सुटी घेतो. एवढेच नव्हे, तर वर्षातूनही काही दिवस हक्काने सुटी घेतो. असे असतांना यासंदर्भात माणूस श्रेष्ठ कि प्राणी आणि वनस्पती ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संत कोणत्या नात्यांशी जोडलेले असतात ?

‘संत हे पत्नी, मुले इत्यादी मायेतील नात्यांशी जोडलेले नसतात, तर ते गुरु, गुरुबंधू, शिष्य यांसारख्या आध्यात्मिक स्तरावरील नात्यांशी जोडलेले असतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१३.११.२०२१)

तिस-या महायुद्धात देव कोणाला वाचवणार ?

‘जे हिंदु राष्ट्रात रहाण्याच्या योग्यतेचे आहेत, त्यांना आगामी तिसर्‍या महायुद्धात देवच वाचवणार आहे. त्यांची काळजी करू नका !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.८.२०२१)

अध्यात्म आणि संस्कृत भाषा यांचा संबंध

‘विज्ञानाची भाषा इंग्रजी आहे, तर अध्यात्माची भाषा संस्कृत आणि संस्कृतोद्भव भाषा आहेत. यामुळे ईश्वरप्राप्ती करू इच्छिणार्‍यांनी संस्कृत किंवा संस्कृतोद्भव भाषेतच अध्यात्म शिकावे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.११.२०२१)