सात्त्विक आचरण करतो, तो हिंदु !

‘जो रज-तमात्मक हीन गुण आणि त्यामुळे घडणारी कायिक, वाचिक अन् मानसिक स्तरांवरील हीन कर्मे यांना दूर करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजेच सात्त्विक आचरण करतो, तो ‘हिंदु’ !’ – परात्पर गुरु डॉ. आठवले (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’)

‘धर्म’ हा राष्ट्राचा ‘प्राण’ आहे !

‘धर्म’ हा राष्ट्राचा ‘प्राण’ आहे. प्राण गेल्यानंतर देहाला महत्त्व उरत नाही, तो कुजू लागतो. आज तीच अवस्था धर्मनिरपेक्ष भारताची होत आहे.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘ईश्वरी राज्याची स्थापना’)

भौतिक विकासाच्या दृष्टीने धर्माचे अनन्यसाधारण महत्त्व !

‘भौतिक विकासाच्या दृष्टीनेही धर्म महत्त्वाचा आहे ! दुर्दैवाने आज ‘भौतिक विकास म्हणजेच सारे काही’, असे समजले जात आहे. ‘मेट्रो’, ‘मॉल’, ‘स्मार्ट सिटी’, म्हणजे विकास’, असे भौतिक विकासाचे चित्र निर्माण केले जात आहे. भौतिक विकासामुळे ‘मेट्रो’ आणि ‘मेट्रो’ची अत्याधुनिक रेल्वेस्थानके मिळतील; मात्र ‘काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्रिपूंवर कशी मात करायची’, याविषयी विकासाच्या … Read more

खरा बुद्धीवान !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो आणि विज्ञानवाद्यांनो, ‘वैज्ञानिकांना शोध लावण्याची बुद्धी कुणी दिली ?’, याचा कधी विचार केला आहे का ? ती बुद्धी ईश्वराने दिली आहे. असे असतांना ‘ईश्वर नाही’, असे कुणी खरा बुद्धीवान म्हणेल का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदु राष्ट्रातील राजकारणी कसे असतील ?

‘हिंदु राष्ट्रात ‘स्वतःकडे सत्ता असावी’, अशा विचाराचे स्वार्थी आणि अहंभावी राजकारणी नसतील, तर ‘मानवजातीने साधना करून ईश्वरप्राप्ती करावी’, या विचाराचे धर्मसेवक आणि राष्ट्रसेवक असतील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

वृक्षारोपण राजकारण्यांच्या हस्ते नको, तर संतांच्याच हस्ते करा !

‘वृक्षारोपण राजकारण्यांच्या हस्ते नको, तर संतांच्याच हस्ते करा ! जसे बी, तसे फळ येते; म्हणूनच राजकारण्यांच्या हस्ते वृक्षारोपण केलेल्या वृक्षांना रज-तमात्मक अहंकाराची, तर संतांच्या हस्ते वृक्षारोपण केलेल्या वृक्षांना साधकत्व निर्माण करणारी फळे येतात !’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

मनुष्य अन्य प्राण्यांच्या तुलनेत अधिक कृतीशील असल्याने केवळ तोच साधना करू शकतो !

‘मनुष्य वगळता अन्य सर्व प्राणी उपलब्ध अन्न ग्रहण करतात. मनुष्याला मात्र स्वतःसाठी अन्न बनवावे लागत असल्यामुळे मनुष्य अन्य प्राण्यांच्या तुलनेत अधिक कृतीशील झाला. या कृतीशीलतेमुळेच केवळ मनुष्य साधना करू लागला आणि अन्य प्राणी आहे तसेच राहिले.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले (५.४.२०२२)

परिपूर्ण सेवेचे महत्त्व !

‘सेवा केल्यास त्याचा ३० टक्के लाभ होतो. सेवा चांगली केली, तर ५० टक्के आणि परिपूर्ण केली, तर १०० टक्के लाभ होतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२५.४.२०२२)

विज्ञान हे कधी समजून घेईल ?

‘गणित आणि भूगोल हे निराळे विषय आहेत. एकाच्या भाषेत दुसरा विषय सांगता येत नाही. त्याचप्रमाणे ‘विज्ञान आणि अध्यात्म हे निराळे विषय आहेत’, हे विज्ञानाने समजून घेणे आवश्यक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

वरवरचे उपाय योजणारे शासनकर्ते !

‘निर्गुण ईश्वरी तत्त्वाशी एकरूप झाल्यावरच खरी शांती अनुभवता येते. असे असतांना शासनकर्ते जनतेला साधना न शिकवता वरवरचे मानसिक स्तरावरचे उपाय करतात, उदा. जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी वरवरचे प्रयत्न करणे, मनोरुग्णालये स्थापन करणे इत्यादी.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले