तिस-या महायुद्धाला सामोरे जाण्यासाठी सर्वांनी सक्षम होणे आणि स्वतःचे रक्षण होणे यांसाठी तीव्र तळमळीने साधना करा !

‘तिसरे महायुद्ध जसे जवळ येत आहे, तशी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यापूर्वी वाईट शक्ती साधक आणि समाज यांवर आक्रमण करत होत्या. आता आपत्काळाची तीव्रता वाढत असल्याने, तसेच तिसरे महायुद्ध जवळ आल्याने वाईट शक्तींच्या आक्रमणाचे प्रमाणही त्या तुलनेत वाढत चालले आहे. आता वाईट शक्ती संतांवरही आक्रमण करत असल्याचे लक्षात आले … Read more

जागृत हिंदूंना दिशा देणे आवश्यक !

‘कृतीशील हिंदूंनो, झोपलेल्या हिंदूंना जागृत करण्यात वेळ न घालवता आता जागृत हिंदूंना दिशा देण्याचे कार्य करा, तरच तुम्ही जवळ आलेल्या आपत्काळात वाचाल आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करू शकाल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आगामी हिंदु राष्ट्रात सरकारी नोकरीसाठीचा निकष !

‘पोलीस आणि सैन्य यांचीच नव्हे, तर प्रशासनातील सर्वांचीच भरती करतांना हिंदु राष्ट्रात ‘राष्ट्र अन् धर्म यांवरील प्रेम’ हा सर्वांत मोठा घटक समजण्यात येईल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारताची शोकांतिका !

‘भ्रष्टाचार उघडकीस आणणारे प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी दाखवा आणि १ लाख रुपये घ्या’, असे उद्घोषित केले, तरी कुणाला ते पारितोषिक कधी मिळेल का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बुद्धीप्रामाण्यवाद्यांना आणि विज्ञाननिष्ठांना अतिशय मर्यादित ज्ञान असण्याची कारणे

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांत आणि विज्ञाननिष्ठांत ‘मला कळते, तेच सत्य’, असा अहंकार असतो आणि नवीन जाणून घेण्याची जिज्ञासा नसते. त्यामुळे त्यांना असलेले ज्ञान अतिशय मर्यादित असते. त्यांना अनंताचे ज्ञान कधीच मिळत नाही. याउलट ऋषींना अहंकार नसल्याने आणि जिज्ञासा असल्याने त्यांची ज्ञानकक्षा वाढत वाढत जाते आणि ते अनंत कोटी ब्रह्मांडांचेही अनंत ज्ञान सांगू शकतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. … Read more

भारतियांनी साधना न केल्याचा परिणाम !

‘धर्मशिक्षण आणि साधना यांच्या अभावी जनता नीतीशून्य झालेल्या भारतात भ्रष्टाचार, बलात्कार, दंगली यांपेक्षा निराळे काय होणार ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

लवकरच होणार हिंदु राष्ट्राची स्थापना !

‘कलियुगांतर्गत कलियुग म्हातारे झाले आहे. आता ते नष्ट होऊन कलियुगांतर्गत सत्ययुग येणार आहे, म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापन होणार आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदुत्ववाद्यांची केविलवाणी सद्य:स्थिती !

‘गायींची हत्या झाली, तर गंगा प्रदूषण रोखण्यासाठी कार्यरत असलेल्यांना त्याचे काही वाटत नाही आणि गंगा प्रदूषण रोखण्यासाठी कार्यरत असलेल्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला, तर गोरक्षकांना त्याचे काही वाटत नाही ! प्रत्येकाला ‘हिंदूंचे सर्व प्रश्‍न माझेच आहेत’, असे वाटेल, तेव्हाच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने हिंदूंची वाटचाल होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पद !

‘मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या धार्मिक उत्सवाला गर्दी जमवण्यासाठी नाटक, चित्रपट, वाद्यवृंद असे कार्यक्रम ठेवावे लागत नाहीत. याउलट हिंदूंच्या धार्मिक उत्सवाच्या वेळी मात्र असे कार्यक्रम ठेवावे लागतात. यावरून ‘हिंदू केवळ करमणुकीसाठी धार्मिक उत्सव साजरे करतात का ?’, असा प्रश्‍न पडतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

हिंदू धर्मांतर करण्यामागील कारण !

‘हिंदू धर्मांतर करतात, ते ईश्‍वरप्राप्तीसाठी नाही, तर आर्थिक सुख-सोयींसाठी.असे लोक हिंदु धर्मात नाहीत, हेच बरे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले