सर्व गोष्टींचा कर्ता-करविता असलेल्या देवाचे अस्तित्व नाकारणारे बुद्धीप्रामाण्यवादी !

‘कर्त्याने बनवलेली गोष्ट कर्त्यापेक्षा कधीच श्रेष्ठ असू शकत नाही, उदा. सुताराने बनवलेली आसंदी (खुर्ची) सुतारापेक्षा कधीच श्रेष्ठ असू शकत नाही. असे असतांना देवाने बनवलेले काही मानव मात्र सर्व गोष्टींचा कर्ता-करविता असलेल्या देवालाच क्षुल्लक समजतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अहंकारी बुद्धीप्रामाण्यवादी !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ‘मला सर्व कळते’, असा अहंकार असतो. त्यामुळे काही जाणून घ्यायची जिज्ञासा नसल्याने बुद्धीपलीकडील अध्यात्मशास्त्र त्यांना मुळीच ज्ञात नसते आणि तरीही ते अध्यात्मातील अधिकारी संतांवर टीका करतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

तृतीय महायुद्धाच्या काळात स्वत:ला वाचवण्यासाठी साधना करा !

‘कोणताही राजकीय पक्ष तृतीय महायुद्धाच्या काळात हिंदूंचे रक्षण करू शकणार नाही; कारण त्यांच्याकडे आध्यात्मिक बळ नाही. त्या काळात स्वतःला वाचवण्यासाठी आतापासून साधना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञानाच्या तुलनेत अध्यात्माचे अद्वितीयत्व !

‘विज्ञानासारखे बुद्धीगम्य शिक्षण ‘जीवन सुखाने कसे जगायचे’, हे शिकवण्याचा प्रयत्न करते, तर अध्यात्म ‘जीवन आनंदाने कसे जगायचे आणि जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून कसे सुटायचे’, हे शिकवते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘घरच्याला किंमत नसते’, ही म्हण सार्थ करणारे भारतातील हिंदू !

‘जगभरचे जिज्ञासू चिरंतन आनंदप्राप्तीसाठी अध्यात्म शिकायला जगातील इतर कोणत्याही देशात न जाता भारतात येतात, तर भारतीय केवळ सुखप्राप्तीसाठी अमेरिका, इंग्लंड इत्यादी देशांत जातात !’ – सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) आठवले

हिंदु राष्ट्र आणि अहंभाव निर्मूलन !

‘हिंदु राष्ट्रात अहंभाव जोपासणार्‍या व्यक्तीस्वातंत्र्यावर बंधन असेल आणि समाजस्वास्थ्य अन् राष्ट्ररक्षण जोपासणार्‍या आणि त्याद्वारे अहं नष्ट करून ईश्वरप्राप्ती करून देणार्‍या समष्टी साधनेला प्राधान्य असेल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु धर्माचे माहात्म्य !

‘कुठे आई-वडिलांनाही वृद्धाश्रमात अडगळीप्रमाणे टाकून देणारी पाश्‍चात्त्य वळणाची हल्लीची पिढी, तर कुठे ‘हे विश्‍वचि माझे घर’, असे शिकवणार्‍या हिंदु धर्मातील आतापर्यंतच्या पिढ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

रज-तमाचे प्रदूषण हे सर्व प्रदूषणांचे मूळ !

‘ध्वनीप्रदूषण, जलप्रदूषण, वायूप्रदूषण इत्यादींसंदर्भात नेहमी बातम्या येतात; पण त्यांचे मूळ असलेल्या रज-तमाच्या प्रदूषणाकडे मात्र धर्मशिक्षणाच्या अभावी कुणाचेच लक्ष जात नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संत आणि पालक यांमधील भेद !

‘कुठे आपल्या पूर्णपणे नियंत्रणात असलेल्या आपल्या १ – २ मुलांवरही सुसंस्कार करता न येणारे हल्लीचे पालक, तर कुठे आपल्या सहस्रो भक्तांवर साधनेचे संस्कार करणारे संत आणि गुरु !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

धर्मकार्य करण्याचे महत्त्व !

‘एखाद्या जातीचे किंवा पंथाचे कार्य करणार्‍यांचे, म्हणजे जात्यंधांचे, पंथांधांचे कार्य तात्कालिक असते. धर्माचे मानवजातीसाठीचे कार्य स्थळ आणि काळ यांची मर्यादा ओलांडून पुढे जाते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले