अहं आणि स्वभावदोषांवर मात, तरच होईल भवसागर पार !

सारे जीवन अनावश्यक असे काहीतरी मायेतील विषय शिकण्यापेक्षा जीवनाचा उद्धार करून देणारी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकून घेतली, तर ‘या भवसागरातून तरून जाणे’ सहज शक्य होते. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

आपत्काळात तरून जाण्यासाठी आतापासूनच ‘कोणत्याही परिस्थितीत देवाच्या अनुसंधानात कसे रहाता येईल ?’, हेच पहावे !

आपत्काळात साधना करण्यास आपल्या अवतीभवती अध्यात्माला पोषक आणि पूरक वातावरण असेलच असे नाही; म्हणून आतापासूनच ‘कोणत्याही परिस्थितीत देवाच्या अनुसंधानात कसे रहाता येईल ?’, हेच पहावे. आपल्या मनाकडून तसा सरावही करून घ्यावा. आपण मनाला सतत भावाच्या स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे आपत्काळात पुढे कितीही कठीण प्रसंग आला, तरीही मनाची स्थिती डळमळीत होत नाही. पुढे संकटकाळीही देव … Read more

सद्गुरु शिष्याचा मनोलय आणि बुद्धीलय करून घेऊन त्याच्यावर पूर्णतः ‘ईश्वरी सत्ता’ प्रस्थापित करतात !

जेव्हा सद्गुरूंचे त्याच्या शिष्यावर नियंत्रण असते, त्या वेळी शिष्याच्या जीवनात चांगलेच घडत जाते. शिष्याच्या मनात अयोग्य विचार आले, तरीही गुरु त्याला एखाद्या लहान बाळाप्रमाणे समजून घेत असतात. शिष्याच्या बुद्धीप्रमाणे सद्गुरु प्रत्यक्ष प्रसंगातही त्याला बरेच काही शिकवत असतात. यातूनच शिष्याचे मन आपोआपच घडत जाते. गुरुसेवा करतांना शिष्याच्या मनात कितीही प्रमाणात नकारात्मक विचार आले, तरीही शिष्याने गुरुसेवा … Read more

साधकाने जीवनामध्ये अखंड समष्टी सेवेचा ध्यास घेतला, तर त्याची लवकर प्रगती होते !

ॐ’ कार स्थिती क्षणिक साधणे, म्हणजे साधना नाही. बर्‍याचदा काय होते की, ‘कुंडलिनी शक्ती जागृत झाली की, काही जणांचा ॐकार आतूनच चालू होतो.’ यामुळे देहातील तमोगुण न्यून होऊ लागतो; मात्र ही स्थिती कायम टिकेल, असे नसते. त्यासाठी नियमित स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेकडे लक्ष द्यावे लागते. यामुळे जिवावरील अयोग्य संस्कार नष्ट होऊ लागतात आणि … Read more

साधना सदा सर्वकाळच करावी !

देव हा वेळ आणि काळ यांच्याही पलीकडे आहे. त्यामुळे देवाला कोणत्याही वेळेत बांधण्याचा प्रयत्न करू नये. यामुळे मुहूर्त पाहून साधना करू नये. साधना सदा सर्वकाळच करावी. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

समष्टीचे मन जिंकणारा कुटुंबभाव !

आपल्यात ‘कुटुंबभाव’ असेल, तर समष्टीला आपण आपल्याजवळ आणू शकतो, आपण समष्टीशी एकरूपता साधू शकतो, आपण समष्टीचे मन जिंकू शकतो. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

नामहाकेला धावून येणारा भगवंत !

कोणत्याही मनुष्याला हाक मारल्यावर तो मागे वळून पहातो. जेव्हा आपण भगवंताचे नाम घेऊन त्याला हाक मारतो, तेव्हा तो आपल्यासाठी येणार नाही का ? – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

मंत्रांचे जसेच्या तसे ध्वनीमुद्रण करून त्यावर कोणत्याही इतर असात्त्विक नादाची प्रक्रिया न करणेच अधिक फलदायी आहे !

‘इको’ (Eco sound) नादामध्ये सात्त्विकता अल्प असते. बरेच जण मंत्रांचे ध्वनीमुद्रण करतात. मंत्रांच्या ध्वनीमुद्रणाचे संकलन करतांना त्या नादाला वेगवेगळे संगीत जोडले जाते किंवा ‘तो नाद घुमल्यासारखा वाटावा’, यासाठी त्याच्यावर संगणकीय प्रणालीद्वारे वेगवेगळे प्रयोग केले जातात. यामुळे मंत्रांतील मूळ नादातील सात्त्विकता अल्प होत जाते. मंत्रांच्या उच्चारामध्येच त्यांची सात्त्विकता दडलेली आहे. उच्चाराचा नादच जर संगणकीय विज्ञानाद्वारे नष्ट … Read more

कलियुगाला ‘संधिकाल’ का म्हटले आहे ?

कलियुगात १५ वर्षे खडतर साधना करणे, म्हणजे पूर्वीच्या युगांतील अनेक वर्षांची साधना करण्यासारखे आहे; कारण कलियुगात साधनेसाठी परिस्थिती अत्यंत प्रतिकूल आहे. त्यामुळेच या युगात इतर युगांच्या तुलनेत देव लवकर प्रसन्न होतो; म्हणूनच कलियुगाला ‘संधिकाल’ म्हटले आहे. संधिकाल म्हणजे थोडी साधना आणि पुष्कळ पुण्य ! – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

आत्मशक्ती आणि चैतन्याचे सामर्थ्य

आत्म्यावरील आवरण काढून आत्मशक्ती निर्माण झाली की, ‘तो जीव कोणतेही कार्य सहज सुलभ रितीने करू शकतो.’ जिवाची इच्छाशक्ती आणि ज्ञानशक्ती मिळून जेव्हा कार्य होते, तेव्हा ते कार्य चैतन्याद्वारे सुलभ रितीने पार पडते. – परात्पर गुरु पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.४.२०१५)