श्रीराम – Shriram

ज्या क्षणाची सर्व हिंदु आतुर्तेनी वाट पाहत होते तो क्षण आला आहे ! अयोध्येमध्ये प्रभु श्रीराम पुन्हा एकदा ‍विराजमान होत आहेत ! शतकानुशतके चालत आलेला संघर्ष आता संपुष्टात आला असून प्रत्येक हिंदूचे हृदय आनंदाने ओतप्रोत भरले आहे. 22 जानेवारी 2024 (पौष शुक्ल द्वादशी) या दि‍वशी अयोध्येतील राममंदिरात श्रीराम ललाच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात येणार आहे. यावेळी, श्रीराम तत्त्व इतर दिवसांच्या तुलनेत अधिक प्रमाणात कार्यरत असणार आहे. या श्रीराम तत्त्वाचा लाभ घेण्यासाठी आणि भक्ती-भावाने श्रीराम ललाच्या आगमनाचे स्वागत करण्यासाठी काय करावे ते येथे दिले आहे ! जय श्रीराम!

२२ जानेवारी २०२४ या दिवशी हे करा !

  • ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा जप दिवसभर करा.
  • श्रीरामाला प्रार्थना करा – ‘अयोध्या येथे श्रीराम मंदिरात होणारा प्राणप्रतिष्ठापना विधी निर्विघ्नपणे पार पडू दे. तुझी कृपा आमच्यावर सदैव असू दे. रामराज्य शीघ्र स्थापन होऊ दे.’
  • श्रीराम तत्त्वाची रांगोळी काढा.
  • घर सजवा, दिवे लावा.
  • रामाची भजने आणि स्तोत्रे म्हणा, श्रीरामाचा गुणगौरव करा.
  • “श्रीराम आपल्या घरी येणार’, या भावाने प्रत्येक कृती करा.
  • प्रभु श्रीराम मंदिरामध्ये अवतरणार असल्याच्या क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्याला लाभणार आहे, यासाठी श्रीरामांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करा.
श्रीरामाचा DP लावा.

श्रीरामासंदर्भातील Audio

श्रीरामाचा जप

‘जय रघुनंदन जय सीयाराम’ नामधून

श्रीरामरक्षा स्तोत्र

श्रीरामाची आरती

श्रीरामाचा पाळणा

श्रीराम : वैशिष्ट्ये आणि कार्य

‘श्रीराम‘ या शब्दातील ‘श्री’ म्हणजे शक्‍ती, सौंदर्य, सद्गुण, वैभव इत्यादींचा समुच्चय. असा हा श्यामवर्ण, कमलनेत्र, आनंददायी अन् वात्सल्यमूर्ती श्रीरामचंद्र म्हणजे अनेक भाविकांची श्रद्धाज्योत ! रामभक्‍तांनो,  श्रीरामाची उपासना आपण विविध प्रकारे करत असतो; परंतु श्रीरामाच्या उपासनेसंदर्भातील शास्त्र समजून घेतल्यास उपासनेशी संबंधित कृती योग्यरीत्या करणे सुलभ होईल.

श्रीराम मंदिरे

भक्तांचे दैवत असलेल्या प्रभू श्रीरामाच्या काही वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांची माहिती अवश्य वाचा. राम भक्तांनी राम मंदिरांची अनुभूती घेऊयात.

 

श्रीराम भक्त असलेले संत आणि संशोधन विषयक

संबंधित व्हिडीओ

श्रीरामाशी संबंधित सनातनची उत्पादने आजच खरेदी करा !